खरीप हंगामातील बटाटा लागवड! Kharif Season Potato Cultivation 2025

Kharif Season Potato Cultivation 2025 महाराष्ट्रात हवामान अनुकूल असल्यामुळे बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र, खरीप हंगामात या पिकाची लागवड पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व खटाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पठारी बाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते.

Kharif Season Potato Cultivation 2025

कमी कालावधी, प्रती हेक्टरी जास्त उत्पादन तसेच पूर्व हंगामी उसात आंतरपीक या कारणास्तव किफायतशीर उत्पन्न घेता येते. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून या पिकाची लागवड केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते.

सेंद्रिय विचार हिरवळीची खते!!

बटाट्यामध्ये प्रथिने, फॉस्फरस यासारखी खनिजे आणि ब व क जीवनसत्वे आढळून येतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थांशिवाय जनावरांच्या खाद्यात व अनेक उद्योग धंद्यात मोठ्या प्रमाणावर होतो. बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकास सरासरी 15 – 25 अंश सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात 20-25 अंश सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात 17 – 20 अंश तेल सेल्सियस तापमान अनुकूल असते.

WhatsApp Group Join Now

Kharif Season Potato Cultivation 2025 मध्यम ते हलक्या व गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमिनीवर कसदार, भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू 5 ते 6.5 च्या दरम्यान असावा.

खरीप हंगामात बटाट्याची लागवड 15 जून ते 15 जुलै दरम्यान करावी. बियाणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी 15 ते 20 क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी प्रक्रियेसाठी बटाटे बेणे 25 ग्रॅम कार्बोन्डझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 10-15 मिनिटे बुडवून ठेवावे व नंतर लागवडीसाठी वापरावे. कुफरी ज्योती, सूर्य या वाणांची लागवड खरीप हंगामात करावी.

लागवडीसाठी बेण्यांचे वजन 30-40 ग्रॅम व व्यास 3.5 सें.मी असावा. विषाणू रोगांपासून वेण्यांचा ऱ्हास होतो म्हणून बटाट्याचे प्रमाणित बेणेच वापरावे. राष्ट्रीय बीज निगम किंवा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या प्रतिनिधीकडून आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. शीतगृहात बटाटा वेणी ठेवलेले असल्यामुळे ते लागवडी पूर्ण 7-8 दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक असते.

WhatsApp Group Join Now

Kharif Season Potato Cultivation 2025 बटाटा पिकास लागवडीपूर्वी 5 ते 20 टन प्रती हेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत द्यावे. पिकास 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, आणि 120 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. या मध्ये लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा तर पालाश आणि स्फुरदची पूर्ण मात्रा द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर एका महिन्याने भर देताना द्यावी.

बटाटा पिकाचे अधिक व अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा आहे. बटाटा पाण्याची एकूण गरज जमिनीच्या मगदूराप्रमाणे 50 ते 60 सेंमी एवढी आहे. सरी वरंबा पद्धतीने रान बांधणी केल्यास पाण्याची बचत होऊन बटाट्याचे उत्पादन जास्त मिळते. लागवडीनंतरच हलके (आंबवणी) पाणी द्यावे. नंतर चार-पाच दिवसांनी पाण्याची दुसरी पाळी वरंबा 2/3 उंची पर्यंत भिजतील अशा पद्धतीने द्यावी. बटाट्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात. पीक वाढीच्या संवेदनक्षम अवस्थांना पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक असते. अन्यथा पीक उत्पादक लक्षणीय घट येते.

रोपावस्था

  • ही अवस्था लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी येते.
  • यावेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही.

स्टोलोनायझेशन

  • या अस्वस्थेत बटाटे तयार होण्यास सुरुवात होते.
  • ही अवस्था लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी येते.
  • या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादनात घट येते.

Kharif Season Potato Cultivation 2025 बटाटा मोठे होण्याची अवस्था….

ही अवस्था लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेत पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात. परिणामी उत्पादन घटते. बटाटा लागवडीनंतर 5 ते 6 दिवसांनी जमीन वापश्यावर असताना बटाटा पिकामध्ये उगवणारा तणांच्या बंदोबस्तासाठी न्यूट्री मेट्रीब्युझीन 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.

लागवडीनंतर साधारणतः 25 ते 50 दिवसांनी बटाटा पिकाच्या वरंब्यास मातीची भर द्यावी. यामुळे बटाट्याचे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होते. यावेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता म्हणजेच 75 किलो नत्र प्रती हेक्टर द्यावा.

Kharif Season Potato Cultivation 2025 बटाट्यावरील काही प्रमुख किडी

मावा –

पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषून घेतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाणी खाली मुरडतात व पिवळी पडून गळून जातात. या किडीद्वारे विषाणू व विषाणूजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो. शरीरातून चिकट स्त्राव पानावर पसरून त्यावरील बुरशी प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण करते.

तुडतुडे –

पानातील रस शोषतात त्यामुळे पाणी वाकडी होऊन पिवळी पडतात. हवेत आद्रता जास्त असल्यास प्रादुर्भाव अधिक आढळतो.

बटाटा पोखरणारी अळी –

या किडीची अळी पानात, देतात तसेच कोवळ्या खोडात शिरून ते पोखरतात. जमिनीत उघड्या पडलेल्या बटाट्यावर मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरतात व बटाटे पोखरतात. घराच्या आत बोगदे पडतात. त्यांची विष्ठा डोळे व अंकुराजवळ दिसते. त्यामुळे बटाट्याचे वजन घटते व प्रतही खराब होते.

Kharif Season Potato Cultivation 2025 बटाट्यावरील काही प्रमुख रोग!

लवकर येणारा करपा

बटाट्याचे पीक पाच-सहा आठवड्यांचे झाल्यावर या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

यामुळे पानाच्या वरील पृष्ठभागावर तांबडे काळसर गोल ठिपके आढळून येतात कालांतराने ते ठिपके एकमेकात मिसळून अनियमित आकाराचे काळसर मोठे ठिपके होतात.

उशिरा येणारा करपा

Kharif Season Potato Cultivation 2025 याची लक्षणे झाडांच्या खालील पानावर दिसतात, प्रथम पानावर फिकट तपकिरी रंगाचे व्रण तयार होतात. कालांतराने ते काळपट पडतात. व्रणांची सुरुवात पानांच्या टोकापासून व कडांपासून होते.

रोगट पानाच्या खालच्या बाजूवर पांढरट बुरशी वाढते. रोबोट भाग सडून त्यांना उग्र वास येतो. व्रण पानाबरोबर खोड व कंदावरही दिसून येतात व ते सडून दुर्गंध सुटतो.

Kharif Season Potato Cultivation 2025 विषाणूजन्य रोग

बटाट्यावरील जखमा किंवा रोगाट स्पर्शाने पोटॅटो व्हायरस एक्स आणि एम हे दोन रोग कीटकांमार्फत पोटॅटो व्हायरस वाय व इतर विषाणूजन्य रोग पसरतात.

Kharif Season Potato Cultivation 2025 बटाटा काढणी|

  • काढणीपूर्वी 8 ते 10 दिवस आधी पाणी देऊ नये.
  • बटाटे काढणी नांगरणी किंवा पोटॅटो डिगराणे करावी.
  • काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावेत.
  • आकारमानानुसार जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment