खरिपातील कडधान्य पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान!! Kharif Pulses 2025

Kharif Pulses 2025 वातावरणातील घटकांमध्ये सततच्या बदलांमुळे तसेच महाराष्ट्रात सात जून ला येणारा मोसमी पाऊस यावर्षी साधारणता 21 जून नंतर महाराष्ट्रात दाखल होऊन संपूर्ण महाराष्ट्रात उशिरा येणाऱ्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी खरीप पिकांचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कडधान्य पिकांचा प्रामुख्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

Kharif Pulses 2025

तसेच आता उशिरा सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी कापसासारख्या पिकांना पर्याय म्हणून तूर सारखे पीक चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना देऊन जाऊ शकते. इतरही कडधान्य पिके पेरल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

वनस्पतीशास्त्र ऊसाचा तुरा!!

Kharif Pulses 2025 शेती आणि आहारात कडधान्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. विविध पीक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्याने जमिनीचा पोत टिकून राहतो. तसेच तो सुधारण्यास सुद्धा मदत होते. या पिकांना पाणी कमी लागत असल्यामुळे आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्याने जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचवता येते.

WhatsApp Group Join Now

या पिकांच्या मुळातील गाठीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळे या पिकांची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधान्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होते. मानवी आहाराच्या दृष्टीने कडधान्यास विशेष महत्त्व आहे.

कडधान्यांमध्ये 20 ते 25 टक्के म्हणजे तृणधानाच्या दुप्पट ते अडीचपट प्रथिने असतात. आणि प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांच्या रोजच्या आहारात पुरेषा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात कडधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार कडधान्याची मागणी फार मोठी आहे. याबाबत महाराष्ट्रातील कडधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने कडधान्य लागवड करणे क्रमप्राप्त ठरते.

जमीन: Kharif Pulses 2025

मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर, मूग, उडीद, घेवडा या पिकांना योग्य ठरते. तसेच हलकी ते मध्यम माळरानाची जमीन कुलथी व मटकी पिकांना उपयोगी ठरते. चोपण, पाणथळ क्षारयुक्त जमिनीत कडधान्य पिके चांगली येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळांवरील रायझोबियम जिवाणूंच्या ग्रंथींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. साधारणता 6.5 ते 7.5 सामू असलेली जमिनी या पिकांना योग्य असते.

WhatsApp Group Join Now

हवामान: Kharif Pulses 2025

तूर, मूग, उडीद, कुलथी आणि मटकी या पिकांना 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. फुले येण्याचे आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान पिकांना अधिक उपयुक्त असते. कडधान्य पिके सरासरी 750 ते 1000 मि.मी. वार्षिक पर्जन्यमानात चांगली येते.

पूर्व मशागत: Kharif Pulses 2025

तूर, मूग, उडीद आणि घेवडा ही कडधान्य मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्याने जमिनीची खोल नांगरट नंतर कुळवणी करून जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. कुलथी आणि मटकी या पिकांसाठी कुळवाच्या एक-दोन पाळ्या जमीन तयार करण्यासाठी पुरेशा होतात.

पेरणीची वेळ: Kharif Pulses 2025

मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजे जूनचा दुसरा आठवडा ते जुलै चा पहिला आठवडा या दरम्यान खरीप कडधान्याची पेरणी पूर्ण करावी. पाऊस अनियमित पडल्यास पेरणीत उशीर होतो व उत्पादनात घट येते. उशिरा पेरलेल्या पिकालाही लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्या कमी होते आणि उत्पादनात घट येते. 15 जुलै नंतर पेरणी करू नये अन्यथा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.

बियाण्याचे प्रमाण:

पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने हेक्टर रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रती हेक्टर बियाण्याचे प्रमाण पुरेसे आणि योग्य वापरणे महत्त्वाचे ठरते. कडधान्य पिकांच्या विविध वाणांच्या दाण्यांच्या आकारमानानुसार बियाणे पेरणीसाठी वापरावे लागते.

बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन:

बियाण्याचे उगवण चांगले होण्यासाठी आणि रोपअवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेडीझमचा या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात लावावे. यानंतर जिवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम स्फुरद विरघळणारे पीएसबी प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.

10 किलो बियाण्यास 250 वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. यामुळे कडधान्याच्या मुळांवरील ग्रंथींचे प्रमाण वाढवून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि त्या योग्य पिकाचे उत्पादन वाढते.

खते: Kharif Pulses 2025

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत 10 ते 15 गाड्या प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरावे. यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते. अशा जमिनीतून मूग, उडीद, कुलथी, मटकी व घेवडा या पिकांची जोमदार वाढ होण्यास उपयोग होतो. पेरणी करताना तुर पिकास 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद, मूग आणि उडीद पिकास 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद, कुलथी आणि मटकी पिकासाठी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद, तसेच घेवडा पिकासाठी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र आणि 80 किलो स्फुरद आणि पेरणीनंतर पुन्हा 20 दिवसांनी 30 किलो नत्र प्रति हेक्‍टर या प्रमाणात द्यावी.

अंतरमशागत: Kharif Pulses 2025

पीक सुरुवातीपासूनच तनविहरीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक ती बाब आहे. कोळप्याच्या साहाय्याने पीक 20-25 दिवसाचे असताना पहिली व 30-35 दुसरी कोळपणी करावी. गरजेनुसार एक दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. पेरणीपूर्वी फ्ल्यूक्लोरालीन किंवा पेंडीमिथिलिन हे तणनाशक दिड लिटर प्रती हेक्टर 500 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन:

खरीप कडधान्य पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात परंतु पाऊस कमी झाल्यास जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. त्यासाठी ओलावा कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरुवातीला संरक्षित पाणी द्यावे.

तुरीच्या पिकास पावसाची शक्यता नसेल तर पहिले पाणी फुल कळी लागताना दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. तुरीच्या हळव्या आणि अति हळव्या वानासाठी 35 ते 40 सेमी पाण्याची गरज असते. तूर, मूग, उडीद, मटकी आणि घेवडा ही पिके सर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खूपच कमी झाला असल्यास फुले येण्याच्या शेंगा भरण्याच्या काळामध्ये पाणी द्यावे.

पीक संरक्षण: Kharif Pulses 2025

खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या कडधान्य पिकांवर बऱ्याच वेळा ढाकाळ हवामानामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यासाठी वेळीच पीक संरक्षण योजना अमलात आणणे फारच महत्त्वाचे असते. तूर पिकाचे आर्थिक नुकसान पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत आढळून येणाऱ्या प्रत्येक फुलांवर अथवा शेंगातील कोवळ्या दाण्यांवर उपजीविका करण्याऱ्या घाटे अळी, पिसारी पतंगाची आळी, शिंगेवरील काळी माशी या प्रमुख किडींपासून होते.

या किडीमुळे उत्पन्नात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट येते. त्याचप्रमाणे मूग आणि उडीद पिकांवर मावा शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, पाने खाणारे अळी, इत्यादी. किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.

त्यासाठी जमिनीची खोल नांगरट करणे, पिकाची वेळेवर पेरणी, जैविकीड नियंत्रण परोपजीवि किडींचा वापर, प्रती हेक्टरी झाडांची योग्य संख्या पाणी व्यवस्थापन कडधान्य पिकांचे तृणधान्याबरोबर फेरपालट खंड अथवा पट्टा पद्धतीने कीटकनाशकांचा वापर वनस्पतीजन्य औषधांचा वापर इत्यादी बाबींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.

मर आणि वांझ हे तुरीवरील महत्त्वाचे रोग आहेत. या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम वाणांचीच लागवड करावी. तसेच पिकांची फेरफलट आवश्य करावी पेरणीपूर्वी बियाणास ट्रायकोडर्माची 5 ग्राम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. मुग आणि उडीद या पिकांवर प्रामुख्याने भुरी आणि पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

यांच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम कार्बनडिझॅम अधिक 30 टक्के प्रवाही डायमेथोएट 500 मिली किंवा 36 टक्के प्रभावी मोनोक्रोफॉस 550 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास 8 ते 10 दिवसांनी आणखी एक फवारणी करावी.

काढणी, मळणी आणि साठवण: Kharif Pulses 2025

तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे खळ्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेंढ्या झोडपून शेंगा आणि दाणे वेगळे करावे. मुगाच्या शेंगा 75 टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर 8-10 दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीच्या साह्याने झोडपून दाणे वेगळे करावे.

उडीदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची काठीच्या सहाय्याने झोडणी करून दाणे वेगळे करता येतात. उडदीच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही. याप्रमाणे कुलथी, मटकी, घेवडा पिकाची कापणी करून मळणी करावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment