Kapus Lagvad 2025 नागपूर चालू हंगामात देशभरात कापसाचे उत्पादन घटले आहे. खर्च वाढला असून, उत्पादकता घटल्याने तसेच कापसाला एमएसपीच्या आसपास दर मिळत असल्याने शेतकरी कापसाला पर्यायी पीक शोधत आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात देशात कापसाचे पेरणी क्षेत्र किमान 18 ते 20 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज तज्ञ यांनी व्यक्त केला आहे.

देशात कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र 124 लाख हेक्टर तर महाराष्ट्राचे पेरणी क्षेत्र सरासरी 42 लाख हेक्टर आहे. उर्वरित कापूस उत्पादक आठ राज्यांमधील पेरणी क्षेत्र महाराष्ट्रातील क्षेत्राच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. सन 2021-22 च्या हंगामात कापसाच्या दराने प्रतिक्विंटल 11 हजार रुपयांची पातळी ओलांडली होती.
आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार, ‘या’ निकषांवर जाणून घ्या सविस्तर;
यापूर्वी आणि नंतर कापसाचे दर एमएसपी दराच्या आसपास राहिले. कृषी निविष्ठांची दरवाढ व प्रतिकूल हवामानामुळे कापसाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा ही दर मिळाला नाही. कापसाचे पेरणी क्षेत्र घटल्यास उत्पादन घटेल. मागणी व वापर स्थिर राहिला तरी दर दबावत ठेवण्याचे कारस्थान सुरूच राहणार आहे.

Kapus Lagvad 2025 मका व तुरीला प्राधान्य
मागील दोन वर्षापासून मका व तुरीला एमएसपीपेक्षा अधिक दर मिळाला आहे. मक्याच्या पिकाला कालावधी 100 ते 120 दिवसांचा असल्याने शेतकऱ्यांना किमान दोन पिके घेता येतात. तुरीच्या पिकाचा कालावधी 150 ते 180 दिवसांचा असला तरी तुरीला किमान तीन ते चार बहार येतात. कापसाच्या तुलनेत या दोन्ही पिकांचा उत्पादन खर्च कमी असल्याने शेतकरी या पिकांकडे वळणार आहेत.
Kapus Lagvad 2025 आकडेवारीचा घोळ
देशात कापूस उत्पादनाची योग्य आकडेवारी गोळा करण्याचे प्रभावी यंत्रणा नाही. दरवर्षी महाराष्ट्रात किमान 100 ते 115 लाख गाठी कापसाचे उत्पादन होत असले तरी ते 77 ते 85 लाख गाठींच्या आसपास दाखविले जाते. कापड उद्योजकांच्या काही संस्था या चुकीच्या आकडेवारीचा कापसाचे दर दबावत ठेवण्यासाठी वापर करतात.
Kapus Lagvad 2025 कापसाचे पेरणी क्षेत्र (लाख-हेक्टर)
वर्ष | देश | महाराष्ट्र |
2024-25 | 112.947 | 40.860 |
2023-24 | 123.423 | 42.223 |
2022-23 | 127.572 | 42.224 |
2021-22 | 119.664 | 39.410 |
2020-21 | 129.468 | 42.251 |
2019-20 | 127.674 | 44.052 |
2018-19 | 120.641 | 41.233 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |