खरीप पिके, जमीन व खत व्यवस्थापन!! Kharif Crops Land and Fertilizer 2025

Kharif Crops Land and Fertilizer 2025 खरीप पिकांच्या पेरणी मध्ये योग्य जमिनीत, योग्य वेळी, योग्य अंतरावर, पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी, योग्य देणे, आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार खते दिल्यास पीक उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहील प्रस्तुत लेखात खरीप हंगामातील पिकांसाठी व जमीन खत व्यवस्थापन यावर माहिती दिली आहे.

Kharif Crops Land and Fertilizer 2025

WhatsApp Group Join Now

Kharif Crops Land and Fertilizer 2025 सोयाबीन

जमीन: मध्यम खोलीची चांगला निचरा होणारी अत्यंत हलकी उथळ तसेच मुरमाड जमिनीत लागवड करू नये जास्त अल्मयुक्त क्षारयुक्त व रेताड जमिनीत पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असावे शेणखत/कंपोस्ट 5 ते 10 टन/हेक्‍टरी

हळद लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञान सुधारित जाती, व्यवस्थापन!!

रासायनिक खते

  • 50 : 75 : 45 नत्र : स्फुरद: पालाश किलो/हेक्टरी + 20 किलो गंधक
  • 25 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी द्यावे.
  • पीक 20 ते 25 दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास
  • सूक्ष्म अन्नद्रव्याची 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • शेंगा लागण्याच्या अवस्थेत 19:19:19 तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत 0:52:34 या विद्राव्य खतांची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी पेरणी नंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

सूर्यफूल

जमीन: मध्यम ते भारी खोलीची चांगला निचरा होणारी आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत पीक चांगले येत नाही. शेणखत/कंपोस्ट खत 10 ते 12 टन/हेक्‍टरी.

WhatsApp Group Join Now

रासायनिक खते

  • बागायती 60:60:60 नत्र, स्फुरद, पालाश किलो/हेक्टरी अर्ध नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी उर्वरित अर्धे नत्र 30 किलो हे पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.
  • गंधकाची कमतरता असल्यास २० किलो प्रती हेक्टरी गंधक शेणखतात मिसळून द्यावे.
  • कोरडवाहू 50:25:25 नत्र, स्फुरद, पालाश किलो/हेक्‍टरी

Kharif Crops Land and Fertilizer 2025 भुईमूग

जमीन: मध्यम भुसभुशीत व चुना सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेणखत/कंपोस्ट खत 10 टन/हेक्‍टरी

रासायनिक खते

  • 25: 50 नत्र, स्फुरद किलो/हेक्टरी + जिप्सम 400 कि/हे ( पेरणीच्या वेळी आणि आऱ्या सुटताना प्रत्येकी 200 की/हे. जिप्सम द्यावे.

Kharif Crops Land and Fertilizer 2025 तीळ

जमीन: मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेणखत/कंपोस्ट खत 5 टन/हेक्‍टरी

रासायनिक खते

  • 25 किलो नत्र प्रती हेक्‍टरी पेरणीच्या वेळी व पीक 3 आठवड्याचे झाल्यावर 25 किलो नत्र द्यावे.
  • गंधकाच्या जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी 20 किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.

Kharif Crops Land and Fertilizer 2025 बाजरी

जमीन: हलकी ते मध्यम चांगला निचरा होणारी हलक्या जमिनीत सरी वरंबा पद्धत फायदेशीर ठरते शेणखत/कंपोस्ट खत 5 टन/हेक्टरी

रासायनिक खते

  • हलकी जमीन 40 : 20: 20 नत्र, स्फुरद, पालाश किलो/हेक्‍टरी
  • मध्यम जमीन: 50 : 25 : 25 नत्र, स्फुरद, पालाश किलो/हेक्‍टरी अर्ध नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी उर्वरित अर्धे नत्र 25 की/हे पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी

खरीप ज्वारी

जमीन: मध्य काळी चांगला निचरा होणारी शेणखत/कंपोस्ट खत 5 टन/ हेक्टरी

रासायनिक खते

  • 100 : 50: 50: नत्र, स्फुरद, पालाश केलो/ हेक्टरी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी उर्वरित अर्धे नत्र 50 कि/ हे पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी

मका

जमीन: मध्यम, भारी, खोल, रेतीयुक्त उत्तम निचऱ्याची अधिक सेंद्रिय पदार्थ व जलधारणशक्ती सलेली शेणखत/कंपोस्ट खत 10 ते 12 टन/हेक्‍टरी

रासायनिक खते

  • 120: 60: 40: नत्र, स्फुरद, पालाश किलो/ हेक्‍टरी 1/3 नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी 1/3 नत्र 40 की/ हे पेरणीनंतर 30 दिवसांनी उर्वरित 1/3 नत्र 40 की/ हे पेरणीनंतर 45 दिवसांनी
  • सूक्ष्म अन्नद्रव्य झिंकची कमतरता असल्यास प्रतिहेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे.

Kharif Crops Land and Fertilizer 2025 कापूस

जमीन: काळी, मध्यम ते खोल (90 सें.मी), पाण्याचा चांगला निचरा होणारी, हलक्या क्षारयुक्त पाणथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे शेणखत/कंपोस्ट खत बागायती 10 टन/हेक्‍टरी कोरडवाहू बागायती 5 टन/हेक्‍टरी

रासायनिक खते

  • संकरित कापूस 100: 50: 50: नत्र स्फुरद पालाश किलो/ हेक्‍टरी
  • सुधारित कापूस 80: 40: 40: नत्र स्फुरद पालाश किलो/ हेक्‍टरी
  • बी टी कापूस 125: 65: 65: नत्र स्फुरद पालाश किलो/ हेक्‍टरी
  • पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे पेरणीनंतर 30 दिवसांनी 40% नत्र व पेरणीनंतर 60 दिवसांनी उर्वरित 40 टक्के नत्र द्यावे.
  • नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकाव्यतिरिक्त मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त मॅग्नीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज असते.
  • गंधक 20 किलो/हेक्टरी
  • मॅग्नेशियम सल्फेट २० किलो/हेक्टरी
  • झिंक सल्फेट 25 किलो/हेक्टरी
  • बोरॅक्स 5 किलो/हेक्टरी

Kharif Crops Land and Fertilizer 2025 पेरणी योग्य पाऊस झाल्यास जमिनीत वाफसा येताच खरीप पिकांच्या पेरण्या कराव्यात पेरणी करताना कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या वाहनांचीवाणांची योग्य अंतरावर, योग्यवेळी, योग्य प्रमाणात खत मात्र द्यावी शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच पेरणीचे निर्णय घ्यावेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment