Kharif Season Flowers 2025 निसर्गाने मानवाला विविध रंगाच्या आकाराच्या आणि गंधाच्या फुलांचे वरदान दिले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून परसबाग व बागेमध्ये फुल झाडांची हमखास आवडीने लागवड केली जाते.

Kharif Season Flowers 2025 आधुनिक युगात या फुलझाडेंची लागवड बागेपूर्ती मर्यादित न राहता या फुलांना व्यापारी महत्व ही प्राप्त झाले आहे. भारतातील वाढती लोकसंख्या आणि फुलांबद्दल असलेले आकर्षण यामुळे फुलांचा उपयोग दैनंदिन जीवनात वाढला आहे.
श्रावण घेवडा लागवड तंत्रज्ञान!! Ghevda Cultivation Technology 2025
पावसाळी हंगामात सर्वत्र हिरवाई भरून जाते. अशा वातावरणात आपल्या बागेत परसाद किंवा कुंडीत एकतरी फुल झाड लावावे. असा मोह प्रत्येकाला होतो. परंतु कोणते फुल झाड लावावे असा प्रश्न उद्भवतो.

खरीप हंगामात भरपूर फुल पिकांची लागवड करता येते. परंतु शोभित फुलझाडांमध्ये झेंडू, गेंलार्डीया, ऍस्टर, शेवंती, चांदणी, सिनीया, कॉसमॉस, सूर्यफूल, तीथोनिया, अमरोन्यस, बाल्सम, सिलोसिया, ग्रॉमफेना, साल्व्हिया, डेझी, हॉलिहोक, कॉक्स, कोंब, इत्यादी फुलझाडांचा सहभाग होतो.
या फुल झाडांची बागबगीच्या मध्ये लागवड करताना येत असली तरी, यापैकी झेंडू, गेंलार्डीया, ऍस्टर, चांदणी, डेझी, व फुलझाडे व्यापारी तत्वावर लावतात. सूच्या फुलांसाठी झेंडू, गेंलार्डीया, ऍस्टर लागवड केली जाते. कट फ्लावरसाठी ऍस्टर, कॉक्स, कोंब फिशर साठी सोनतुरा हे पीक लावतात.
हवामान व जमीन: Kharif Season Flowers 2025
खरीप हंगाम हा जून सप्टेंबर पर्यंत असतो. या हंगामातील फुल झाडांना उष्ण व दमट हवामान चांगले मानवते त्यांच्या चांगल्या वाढीसाठी दिवसाचे 25-30°c व रात्रीचे 15 -20 सेल्सिअस तापमान लागते सरासरी पिकाची चांगली वाढ होते. आणि वाढीसाठी हवेत चांगला दमटपणा असावा साधारणता 60-70% आद्रता या पिकांना चांगली मानव मानवते.
जमिनीच्या बाबतीत ही पिके संवेदनशील असतात उत्तम वाढीसाठी चांगल्या निचऱ्याचे भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली मध्यम जमीन या पिकाला चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामना 6.5 ते 7 अशा जमिनीत ही पिके लावावेत कुंडीमध्ये लागवडीसाठी एक भाग शेणखत + एक भाग पोयट्या माती असेल 1:1 प्रमाणाचे मिश्रण तयार करून केलेले माध्यम वापरावे.

लागवड: Kharif Season Flowers 2025
खरीप हंगामातील फुल पिकांच्या लागवडीसाठी प्रथमतः उन्हाळा जमीन खोल नांगरून कुळवून भुसबुसीत करावे. जमीन तयार करताना हेक्टरी 30 टन शेणखत मातीत चांगले मिसळावे. तयार जमिनीत फूल पिकांच्या लागवडीसाठी सपाट वाफे, अथवा सरी वरंबे तयार करावेत. कुंडीतील लागवडीसाठी कुंडीच्या तळाशी वाळलेला पालापाचोळा टाकून माती मिश्रणात 100 -50 ग्रॅम 15:15:15 हे खत मिसळून कुंड्या भराव्यात. कुंड्या भरताना वरून एक ते दीड इंच मोकळ्या राहतील अशा भरावयात.
खरीप हंगामातील पिकांची लागवड ही बियांपासून केली जाते. बहुतांशी पिकाच्या बिया लहान असल्यामुळे लागवडीसाठी रोपे तयार करावीत रूपे गादीवाफा किंवा लाकडी ट्रे अथवा कुंड्यांमध्ये तयार करावेत पावसाळ्याच्या सुरुवातीला वाफ्यांवर बियांची पेरणी करावी.
Kharif Season Flowers 2025 बी पेरणीपूर्वी बियाणास 0.2% कॅप्टन सोडावे बी जमिनीत अर्धा ते एक सेमी खोल पेरावे पेरणीसाठी दोन ओळीतील दहा सेमी अंतर ठेवावे पेरणीनंतर बी बारीक मातीत व शेणखत यांच्या मिश्रणाने झाकावे व ताबडतोब पाणी द्यावे. उगवणीनंतर पाणी देणे, तन काढणे इत्यादी. कामे वेळेत करावीत पेरणीनंतर साधारणता 21 ते 30 दिवसात रोपे पूर्णलागणीस तयार होतात.
रोपांची पूर्णलागण रोपांना 4 ते 5 पाने आल्यावर अथवा रोपांची उंची 10 ते 15 सेमी झाल्यावर करावी वाफयावरून रोपे उपटण्यापूर्वी रोपांना हलके पाणी द्यावे. म्हणजे रोपे उपटताना मुळांना इजा होणार नाही. ढगाळ हवामानामध्ये रोपांची पूर्णलागण करावी. पाऊस नसेल तर ताबडतोब रोप लागवडीनंतर पाणी द्यावे.
खते व पाणी व्यवस्थापन: Kharif Season Flowers 2025
खरीप हंगामातील फुल झाडांच्या लागवडी पूर्वी जमीन तयार करताना 30 टन शेणखते हेक्टरी मातीत मिसळावे. तसेच लागवडीवेळी 100:200:200 किलो नत्र, स्फुरद, पालाश ही खतमात्रा द्यावी लागवडीनंतर एक ते दीड महिन्याच्या अंतराने उरलेली 100 किलो नत्राची मात्रा द्यावी.

सुंदर व भरपूर फुलांच्या उत्पादनासाठी पीक बहारात असताना 2 टक्के युरियाची फवारणी करावी. लागवडीनंतर आवश्यकतेनुसार तण नियंत्रणासाठी निंदणी करावी. निंदणी भरताना रोपांना मातेची भर द्यावी, खरीप हंगामातील पिकांना पाणी बेताने द्यावे. पाऊस असेल तर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जास्त पाऊस झाल्यास पाण्याची योग्य खबरदारी घ्यावी. पिकामध्ये जास्त काळ पाणी साचू देऊ नये.
काढणी व उत्पादन:
Kharif Season Flowers 2025 हंगामी फुलांची लागवड ही बागेमध्ये भरगच्च भरलेल्या फुलांच्या ताटव्यासाठी अथवा वाफ्यासाठी करतात. ताठव्या व वाफे यामध्ये लावलेल्या फुलांची काढणी करत नाहीत तर ताटवे सुंदर व अल्हाददायक दिसावे म्हणून बहरलेल्या अवस्थेत जोपासतात.
व्यापारी तत्वावर केलेल्या फुल झाडांची लागवड ही फुलांच्या विक्रीसाठी केली जाते. सध्या फुलांच्या उत्पादनासाठी लावलेल्या फुलांची काढणी ही फुले पूर्ण उगवल्यानंतर करतात.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |