शाळूच्या कडब्याला मागणी वाढली; शेकडा कसा मिळतोय दर ? वाचा सविस्तर; Kadba Vairan Market 2025

Kadba Vairan Market 2025 खोची : ऊसापेक्षा शाळेचा यंदा चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी खुश आहे. त्यातच हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागल्याने वैराणीसाठी कडबा या सुक्या चाऱ्याला मागणी वाढली आहे.

Kadba Vairan Market 2025

शेकडा 2 हजार 500 ते 3000 रुपयापर्यंत दर गेला आहे. शाळूचे उत्पादन चांगले निघण्याबरोबरच कडबा सुद्धा अधिकचा भाव मिळवून देऊ लागला आहे. आडसाली लावणीचे क्षेत्र कमी झाल्याने चारा टंचाई असल्याचे दिसून येत आहे.

हातकणंगले तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. पशुधन संख्या ही चांगली आहे. दुधाचे उत्पादन उत्पादनही तुलनेने अधिक आहे. नैसर्गिक रचनाही मुबलक चारा उपलब्धता असणारी आहे.

ड्रोनच्या मदतीने ई-पिक पाहणी! सरकारचा नवा उपक्रम; 

परंतु, मान्सूनने दमदार हजेरी लावली होती. पावसाचे जास्त प्रमाण झाल्याने ऊस पिकावर परिणाम झाला. वाढ कमी झाल्याने उत्पादनही घटले. त्यातच यंत्राने तोडणीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वाडे मिळणे कमी झाले.

जेवढं काही वाडे मिळत होते, त्यासाठी धावाधाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातच एक महिना अगोदर कारखान्याचे हंगाम संपले. त्यामुळे वैरणीचा प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली.

WhatsApp Group Join Now

जुलैमध्ये आडसाली लावण केलेले क्षेत्र गतीवर्षीपेक्षा तालुक्यात एक हजार हेक्टरने घटले आहे. या उसाचा पाला वैरणीसाठी शेतकरी शोधू लागले आहेत.

अनेक ठिकाणी ज्या शेतकऱ्याचा ऊस दमदार आला आहे, त्या ठिकाणी उसाचा पाला काढू नये अशा सूचना करणारे फलक लावले आहेत. यामुळेच वैरण टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शाळूच्या कडब्याचा भाव चांगलाच वधारला आहे. तालुक्यात 4 हजार 200 हेक्टर क्षेत्रात शाळू करण्यात आला. निसर्गाची चांगली साथ मिळाल्याने सुरुवातीपासून शाळूची उगवण व वाढ चांगली झाली.

वातावरणाचा योग्य परिणाम या पिकावर झाल्याने उत्पादन ही चांगले निघाले आहे. एकरी 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

दरम्यान, पशुपालक ओल्या चाऱ्याबाबत उसावरच जास्त अवलंबून आहेत. हत्तीघास, कडवाळ वैराणीसाठी करणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now

Kadba Vairan Market 2025 वैरणीसाठी मका !

तालुक्यात मका पिकाचे हे क्षेत्र वाढले आहे. वैरणीसाठी केलेले क्षेत्र 100 टक्के हेक्टरपर्यंत आहे. 100 टक्के अनुदानावर बियाणे मिळाल्याने त्याचा वापर वाढला आहे. मक्याची वैरण उन्हाळ्यात सहायक ठरू लागली आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment