साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय; वाचा सविस्तर; Kanda Sathvan 2025

Kanda Sathvan 2025 कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. देशाचे 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात आहे.

Kanda Sathvan 2025

नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र, या महत्त्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरूपी अस्थिरता आढळते. यासाठी साठवणूक हा चांगला पर्याय ठरू शकतो.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात फिरणार पाणी; या 9 उपसा सिंचन योजनेसाठी 504 कोटी; 

Kanda Sathvan 2025 कांदा सावलीत साठवण्याचे फायदे !

  • कांदा सावलीत वाळवला तर या काळामध्ये कांद्यामध्ये साठवलेली उष्णता हळूहळू बाहेर पडून कांद्याच्या बाहेरील सालीमधील पाणी पूर्णपणे आटून त्यांचे पापुदऱ्यात रूपांतर होते व त्याला आपण कांद्याला पत्ती सुटणे असे म्हणतो.

WhatsApp Group Join Now
  • हे पापुद्रे किंवा पत्ती साठवणुकीत कवच कुंडलाचे काम करून कांद्याला सर्व प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण देतात.
  • अतिरिक्त उष्णता व पाणी निघून गेल्यामुळे असा कांदा सडत नाही.
  • कांद्याभोवती पापुदऱ्याचे आवरण तयार झाल्यामुळे वातावरणातील आद्रता व रोगकिडीपासून त्यांचा बचाव होतो.
  • साठवणुकीत बाष्पीभवन रोखल्यामुळे वजनातील घट रोखली जाते.
  • तसेच कांद्याची श्वसनीय क्रिया मंदावल्यामुळे कांदा सुप्त अवस्थेत जातो व त्याला 4-5 महिने मोड फुटत नाहीत.
  • या सर्व साठवणुकीमधील फायद्यांसाठी कांदा सावलीत पातळ थर देऊन 21 दिवसांकरिता वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment