Kadba Bajarbhav 2025 मोडनिंब : सिंचन योजनांमुळे शेतकरी आता द्राक्ष, डाळिंब, केळी या फळबागांसह ऊस पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या कडव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

त्यामुळे मोडनिंबच्या आठवडा बाजारात दर शनिवारी तुळजापूर तालुक्यातून जवळपास 80 गाड्या कडब्याची आवक होत आहे. त्या कडब्याला 1800 ते 2200 रुपये प्रति शेकडा दर मिळत आहे.
मोडनिंब व परिसरातील माढा पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील सिंचन योजनेमुळे फळबागांची लागवड वाढली आहे. शिवाय उसाचे क्षेत्रही वाढले आहे. माढा व पंढरपूर तालुक्यात ऊस, द्राक्ष, केळी, डाळिंब हे पीक प्रामुख्याने घेतली जात आहे.
केळी बागेतील टरबूज आंतरपिकातून एकरी दीड लाखाचा उत्पन्न, वाचा सविस्तर…
माढा तालुक्यातील काही शेतकरी जिराईत ज्वारीची पेरणी करीत होते. कारण वर्षभर दारात असलेल्या जनावरांसाठी चारा व कुटुंबाला पुरेल एवढे धान्य पिकवण्यासाठी धडपड असते.
मात्र नगदी पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. 1800 तालुक्यातील ते 2000 रुपये प्रति शेकडा दर मिळत आहे.

दारात बांधलेल्या जनावरांना कडबा खरेदी करायचा म्हणून आठवडा बाजारात मोहोळ येवती अन्य भागातील अनेक शेतकरी मोडनिंबला कडबा खरेदीसाठी आले होते.
इतर पिके व फळबाग असल्यामुळे आम्ही ज्वारीची पेरणी करत नाही. त्यासाठी मोडनिंब आडत बाजारात अथवा बार्शीतून ज्वारी खरेदी करतो. कडबा अन्य जिल्ह्यातून मोडनिंबला येत असल्यामुळे आम्ही दरवर्षी कडबा खरेदी करतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
Kadba Bajarbhav 2025 मराठवाड्यातून विक्रीला येतोय कडबा
विक्रेते कळमण, तुळजापूर, तामलवाडी, येथून आलेले वजीर शेख, सोपान हजारे, यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी सांगितले की कडब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे.
आम्ही जनावरांना पाहिजे तेवढं कडबा ठेवून अन्य कडबा विक्रीसाठी आणतो. त्याचा दर ही प्रति शेकडा 1800 ते 2200 मिळतो, असे सांगितले.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |