लातूरच्या केशर आंब्याचा गुजरात, मध्यप्रदेश राज्यातही गोडवा! वाचा सविस्तर; Kesar Amba 2025

Kesar Amba 2025 फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा लातूरच्या बाजारात चांगलाच भाव खात आहे. अक्षय तृतीयेपासून आंब्याचे आवक वाढली आहे. इथला केशर आंब्याने राज्यातच नव्हे परराज्यातही गोडवा वाढविला आहे.

Kesar Amba 2025

या केशर आंब्याला गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आदी भागातून मागणी आहे येथील फळ बाजारात दररोज जवळपास 150 टन आंबा विक्रीसाठी येत आहे.

राज्यात कुठे असेल सूर्याचा प्रकोप तर कुठे असेल अवकाळीचा मारा! वाचा सविस्तर;

उन्हाळा आला की द्राक्ष, टरबूज रसाळ फळांना मागणी असते. आता या फळांचा हंगाम सरत आला असून, आंब्याची आवक सुरू झाली आहे. अक्षय तृतीयेपासून आमरसचा घरोघरी बेत सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जण चांगला दर मिळत असल्याने बाजारात आंबे विक्रीसाठी आणतात.

WhatsApp Group Join Now

सध्या गावरान आंबा मिळणे कठीण झाले असून, केशर आंब्याने बाजारपेठेत गोडवा वाढविला आहे.

लातूरचे बाजारपेठ केशर आंब्यासाठी देशभरात नाव रूपाला येत आहे. येथील बाजारातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब आदी ठिकाणाहून व्यापारी आंबा खरेदीसाठी येतात. इथून खरेदी करण्यात आलेला आंबा थेट पर राज्यात जात आहे.

Kesar Amba 2025 केशर आंब्याचे माहेरघर

  • लातूर हे जणू केशर आंब्याचे माहेरघर बनले असल्याचे चित्र सध्या येथील फळबाजारात पहावयास मिळत आहे.
  • येथील बाजारपेठेला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा भाग जवळ पडत असल्याने, या भागातील अनेक बागायतदार लातूरला आंबा विक्रीसाठी आणतात.

बसवकल्याण, हुमनाबाद, जाहीराबाद भागातून आवक

WhatsApp Group Join Now

सध्या येथील फळबाजारात बसवकल्याण, हुमनाबाद , जाहीराबाद, लातूर जिल्ह्यातून आवक आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज 150 टन आवक होत आहे. या आंब्याला परराज्यात मागणी वाढली आहे.

Kesar Amba 2025 काय आहे आंब्याचे दर

फळबाजारात दररोज 150 ते 160 टन केशर आंब्याची आवक सुरू आहे. केशरला प्रति टन 60 हजार ते 1 लाख 10 हजार रुपये पर्यंत विक्री सुरू आहे. किरकोळ विक्री मात्र 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे होत आहे. – बरकत बागवान, ठोक विक्रेते.”

Kesar Amba 2025 कॅरेटला दोन हजार

फळ बाजारात 20 किलो केशर आंब्याचे कॅरेट दीड ते दोन हजार रुपयांना विक्री होत आहे. चवीला गोड असलेल्या केशरने यंदाही आपला रुबाब कायम ठेवला आहे. आंब्याच्या साईज नुसार दर मिळत आहे. सध्या तर स्थिर आहेत. आवक वाढली असून मागणी ही तुलनेने जास्त झाली आहे. – उमर बागवान, ठोक विक्रेते. “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment