Karj Vatap Niyam 2025 मुंबई : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वी निर्गमित करण्यात आले आहे.

यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
देवस्थान इनाम वर्ग 3 (दुमाला), भोगावटा वर्ग 2, रेघेखालील कुळ, प्रकल्पाकरिता राखीव इत्यादी धारण प्रकार असणाऱ्या शेती जमिनीवर अल्प मध्यम व दीर्घ मुदत तसेच व्यावसायिक कर्ज वाटप करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर…
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपसचिव संजय धारूरकर, सत्यनारायण बजाज, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, बँकेचे संचालक तथा माजी आमदार प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजुपुरे, प्रदीप विधाते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यावेळी उपस्थित होते.

देवस्थान इनाम वर्ग 3 (दुमाला), भोगवटा वर्ग 2, रेघेखालील कुळ, प्रकल्पाकरिता राखीव इत्यादी धारण प्रकारच्या जमिनी तारण ठेवता येत नसल्याने या जमीन धारकांना विविध बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
कर्ज मिळण्यासाठी इनाम जमिनी तारण ठेवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, भोगावटा वर्ग 2 च्या जमिनी तारण ठेवणे, कर्ज थकीत झाल्यास त्या जमिनी विक्री करणे.
बोजा चढविण्याचे अधिकार बँकांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद असून तथापि यासंबंधी बँकांना यासंबंधी माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांना कर्ज घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन सुलभता यावी, यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी ही तरतूद सर्व बँकांच्या निदर्शनास आणावी, अशा सूचना यावेळी श्री. बावनकुळे यांनी दिले.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |