Kharip Nuksan Bharpai 2025 राज्यात झालेल्या खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, लातूर, अमरावती, नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी 1620 कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित 1558 कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
यंदा देशात किती पाऊस पडणार? हवामान विभागाने जाहीर केला पावसाचा अंदाज!
यात नाशिक विभागात जवळपास 14 लाख 988 रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजूर झाले आहे. यातील 02 लाख रुपये वाटप करण्यात आले असून 12 लाख 227 रुपये वाटप करण्याचे शिल्लक आहेत. दुसरीकडे पुणे विभागात 28 लाख 299 रुपये मंजूर झाले होते. यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याचे शिल्लक आहे. पुणे विभागात आहिल्या नगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे.

Kharip Nuksan Bharpai 2025 तसेच कोल्हापूर विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील 02 लाख 57 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 12 लाख 81 हजार रुपयांची रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे.
तसेच छत्रपती संभाजी नगर विभागात छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 56 लाख 418 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी 11 लाख 846 रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आले असून 44 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा बाकी आहे.
Kharip Nuksan Bharpai 2025 लातूर विभागातून लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई 62 लाख रुपयांची मंजूर झाली असून एकूण नुकसान भरपाई ही 01 कोटी 33 लाख रुपयांची आहे. यापैकी 92 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून 40 लाख रुपयांचे वाटप अद्यापही शिल्लक आहे.
तसेच अमरावती विभागातून 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर यापैकी 36 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 26 लाख रुपयांचा निधी लवकरच वाटप केला जाणार आहे. अमरावती विभागात बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम ,यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो.
Kharip Nuksan Bharpai 2025 तर नागपुर विभागात 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाले असो झाली असून यातील 17 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून, केवळ दोन लाख रुपयांचे वाटप शिल्लक आहे. या विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |