Kalingad Bajarbhav Update 2025 सध्या कलिंगडची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या अवकामुळे कलिंगडच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी 30 रुपये किलो असलेला भाव सध्या 10 रुपये किलो प्रमाणे खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कलिंगड लागवडीवर झालेला खर्च वसूल करणेही अवघड झाले आहे.

Kalingad Bajarbhav Update 2025 सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील उजनी व सीना कोळगाव धरण क्षेत्रात कलिंगडची मोठ्या प्रमाणात लागवड होते. उन्हाळ्यात कलिंगडला मागणी वाढून जास्त बाजार भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवड केली.
अवकाळी पावसानंतर पिकांचे असे करा व्यवस्थापन;
10 रुपये प्रति किलोप्रमाणे कलिंगडची विक्री होती. परंतु, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मागील दोन आठवड्यात चांगल्या प्रतीच्या कलिंगडला 30 रुपये किलोचा भाव मिळाला होता. पण, आता 10 रुपये किलो वरून लिलाव होत आहे.

“कलिंगडचा हंगाम साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू होतो आणि जून पर्यंत चालतो. आवक वाढल्याने भाव पडले. उन्हाळ्यात ते 25 ते 30 रुपये दरम्यान पोहोचतील, अशी शक्यता वाटत असताना किलोला 10 रुपयांवर आले आहेत. – आण्णासाहेब सुपरनवर, खांबेवाडी.”
40 ते 50 रुपये किलोला भाव मिळणे अपेक्षित…
कलिंगड लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळते. 9 हजार रोपांची लागवड होते. यात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही मोठा आहे.
Kalingad Bajarbhav Update 2025 त्यामुळे कलिंगडला किमान 40 ते 50 रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याचा मातीमोल भाव शेतकऱ्यांना तोट्यात टाकणार आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Kalingad Bajarbhav Update 2025 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कलिंगड आवक व दर
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
| अकलूज | लोकल | क्विंटल | 25 | 300 | 500 | 400 |
| पुणे-मांजरी | – | क्विंटल | 8 | 3000 | 4000 | 3500 |
| मुंबई-फ्रुट मार्केट | – | क्विंटल | 4745 | 1200 | 1600 | 1400 |
| खेड-चाकण | – | क्विंटल | 240 | 800 | 1200 | 1000 |
| श्रीरामपूर | – | क्विंटल | 25 | 500 | 1000 | 750 |
| सोलापूर | लोकल | क्विंटल | 190 | 300 | 1000 | 500 |
| सांगली – फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 60 | 500 | 1200 | 850 |
| पुणे | लोकल | क्विंटल | 1148 | 500 | 1200 | 1000 |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |