अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर; Kanda Krushi Salla 2025

Kanda Krushi Salla 2025 नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात काही भागात दि. 31 मार्च ते 02 एप्रिल 2025 दरम्यान मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट, 40 ते 50 किमी प्रति तास वेगासह सोसाट्याचा वारा तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने खालील उपाययोजना कराव्यात…

 Kanda Krushi Salla 2025

WhatsApp Group Join Now

Kanda Krushi Salla 2025 कांदा पिकासाठी सल्ला!

सद्यस्थितीत कांदा पिकात ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

राज्यासाठी यंदाचा उन्हाळा कसा असेल ‘IMD रिपोर्ट’ वाचा सविस्तर;

तरी जांभळा व काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब @15 ग्रॅम किंवा ऍझोक्सीस्ट्रोबीन @10 मिली किंवा टेब्यूकोनझोल @10 मिली व त्यासोबत 10 मिली स्टीकर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.

WhatsApp Group Join Now

Kanda Krushi Salla 2025 डाळिंबासाठी सल्ला!

  • सर्व नुकसान ग्रस्त फळे काढून तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटून बागे बाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात.
  • छाटलेल्या फांद्यांना आणि खोडावर 10 टक्के बोर्डोपेस्ट लावावी. त्यानंतर 1 टक्के बोडो मिश्रणाची फवारणी करावी.
  • गारपिटीमुळे झालेल्या फळांची काढणी करून फळे कुजलेली नसल्यास त्वरित विक्री करावी.
  • नुकसानग्रस्त फळे एकत्र करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावेत.
  • फळांच्या काढणीपूर्वी बोरिक ऍसिड दोन ग्रॅम लिटर पाणी या प्रमाणात संरक्षणात्मक फवारणी घेतल्यास झालेल्या फळांमध्ये कोज टाळण्यास मदत होते.
  • शक्य झाल्यास गारपीटीनंतर लगेच बोरीक ऍसिड @2 ग्रॅम / लिटर झिंक सल्फेट @2.5 ग्रॅम / लिटर + चुना @ 1.25 ग्रॅम / लिटर मॅन्कोझेब @2.5 ग्रॅम / लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

सामान्य उपाययोजना…

  1. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपिट किंवा हलका ते मध्यम जोरदार पावसाचा इशारा लक्षात घेता पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे संरक्षण करावे.
  2. जर शेतकरी शेतात असतील तर त्यांनी त्वरित जवळपास निवारा शोधावा झाडाखाली आश्रय घेणे टाळावे. निवारा उपलब्ध नसल्यास उघड्यावर दबा धरून बसावे आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे. विद्युत उपकरणे किंवा वायर केबलचा संपर्क टाळावा / कोणत्याही धातू, ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींचा संपर्क टाळावा. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी.

Kanda Krushi Salla 2025 विशेष सल्ला!

सामान्य भाजीपाला आणि फळपिके. सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाजे लक्षात घेता नवीन लावलेली फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला पिकांना बांबू किंवा काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment