यंदा शेतकऱ्यांच्या पसंतीत कपाशी, सोयाबीन, मका पिकांत कोण राहणार अव्वल कोण दुय्यम, वाचा सविस्तर; Kharif Crop Management 2025

Kharif Crop Management 2025 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यात 202526 या वर्षातील खरीप हंगामात शेतकऱ्याने पुन्हा एकदा कपाशी पिकाला सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनला दुसरी तर मक्याला तिसरे पसंती शेतकऱ्याकडून दिली जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची थेट संवाद साधून मार्गदर्शन सुरू केले आहे.

Kharif Crop Management 2025

तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 45 हजार 532 हेक्टर असून त्यापैकी खरीप हंगामासाठी 42 हजार 170 हेक्टर क्षेत्र राखीव आहे. रब्बी हंगामासाठी 8 हजार 57 हेक्टर आणि उन्हाळी हंगामासाठी केवळ 1 हजार 890 हेक्टर क्षेत्र वापरले जाते.

सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसान भरपाईची कोटी रक्कम; 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना लाभ!

त्यासाठी तालुक्यात कपाशीचे 1 लाख 53 हजार 205 पॉकेट उपलब्ध करण्यात आली असल्याचे पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी सांगितले. दुसऱ्या क्रमांकावर यंदा सोयाबीनला पसंती दिली आहे 4 हजार 110 हेक्टरवर सोयाबीनची होणार यंदा लागवड असून सोयाबीनच्या 3 हजार 157 क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागणी नोंदविली आहे. मग त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर पसंती आहे. 4 हजार 12 हेक्टरवर मक्याची लागवड होत आहे.

WhatsApp Group Join Now

Kharif Crop Management 2025 कृषी विभागाचे मार्गदर्शन

कृषी विभागामार्फत स्थानिक पातळीवर शेती शाळा व इतर जनजागृती कार्यक्रम राबवले जात असून, शेतकऱ्यांना योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, खत व निव्वळ कीड नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आगामी हंगामात अधिक उत्पादन मिळवण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Kharif Crop Management 2025 वर्षातील खरीप पिकांचे नियोजन (हेक्टरमध्ये)

कपाशी3 हजार 641
मका4 हजार 12
सोयाबीन4 हजार 210
तूर296
मूग568
उडीद412

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment