Kharif Crops Land and Fertilizer Management 2025 खरीप पिकांच्या पेरणी मध्ये योग्य जमिनीत, योग्य वेळी, योग्य अंतरावर पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पिक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी, प्रमाणात, योग्य खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.माती परीक्षणानुसार खते दिल्यास पीक उत्पादनात वाढ होऊन, जमिनीची सुपीकता टिकून राहिल. प्रस्तुत लेखात खरीप हंगामातील पिकांसाठी जमीन व खत व्यवस्थापन यावर दिलेली माहिती आहे.

सोयाबीन
जमीन
मध्यम खोलीची, चांगला निचारा होणारी, अत्यंत हलकी, उथळ तसेच मुरमाड जमिनीत लागवड करू नये. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त युक्त वा रेताड जमिनीत पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रिय प्रमाण चांगले असावे.
शेणखत कंपोस्ट खत : 5 ते 10 टन / हेक्टरी
रासायनिक खते
- 50 : 75 : 45 नत्र : स्फ़ुरद : पालाश किलो / हेक्टरी + 20 किलो गंधक
- 25 किलो झिंक सल्फेट बोरॅक्स प्रती हेक्टर द्यावे.
- पिक 20 ते 25 दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास
- सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी
- शेंगा लागण्याच्या अवस्थेत 19 : 19 : 19 तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत 0 : 52 : 34 या विद्राव्य खतांची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
सूर्यफूल
जमीन
मध्यम ते भारी खोलीची, चांगला निचरा होणारी, आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत पीक चांगले येत नाही.
शेणखत कंपोस्ट खत : 10 ते 12 टन / हेक्टरी
रासायनिक खते
- बागायती 60 : 60 : 60 नत्र : स्फ़ुरद : पालाश किलो / हेक्टरी, अर्ध नत्र, संपूर्ण स्फ़ुरद व पालाश पेरणीच्या वेळी, उर्वरित अर्धे नत्र 30 की / हे पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.
- गंधकाची कमतरता असल्यास 20 किलो प्रतिहेक्टर गंधक शेण खतात मिसळून द्यावे.
- कोरडवाहू : 50 : 25 : 25 नत्र : स्फ़ुरद : पालाश किलो / हेक्टरी
भुईमूग
जमीन
मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी.
शेणखत कंपोस्ट खत : 10 टन / हेक्टरी
रासायनिक खते
- 25 : 50 नत्र स्फ़ुरद किलो / हेक्टरी + 400 कि / हे (पेरणीच्या वेळी आणि आऱ्या सुटताना प्रत्येकी 200 कि / हे. जिप्सम द्यावे).
कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारे पीक एरंडी लागवड
तीळ
जमीन
मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
शेणखत कंपोस्ट खत : 5 टन / हेक्टरी
रासायनिक खते
- 25 किलो नत्र प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी व पिक तीन आठवड्याचे झाल्यावर 25 किलो नत्र द्यावे.
- गंधकाच्या जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी 20 किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.

बाजरी
जमीन
हलकी ते मध्यम, चांगला निचरा होणारी. हलक्या जमिनीत सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
शेणखत कंपोस्ट खत : 5 टन / हेक्टरी
रासायनिक खते
- हलकी जमीन 40 : 20 नत्र स्फ़ुरद : पालाश किलो / हेक्टरी.
- मध्यम जमीन : 50 : 25 नत्र स्फ़ुरद पालाश किलो हेक्टरी / अर्ध नत्र संपूर्ण स्फ़ुरद व पालाश पेरणीच्या वेळी, उर्वरित अर्ध नत्र 25 की / हे पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी.