खरीप हंगामाची जोरदार तयारी ‘या’ जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष्य! Kharip Hangam 2025

Kharip Hangam 2025 अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शेतकरी मशागत करण्यात मग्न असून शासकीय स्तरावरही नियोजनाची लगबग सुरू आहे.

Kharip Hangam 2025

जिल्ह्यात सोयाबीनची 2 लाख 42 हजार 502 हेक्टर वर पेरणी अपेक्षित असून, त्याकरिता 98 हजार 500 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच अन्य पिकांसाठी खत व बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात 37 गावांना टंचाईची झळ, 8 टँकरने पाणीपुरवठा, उरला केवळ 35 टक्के जलसाठा!

Kharip Hangam 2025 खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 लक्ष 42 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये 2 लाख 42 हजार 502 हेक्टर वर सोयाबीन, 1 लक्ष 27 हजार 300 हेक्टर वर कपाशी, 65 हजार हेक्टर वर तूर, 3480 हेक्टरवर मूग, 3 हजार हेक्टरवर उडीद, 2 हजार हेक्टरवर खरीप ज्वारीचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण पेरणी नियोजन क्षेत्रफळापैकी जवळपास 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now

तीन महिन्यात उत्पन्न देणारे सोयाबीन सध्या सोयाबीन सध्या जिल्ह्यातील प्रमुख पीक बनले आहे. याकरिता खतांची अंदाजे मागणी 93 हजार 100 मे. टन असून, मंजूर आवटण 93 हजार 796 मे. टन आहे.

हंगामात तुटवडा निर्माण होत असल्याने काही शेतकरी आत्तापासूनच बियाणे व खत खरेदी करीत आहेत. हंगामात जादा दरात ही शेतकऱ्यांना बियाणे व खताची विक्री करण्यात येते. त्यामुळे शेतकरी मे महिन्यातच बियाणे व खत खरेदी करतात.

Kharip Hangam 2025 कपाशी 6 लाख 36 हजार पाकिटांची मागणी

  • कपाशीची पेरणी एक लाख 27 हजार 300 हेक्टरवर नियोजित आहे. याकरिता 6 लाख 36 हजार 500 पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.
  • तसेच मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी अशी सर्व पिके मिळून 7 हजार 434 क्विंटल बियाण्यांची मागणी आहे.

Kharip Hangam 2025 कपाशीचे बियाणे मिळणार 25 मे पासून

WhatsApp Group Join Now

कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बोंड आळी मुळे कपाशीच्या उत्पादनात घट येते. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जून महिन्याच्या 1 तारखे नंतर कपाशीची पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते.

बियाणे ही 1 जून नंतरच बाजारात उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी मात्र 25 मे पासून कपाशीचे बियाणे बाजारात उपलब्ध होणार आहे. मी आणि उपलब्ध होत असले तरी पेरणी मात्र 1 जून नंतरच करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment