Kharip Pik Vima 2025 गेल्या सहा महिन्यापासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे.

जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला या मदतीने आणखी चालना मिळाली आहे.
सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसान भरपाईची कोटी रक्कम; 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना लाभ!
पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेतून गेल्या हंगामात पुणे विभागाला 283 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार या 283 कोटींपैकी अहिल्यानगर जिल्ह्याला 159 कोटी 21 लाख 54 हजार रुपये मंजूर केले होते.

त्यात नेवासा तालुक्यातील 31 हजार 44 हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानी पोटी 44 हजार 243 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 46 कोटी 52 लाख 21 हजार 338 रुपये मंजूर झाले होते. त्यातील 90 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
Kharip Pik Vima 2025 जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या 3 हजार 842 हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानी पोटी 6 हजार 757 शेतकऱ्यांना 1 कोटी 62 लाख 27 हजार 584 नुकसान भरपाई मिळाली आहे.
Kharip Pik Vima 2025 त्या व्यतिरिक्तही स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून ही वरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लाभ हा नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला आहे.
Kharip Pik Vima 2025 तालुका : मिळालेली रक्कम
| जामखेड | 70476058 |
| कर्जत | 14189033 |
| पारनेर | 8035323 |
| पाथर्डी | 136940272 |
| श्री गोंदा | 62655439 |
| अकोले | 7701616 |
| कोपरगाव | 106280313 |
| अहिल्यानगर | 44741576 |
| नेवासा | 465221338 |
| राहता | 71356908 |
| राहुरी | 170412691 |
| संगमनेर | 18175222 |
| शेवगाव | 315378770 |
| श्रीरामपूर | 100589864 |
” नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 46 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या रकमेचे पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल. – धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा”.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |