Kapus Bajarbhav 2025 सेलू : नोव्हेंबर पासून कापूस खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे. या दरम्यान आज ना उद्या भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, फेब्रुवारी संपला तरी अपेक्षित भाववाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात पांढऱ्या सोन्याची विक्री केली.

मात्र, मार्च महिन्याच्या मध्यापासून कापसाच्या भावात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी खाजगी बाजारपेठेत हंगामातील उच्चांकी 7,930 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कापूस विक्री केल्यानंतर दर वाढ होत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी मानसून वेळेवर दाखल झाल्यानंतर जुन अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर कापसाचे पीक बहरात आले होते.
आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा शुल्काबाबत शासनाचा नवा जीआर, वाचा सविस्तर;
शेतकऱ्यांनीही चांगले उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खत, औषधे फवारणी करून मशागत केली होती. परंतु, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वाधिक नुकसान कापूस आणि सोयाबीन पिकाचे झाले होते. अनेक दिवस शेतात पाणी साचल्यामुळे कापूस पिवळा पडला होता. परिणाम दोन वेचणीतच कापसाचा झाडा झाला. सुरुवातीला खासगी बाजारात कापसाला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयकडे 7,521 या हमीभावाने कापसाची विक्री केली.

सीसीआयने 15 मार्चपर्यंत 3 लाख 91 हजार क्विंटल कापूस खरेदी करून केंद्र बंद केले. मात्र, मार्च महिन्याच्या मध्यापासून कापसाच्या दरात सतत वाढ होत आहे. शहरातील खाजगी बाजारात कापसाची खरेदी सुरू आहे. सोमवारी हंगामातील उच्चांकी 7,930 रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच सीसीआय केंद्रावर कापसाची विक्री केली आहे.
मात्र, कापसाचे भाव वाढतील या आशेवर घरातच कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचा भाव वाढीमुळे फायदा होताना दिसत आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दररोज कापसाच्या दरात भाव वाढ होत असल्यामुळे खाजगी बाजारात कापसाची आवक वाढली आहे. उशिरा का होईना कापसाच्या भावामध्ये झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये किंचितसे समाधान व्यक्त होत आहे.
Kapus Bajarbhav 2025 विक्री नंतर भाव वाढ
- हंगामाच्या सुरुवातीला 7,200 ते 7,300 पासून कापसाचे दर होते. मार्च अखेरीपर्यंत कापसाच्या दरात चांगलीच तेजी आल्याचे दिसत आहे.
- सोमवारी 7 हजार 930 रुपये दर मिळाला असून 8 हजारांच्या टप्प्याकडे कापसाची वाटचाल सुरू आहे. मात्र, कापूस विक्री केल्यानंतर भाववाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
33 हजार हेक्टर वर लागवड
सेलू तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक मदार अवलंबून आहे.
गतिवर्षी तालुका सर्वाधिक 33 हजार 330 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला.
Kapus Bajarbhav 2025…..5 लाख क्विंटल कापूस खरेदी
सीसीआय कडून 3 लाख 21 हजार क्विंटल कापूस खरेदी करून केंद्र बंद करण्यात आले आहे. तर खासगी बाजारात आज पर्यंत 20 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे सेलूत आजपर्यंत जवळपास 5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |