Kharip Pik Vima 2025 यंदाच्या पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेतून हंगामात सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती, तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना 3 हजार 265 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 2 हजार 546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, उर्वरित 719 कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
अखेर सहा महिन्यांनी ‘या’ जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात!
यंदाच्या खरीप पिक विमा योजनेत एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 552 कोटी 60 लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानी पोटी 712 कोटी 75 लाख रुपये, असे एकूण 3 हजार 265 कोटी 36 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत.

Kharip Pik Vima 2025 यात सर्वाधिक 1 हजार 404 कोटी 12 लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील 691 कोटी 36 लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर 712 कोटी 75 लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानी पोटी देण्यात येणार आहेत.
त्या खालोखाल 629 कोटी 4 लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानी पोटी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Kharip Pik Vima 2025 प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानी पोटी भरपाई
कृषी विभागाने आतापर्यंत 2 हजार 546 कोटी 6 लाख रुपयांचे वितरण केले आहे. त्यातील 1 हजार 844 कोटी 44 लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानी पोटी तर 701 कोटी 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानी पोटी देण्यात आली आहे.
तर, उर्वरित 719 कोटी 29 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले.
” शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच उर्वरित रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. – विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे “
Kharip Pik Vima 2025 विभागनिहाय एकूण
- मंजूर नुकसान भरपाई – 3265.36
- वितरण – 2546.06
- शिल्लक (कोटीत) – 719.29
मंजूर नुकसान भरपाई | वितरण | शिल्लक (कोटी) | |
नाशिक | 149.88 | 102.72 | 47.15 |
पुणे | 282.99 | 133.55 | 169.44 |
कोल्हापूर | 15.49 | 9.67 | 5.82 |
छत्रपती संभाजी नगर | 564.18 | 404.11 | 160.07 |
लातूर | 1404.12 | 1263.35 | 140.76 |
अमरावती | 629.04 | 433.36 | 195.68 |
नागपूर | 299.63 | 219.28 | 35.01 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |