Kanda Kapni 2025 कांदा साठवणुकीत अधिक काळ टिकण्यासाठी वजनात घट येऊ नये यासाठी कांदा काढणी काटणी कशी करावी या विषयी महत्त्वाच्या बाबी पाहुया…

WhatsApp Group
Join Now
महत्त्वाच्या बाबी पाहुया…
- कांदा लागवडीनंतर 100 ते 110 दिवसात काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाला की नवीन पात येण्याचे थांबते.
- कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी तोडावे व 50 टक्के माना पडल्यानंतर कांदा काढणे सुरुवात करावी.
- पातीचा रंग पिवळसर दिसू लागतो. रांगडा कांदा साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये काढणीसाठी तयार होतो.
- याच वेळेस कांद्याच्या वरच्या पातीचा भाग मऊ होऊन आपोआप वाळतो व पात कोलमडते. यालाच आपण मान पाडणे असे म्हणतो.
शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीला ठरणारा वरदान;
- कांदा पात सुकेपर्यंत शेतात वाळविल्यानंतर प्रथम कांद्याच्या मानेला पिळ देऊन 3 ते 5 सें.मी. (एक ते दीड इंच) मान ठेवूनच कांद्याची पात कापावी.
- हा महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे पुढील काळात कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहून सूक्ष्म जीवाणूंच्या शिरकावामुळे कांदा सडणे, कांद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन वजनात घट होणे, कांद्याच्या तोंडातून कांद्याला मोड येणे यासारख्या साठवणुकीतील नुकसानींना आळा बसतो.
- कांद्याला अजिबात मान न ठेवता, कांद्याचे तोंड उघडं ठेवून कांद्याची पात पूर्णपणे कापली तर कांदे साठवणुकीत टिकत नाहीत व मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवते.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |