Jayakawadi Dam 2025 पैठण तालुक्यातील तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही दररोज होणाऱ्या पाणी उपसापेक्षा 6 पट वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. पैठण तालुक्यातील मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम जायकावाडी धरणाच्या पाणी साठ्यावर होताना दिसत आहे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन पटीने जास्त आहे.

मागील वर्षी 15 एप्रिल रोजी धरणात फक्त 15.20 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात याच दिवशी 47.39 टक्के पाणीसाठा आहे. धरणात सध्या 1767.01 दलघमी पाणीसाठा असून त्यात 1028.90 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षासाठी जायकवाडी अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नव्हते. तसेच पिण्याच्या पाण्यातही काही ठिकाणी कपात करण्यात आली होती.
महिनाभरात उजनीतील तब्बल 2 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन, धरण साठ्याचा 1 टक्क्याकडे प्रवास, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं!
Jayakawadi Dam 2025 जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजी नगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकिन, चितेगाव, पैठणचा डीएमआयसी तसेच जालना सह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दररोज केवळ 0.29 दलघमी पाणी उपसा केला जातो; मात्र उष्णता वाढल्यामुळे दररोज जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे.

Jayakawadi Dam 2025 मार्च महिन्यात 55.285 दलघमी बाष्पीभवन झाले असून मंगळवारी बाष्पीभवनाचा वेग 1.988 दलघमी होता. यावर्षी जायकवाडी धरण 100 टक्के भरले होते. धरणात 111.2556 टीएमसी पाणी आले. तर विसर्ग धरणातून 862.9615 टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.
Jayakawadi Dam 2025 तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार?
- पैठण तालुक्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- 15 एप्रिल रोजी मागील वर्षी धरणात फक्त 15.20 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात याच दिवशी 47.39 टक्के पाणीसाठा आहे.
” जायकवाडी धरणात आज रोजी 47.39 टक्के पाणीसाठा असून, डाव्या कालव्यातून 2150 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बाष्पीभवनाचा आजचा वेग 1.988 दलघमी आहे. धरणातून पिण्यासाठी जेवढे उपसले जाते, त्याच्या सहा पटीने बाष्पीभवन होत आहे. यावर्षी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही. – विजय काकडे शाखा अभियान “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |