Kanda Sathvanuk 2025 एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाला प्रमाणावर झालेले आहे.

विषम वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांदा पिक पोसण्याच्या आधीच माना पडल्या आहेत.
काजू बी मधून काजू काढण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया करतात? वाचा सविस्तर;
त्यामुळे कांदा पूर्ण पाने पोसला नसून गोलटी आणि चिंगळी कांद्याचे अधिक प्रमाण काढणी दरम्यान आढळून येत आहे. कांदा चाळीमध्ये दीर्घ काळ टिकावा यासाठी खालील उपाय योजना शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे.
WhatsApp Group
Join Now

Kanda Sathvanuk 2025 खालील कांदा उपाययोजना!
- चाळीमध्ये मागील वर्षाच्या साठवणुकीतील कांद्यावरील बुरशी आणि काही कीटकांच्या अवस्था सुप्तावस्थते असल्याने त्यांच्या नियंत्रणासाठी चाळ निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
- निर्जंतुकीकरणासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची फवारणी करावी.
- कांदा काढल्यानंतर शेतात 3 ते 4 दिवस अशा पद्धतीने सुकवावा की दुसऱ्या ओळीच्या पातीने पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकावा.
- Kanda Sathvanuk 2025 या पद्धतीने 3-4 दिवस साठवणूक केलेल्या कांद्याची पूर्ण सुकलेली पाच 3 ते 4 सें.मी. लांब नाळ ठेवून कापावी.
- पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करून जोडकांदा, डेंगळे आलेला कांदा आणि चिंगळी कांदा निवडून वेगळा करावा.
- चांगला कांदा एकत्र गोळा करून सावली ढीग घालून 10 ते 15 दिवस राहू द्यावा.
- 55 ते 75 मि. मी. जाडीचे कांदे साठवणीत ठेवावेत. लहान व गोलटी कांदा साठवणीत लवकर सडतो.
- Kanda Sathvanuk 2025 कांदा उपटताना जखमा झालेला कांदा चाळीत लवकर खराब होतो आणि त्याचा संसर्ग इतर कांद्यांना होत असल्यामुळे असा कांदा निवडून वेगळा करावा. त्याची चाळीत चांगल्या कांद्यासोबत साठवण टाळावी.
- कांदा चाळीत साठवताना पाखी मध्ये 4 ते 5 फुटां पेक्षा जास्त थर लावू नये. चाळीमध्ये हवा खेळती राहील यासाठी उपाययोजना कराव्यात.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |