Kharif Season 2025 शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम जवळ येतोय त्या दृष्टीने तयारीला लागलाच असेल खरीप हंगामाचे उत्पादकता वाढवण्यासाठी पेरणीची पूर्वतयारी आणि पिकाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. पेरणीची वेळ साधायचे असेल तर पूर्वतयारी आवश्यक आहे. पेरणी साधलीची शेतकऱ्याने अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा.

खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनातील महत्त्वाच्या बाबी
खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनात प्रामुख्याची खोली हवामान पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करून कोणती पिके घ्यावयाची आहेत हे ठरवून त्या आधारित जातींच्या बियाण्यांच्या खरेदी जिवाणू संवर्धने पिकासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व्यवस्था पिकांवरील संभाव्य कीड रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
केळी बागेतील अंतरमशागत!!
Kharif Season 2025 जमिनीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांचे नियोजन
सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचा कालावधी जून ते सप्टेंबर पर्यंत असतो, त्यामुळे या कालावधीत पिकाच्या पेरणीपासून ते काढणी मळणी पर्यंतची कामे केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हंगामासाठी लागणाऱ्या कुळव, पाभर, रिजर, कोळपे, स्प्रे, पंप व इतर अवजारांची देखभाल केली पाहिजे. म्हणजे पेरणीच्या वेळेस अडचणी येत आहेत व वेळही वाचतो त्यासाठी प्रत्येक वेळी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर झाल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

Kharif Season 2025 मशागतीची कामे
खरी पिकांच्या लागवडीची पूर्वतयारी म्हणून मशागतीच्या कामांमध्ये नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणे, धसकट वेचणे, जमिनीची सपाटीकरण करणे, आणि सरी किंवा वाफे तयार करणे इत्यादी. कामे करणे जरुरीचे आहे.
रानाची स्वच्छता
राण तयार करत असताना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून राणांच्या बांधांवर असलेली मशागत व पिकाच्या वाढीला अडथळा करणारी झुडुपे तोडावी. काही वेळा झाडांच्या बसल्यामुळे पिकांची वाढ होत नाही. तरी अशी झाडे काढून टाकावेत. तसेच बांधांवरील गवत, काडीकचरा, झुडपे, कापूस, जाळावी त्यामुळे सूक्ष्म अवस्थेत किडींचा आणि रोगांच्या बिजाणूचा नाश होतो.

Kharif Season 2025 पिकाचे नियोजन;
खरीप हंगामात लागवड करण्यासाठी पिकांची निवड करताना त्या पिकासाठी लागणारी जमीन तिची उपलब्धता जमिनीचा प्रकार खोली यात गोष्टीचा विचार करून पिकांची निवड करावी. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता या दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्या.
वाणांची निवड आणि बीजप्रक्रिया
जमीन व पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणते पीक घ्यावयाचे ठरवल्यानंतर पिकांच्या वाणांची निवड करताना योग्य उत्पादन देणारे कीड व रोगास कमी बळी पडणारे कमी कालावधीत येणारे अवर्षण प्रतिकारक्षम शिफारस केलेले बियाणे निवडावे. कृषी विद्यापीठे बियाणे महामंडळ यांनी प्रमाणित केलेले बियाणे वापरावे. सदरील बियाणे पेरणीपूर्वीच घेऊन ठेवावे या बियाणांची उगवण शक्ती तपासलेले असते त्यामुळे शिफारस प्रमाणे बियाणे वापरल्यास हेक्टरी रोपांची संख्या पाहिजे तेवढी ठेवता येते. बीजे प्रक्रिया अतिशय साधी सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे.
Kharif Season 2025 जिवाणू खतांचा वापर
रासायनिक खतांच्या तुलनेत जिवाणू खते अल्प किमतीत बाजारात मिळत असून शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहेत. ही एक कमी पैशाची जास्त फायदा करून देणारी जैविक खते आहेत. हवेतील नत्र ही खते पिकांना उपलब्ध करून देणार या खतामुळे पिकांची वाढ जोमाने होते, आणि उत्पादनातही वाढ होते. पेरणीपूर्वीच या खतांची तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष पेरणी करताना घ्यावयाची काळजी
शेतीची मशागत केल्यानंतर योग्य बियाण्यांची निवड करून त्यांची योग्य अंतरावर आणि वेळेवर पेरणी करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आंतरमशागतीस अडचणी निर्माण होतात. त्यासाठी निवडलेल्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी करावी. पेरणी पाभरीने करावी पेरणी करताना बी जास्त खोलवर जाणार नाही खूप दाट पडणार नाही याची काळजी घ्या.

Kharif Season 2025 हेक्टरी बियाणे
सर्वसाधारणपणे कोरडवाहू बागायत क्षेत्रातील पिकांच्या पेरणी करिता बाजरीचे 3 ते 4 किलो खरीप ज्वारी 10 ते 12 किलो, मका 15 ते 20 किलो, सूर्यफुलाचे 8 ते 10 किलो, तुरीचे 12 किलो, उडीद, मूग, मटकी, चवळी या पिकांचे 15 ते 20 किलो, भुईमूग 100 ते 125 किलो, सोयाबीन 75 ते 80 किलो बियाण्यांची आवश्यकता लागते.
खरीप पिकांची लागवडीच्या पूर्वतयारीची ठळक मुद्दे
- शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले जमीन त्यांची खोली, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करून पिकांची निवड करावी.
- खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांचे देखभाल दुरुस्ती करावी.
- जमिनींची नांगरट, कुळवणी, शेतातील तने, धसकटे, ढेकळे फोडणे, जमीन सपाटीकरण करणे, पाण्याचे पाट तासणे, वाफे तयार करणे, इत्यादी कामे करावीत.
- पेरणीपूर्वी पिकांच्या योग्य मानांची निवड आणि बीज प्रक्रिया करावी.
- पिकांना शिफारसी प्रमाणे खत व्यवस्थापन करावे तत्पूर्वी माती परीक्षण घेणे आवश्यक आहे.
- खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांची बियाणे, जैविक, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच तजवीज करून ठेवावी.
Kharif Season 2025 पिकाची पेरणी
वेळेवर पेरणी करणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते,. हंगामात पुरेसा पाऊस आला तरी काही कारणास्तव पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घटनेतील तेव्हा अवर्षण प्रवन क्षेत्रात सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस स्थिरावल्याबरोबर त्वरित पेरणी करावी जून चा दुसरा आठवडा ते जुलै च्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |