Jwari Kharedi 2025 यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली असली, तरी खुल्या बाजारात दर कोसळल्याने हमी केंद्र हाच यांचा एकमेव आधार उरला आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या 3,371 प्रतिक्विंटल दराने ज्वारी खरेदी 30 जून पर्यंतच मुदत आहे.

जिल्ह्याचे उद्दिष्ट 50,000 क्विंटल असताना, अजूनही 42,000 क्विंटल ज्वारीची खरेदी बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आणि हमी केंद्र चालकांची अवस्था चिंताजनक झाली असून, केंद्र बंद होऊ नये यासाठी मुदतवाढीची जोरदार मागणी सुरू आहे.
मागणी घटल्याने हिरव्या मिरचीचे भाव घसरले; वाचा काय मिळतोय मिरचीला दर…
Jwari Kharedi 2025 यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली असली, तरी बाजारातील घसरलेल्या दरांमुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

अशा परिस्थितीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी दराने (3,371 प्रतिक्विंटल) सुरू असलेली ज्वारी खरेदी हीच एकमेव आशेची किरण ठरत आहे. मात्र, ही खरेदी फक्त 30 जून पर्यंतच होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
Jwari Kharedi 2025 हमीभाव केंद्र एकमेव आधार
सध्या बाजार समितीमध्ये ज्वारीचे दर 1,800 ते 2,000 रुपये पर्यंत प्रतिक्विंटल इतके खाली घसरले आहेत, जे की हमी दराच्या तुलनेत तब्बल 1,300 ते 1,500 ने कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एका क्विंटल मागे मोठ्या तोट्याचा सामना करावा लागत आहे.
Jwari Kharedi 2025 हमी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हमी केंद्रावर आपला माल विक्रीसाठी नेत आहेत. अनेक नव्याने सुरू झालेल्या केंद्रावरही शेतकऱ्यांचा ओघ वाढला आहे. मात्र, हमी खरेदीची मुदत 30 जून पर्यंत असल्याने केंद्र चालकही अडचणीत आले आहे. शिल्लक असलेल्या ज्वारीचा खरेदीवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jwari Kharedi 2025 उद्दिष्ट मोठं, वेळ मर्यादित
यवतमाळ जिल्ह्यासाठी ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट 50 हजार क्विंटल ठेवण्यात आले आहे. पण आतापर्यंत फक्त 8 हजार क्विंटलच खरेदी झाली आहे. याचा अर्थ अजूनही 42 हजार क्विंटल ज्वारी खरेदी होणे शक्य आहे, परंतु यासाठी वेळ वाढवणे आवश्यक ठरत आहे.
शेतकऱ्यांची मागणी 31 जुलै पर्यंत मुदत वाढवावी
Jwari Kharedi 2025 शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर ज्वारी साठा असून, ते हमी दरात विक्रीसाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने देखील ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
सध्याची आकडेवारी (यवतमाळ जिल्हा)
उन्हाळी ज्वारीची लागवड | 10,000 हेक्टर |
हमी दर | 3,371 प्रति क्विंटल |
बाजार भाव | 1,800-2,000 प्रति क्विंटल |
आम्ही खरेदीचे उद्दिष्ट | 50,000 क्विंटल |
आतापर्यंत खरेदी | 8,000क्विंटल |
मुदत | 30 जून |
Jwari Kharedi 2025 शेतकरी अधिक संकटात सापडलेला असताना, मुदतीच्या अडथळ्यामुळे हमी दराचा फायदा मिळवणे ही अवघड होत आहे. हमी केंद्राची मुदत वाढवण्याचा निर्णय लवकर होणे गरजेचे आहे, अन्यथा हजारो कुंटल ज्वारी बाजारातील तोट्यात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |