खरीप हंगामाचे नियोजन! Kharip Hangam Niyojan 2025

Kharip Hangam Niyojan 2025 शेतकरी बंधुनो खरीप हंगाम सुरू झालाय, खरीप गवत, हंगामात उत्पादकता वाढविण्यासाठी पेरणीच्या पूर्वतयारी बरोबरच पिकाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते.

Kharip Hangam Niyojan 2025

WhatsApp Group Join Now

पेरणी साधली की शेतकऱ्याने अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा…

खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनातील महत्त्वाच्या बाबी!!

खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनात प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, तिची खोली, हवामान, पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करून कोणती पिके घ्यावयाची आहे. हे ठरवून त्याप्रमाणे सुधारित जातींच्या बियाण्यांची खरेदी, जिवाणू संवर्धने पिकासाठी लागणारा रासायनिक खतांची व्यवस्था, पिकांवरील संभाव्य, रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य केळीच्या रोगांवर नियंत्रण!! 

जमिनीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या औजाराचे नियोजन

WhatsApp Group Join Now

Kharip Hangam Niyojan 2025 सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचा कालावधी जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. त्यामुळे या कालावधीत पिकांच्या पेरणी पासून ते काढणी मळणी पर्यंतची कामे केली जातात.

त्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी, हंगामासाठी लागणाऱ्या नांगर, कुळव, पाभर, रिजर कोळपे, स्प्रे पंप व इतर अवजारांची देखभाल केली पाहिजे.

म्हणजे पेरणीच्या वेळेस अडचणी येत नाहीत व वेळीही वाचतो. त्यासाठी प्रत्येक वेळ मशागतीसाठी लागणाऱ्या अवजाराचा वापर झाल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

Kharip Hangam Niyojan 2025 मशागतीची कामे

खरीप पिकांच्या लागवडीची पूर्वतयारी म्हणून मशागतीच्या कामांमध्ये नांगरट, ढेकळे फोडणे, कुळविणे धसकट, वेचणे जमिनीचे सपाटीकरण करणे आणि सरी किंवा वाफे तयार करणे इत्यादी कामे करणे जरुरीचे आहे.

रानाची स्वच्छता

रान तयार करत असताना, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून राणांच्या बांधावर असलेली, अडथळा करणारी झुडपे तोडावीत. काही वेळा झाडाच्या बसल्यामुळे पिकांची वाढ होत नाही. तरी अशी झाडे काढून टाकावीत.

तसेच बांधावरील गवत काडी कचरा झुडपे कापून जाळावेत त्यामुळे सूक्ष्म अवस्थेतील किडींचा आणि रोगांच्या बीजाणूंचा नाश होतो.

Kharip Hangam Niyojan 2025 पिकाचे नियोजन

खरीप हंगामातील लागवड करण्यासाठी पिकाची निवड करताना त्या पिकासाठी लागणारी जमीन, तिची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, खोली या गोष्टींचा विचार करूनच पिकांची निवड करावी. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता या दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्यात.

वाणांची बियाणे निवड आणि बीज प्रक्रिया

जमीन व पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणते पीक घ्यावयाचे ठरविल्यानंतर पिकांच्या वानांची निवड करताना, योग्य उत्पादन देणारे, कीड व रोगास कमी बळी पडणारे, कमी कालावधीत येणारे, आवर्षण प्रतिकारक्षम शिफारस केलेली बियाणे निवडावे.

कृषी विद्यापीठे, बियाणे महामंडळ यांनी प्रमाणित केलेलेच बियाणे वापरावे. सदरील बियाणे पेरणीपूर्वीच घेऊन ठेवावे. या बियाण्यांची उगवण शक्ती तपासलेली असते. त्यामुळे शिफारस प्रमाणे बियाणे वापरल्यास हेक्टरी रूपांची संख्या पाहिजे तेवढी ठेवता येते.

Kharip Hangam Niyojan 2025 स्वतःचे घरचे बियाणे वापरावयाचे असल्यास अथवा इतर बियाणे वापरावयाचे असल्यास त्यांची उगवण शक्ती तपासून पहावी तसेच पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया अतिशय साधी सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे.

Kharip Hangam Niyojan 2025 जिवाणू खतांचा वापर

रासायनिक खतांच्या तुलनेत जिवाणू खते अल्प किमतीत बाजारात मिळत असून, शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. ही एक कमी पैशाची, जास्त फायदा करून देणारी जैविक खते आहेत. हवेतील नत्र, ही खते पिकांना उपलब्ध करून देतात.

या खतामुळे पिकांची वाढ जोमाने होत आहे. आणि उत्पादनात ही वाढ होते. पेरणीपूर्वीच या खतांची तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे.

सर्व एकदल व तृणधान्य पिकांना अझोटोबॅक्‍टर या जिवाणू खतांची प्रक्रिया करावी उदा. ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, कापूस, मिरची, वांगी इत्यादी द्विदल पिकांना शेंगवर्गीय पिकांना रायझोबियम या जिवाणू खताची प्रक्रिया करावी. रायझोबियम जिवाणू खोत सर्वच शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही.

त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे. तसेच सर्व पिकांना स्फुरद विरघळणारे जिवाणू खत (पी.एस.बी) वापरल्याने जमिनीतील स्थिर झालेल्या स्फुरद विरघळविला जाऊन पिकांना उपलब्ध करून दिला जातो.

तसेच दिलेले स्फुरद कार्यक्षमरित्या उपयोगात आणला जातो. सर्वसाधारणपणे 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅमचे 1 पाकीट या प्रमाणात जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावयाची असल्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी आणि नंतर जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

प्रत्यक्ष पेरणी करताना घ्यावयाची काळजी

शेतीची मशागत केल्यानंतर, योग्य बियाणांची निवड करून त्यांची योग्य अंतरावर आणि वेळेवर पेरणी करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा प्रादुर्भाव वाढतो. आणि अंतरमशागतीस अडचणी निर्माण होतात. त्यासाठी निवडलेल्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी करावी पेरणी पावरीने करावी. पेरणी करताना बी जास्त खोलवर जाणार नाही, खूप दाट पडणार नाही याची काळजी घ्या.

Kharip Hangam Niyojan 2025 हेक्टरी बियाणे

सर्वसाधारणपणे कोरडवाहू बागायत क्षेत्रातील पिकांच्या पेरणी करिता बाजरीचे 3 ते 4 किलो, खरीप ज्वारी 10 ते 12 किलो, मका 15 ते 20 किलो, सूर्यफुलाचे 8 ते 10 किलो, तुरीचे 12 किलो, उडीद, मूग, मटकी, हुलगा, चवळी या पिकांचे 15 ते 20 किलो, भुईमूग 100 ते 125 किलो, सोयाबीन 75 ते 80 किलो बियाणयांची आवश्यकता लागते.

खत व्यवस्थापन

आपण वर्षानुवर्षे त्याच जमिनीत, एक पीक घेत असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होऊन पिकांच्या उत्पादनात घट येत चालली आहे.

पिकांचे चांगले उत्पादन घ्यावयाचे असेल तर जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

पिकांसाठी शिफारस केल्याप्रमाणे पेरणीपूर्वी म्हणजे दुसऱ्या कुळवणीच्या वेळेस जमिनीत शेणखत/कंपोस्ट खत मिसळणे आवश्यक आहे. खतांची टंचाई लिंकिंग लक्षात घेता पेरणीपूर्वी बाजारातून आवश्यक ती खते खरेदी करावीत म्हणजे पेरणी करताना खतांची अडचण भासणार नाही.

Kharip Hangam Niyojan 2025 पिकाची पेरणी

वेळेवर पेरणी करणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, हंगामात पुरेसा पाऊस आला तरी, काही कारणास्तव पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते.

तेव्हा अवर्षण प्रवण क्षेत्रात सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस स्थिरावल्याबरोबर त्वरित पेरणी करावी. जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी.

अशा प्रकारे जमिनीत नांगरटी पासून ते पीक पेरणी पर्यंतची मशागत, बियाणे, रासायनिक तसेच जैविक खते, रोगनाशके, कीटकनाशके इत्यादींचा खरेदी करून सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब पीक लागवडीसाठी केल्यास उत्पादनात निश्चितच भर पडेल.

खरीप पिक लागवडीच्या पूर्वतयारीचे ठळक मुद्दे

  • शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, त्यांची खोली, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करूनच पिकांची निवड करावी.
  • खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांची देखभाल दुरुस्त करावी.
  • जमिनीची नांगरट, कुळवणी, शेतातील तने, धसकटे वेचणे, ढेकळे फोडणे, जमीन सपाटीकरण करणे, पाण्याचे पाठ तासणे, वाफे तयार करणे इत्यादी कामे करावीत.
  • पेरणीपूर्वी पिकांच्या योग्य वाहनांची निवड आणि बीज प्रक्रिया करावी.
  • पेरणी योग्य वेळी, योग्य अंतरावर आणि शिफारशीत बियाणे वापरून करावी.
  • पिकांना शिफारशी प्रमाणे खत व्यवस्थापन करावे, तत्पूर्वी माती परीक्षण घेणे आवश्यक आहे.
  • खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निवेष्ठांची (बियाणे, जैविक/रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींची) हंगाम सुरू होण्यापूर्वीच तजवीज करून ठेवावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment