Intercropping with Turi is Beneficial 2025 अवर्षण प्रवन भागातील पावसाचे प्रमाण पाहिल्यास कोरडवाहू पिकासाठी वर्षाला एकच पीक घेण्याची पद्धत शेतकऱ्यांची प्रचलित आहे. पाऊस समान खरिपात किंवा रब्बीत योग्य असल्यास पिके हातात मिळतात. अन्यथा खरीप तरी जाते किंवा रब्बी तरी जाते. पाऊस समान योग्य नसल्यास दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते.

Intercropping with Turi is Beneficial 2025 गेल्या चार-पाच वर्षापासून हवामानात झालेला बदल गारपीट अवकाळी पाऊस दुष्काळ टंचाई इत्यादीला. बळीराजा सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत सुधारित परंतु प्रभावी तंत्रज्ञान म्हणजे आंतरपीक पद्धत आंतरपीक पद्धतीमुळे दुष्काळाची झळ कमी बसते आणि पाऊस समान योग्य असल्यास हेक्टरी अधिक धान्य उत्पादन होते. खरीप हंगामात आंतरपीक पद्धती योग्य आहे.
पाचोडमध्ये आंबा बहार मोसंबीचा बाजार मंदावला; जाणून घ्या सविस्तर,
Intercropping with Turi is Beneficial 2025 अवर्षण भागातील कोरडवाहू क्षेत्रात बाजरी, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग, मटकी इत्यादी महत्त्वाची खरीप पिके आहेत. अति उथळ जमिनीवर सुधारित गवतांबरोबर हुलगा किंवा मटकी आणि उथळ जमिनीत बाजरी किंवा सूर्यफूल+तूर (2.1) ओळी या प्रमाणात आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे.

कमी पाण्यात, कमी कालावधीत, कमी उत्पादन खर्चात तूर किंवा तूर + अंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेच त्याचबरोबरीने जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पट्टा पद्धतीत तूर पेरणी केल्यानंतर जोड ओळीतील प्रत्येक तुरीच्या झाडास भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा मिळते त्यामुळे फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वाढते त्यामुळे उत्पादकतेत वाढ होते.
Intercropping with Turi is Beneficial 2025 पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फेरपालट म्हणून तुरीच्या पिकाचा विचार केला पाहिजे. तुरीच्या पिकातून जमिनीवर पडणारा पालापाचोळा यांपासून मिळणाऱ्या सेंद्रिय खतामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एकेरी अर्धा टन सेंद्रिय खत जमिनीस मिळते तूर पिकामुळे पुढील पिकास एकेरी 50 ते 80 किलो नत्र मिळते. तुरीच्या वाढीच्या काळात जमिनीवर पालापाचोळ्याचे जे अच्छादन तयार होते त्यामुळे जमिनीवरील ओलीवर येणाऱ्या इतर तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

पारंपारिक पद्धतीत तुरीच्या दोन ओळीतील अंतर दोन ते अडीच फूट ठेवतात. मात्र, त्यामुळे तुरीवरील फवारणी करण्यात अनेक अडचणी येतात. तुरीच्या दोन ओळीत 90 सेंटीमीटर अंतर आणि 180 सेंटीमीटर पट्टा परत पुन्हा 90 सेंटीमीटर अंतराच्या तुरीच्या जोड ओळी या प्रयोगातून तुरीची उत्पादकता वाढवण्याबरोबरच आंतरपिकाचा लाभ मिळवता येईल. तुरीच्या दोन ओळीत जी सरी पडली जाईल तिच्यात पावसाचे पाणी मुरेल आणि या ओलाव्याचा तुरीला लाभ होईल. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जातात त्यामुळे जमीन भुसभुशीत पोकळ होते.
Intercropping with Turi is Beneficial 2025 आंतरपिकांसाठी निवडावयाच्या तुरीच्या जाती या मध्यम मुदतीच्या असाव्यात अलीकडच्या काळात तुर+ सोयाबीन (1.3 किंवा1.4) पद्धतीने पेरल्यास दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या ओळीमध्ये 30 सेंटिमीटर तर दोन रोपांमध्ये 10 सेंटिमीटर अंतर ठेवावे आणि सोयाबीनचे 3ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरावी तुरीच्या दोन ओळीतील अंतर 120 cm येते तुरीच्या दोन रूपातील अंतर 20 सेंटीमीटर ठेवावे ठेवावे सोयाबीन बियाणे 60 ते 65 किलो प्रति हेक्टर तर 5 किलो तुरीचे बियाणे प्रति हेक्टरला पुरेसे होते.
तुर पिकाचे खत व्यवस्थापन
प्रती हेक्टरी चांगले कुजलेले 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुलावण्याच्या वेळी शेतात पसरावे. तुरीला 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद प्रती हेक्टरी शिफारसीत खत मात्र पेरणीच्या वेळेस द्यावी. त्यासाठी 50 किलो युरिया व 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे. अथवा125 किलो डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) द्यावे.
Intercropping with Turi is Beneficial 2025: आंतरपीक पद्धतीचे फायदे!!
वर्षात दोन तीन पिक घेता येतात.
जमिनीस कमी मशागत लागते.
पावसाचा व सूर्यप्रकाश कालावधीचा उपयोग करता येतो.
जमिनीतील ओलावा अन्नद्रव्य व जागा यांचा पुरेपूर उपयोग होतो.
जमिनीची सुपीकता व पोत सुधारतो.
हेक्टरी अधिक उत्पादन होते.
विपरीत व प्रतिकूल हंगामात एखाद्या तरी पीक हाती येते.
एकूण मशागत खर्च कमी हेक्टरी नफ्याचे प्रमाण अधिक होते.

अवर्षण प्रवन क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत घायवयाची अंतरपिके
पावसाचे आगमन आठवडा | आंतरपिके |
जुलै पहिला आठवडा | बाजरी+ तुर(2.1), सूर्यफूल+तुर(2.1) गवार+ तूर(2.1), गवार+ एरंडी(2.1) |
जुलै दुसरा आठवडा | सूर्यफूल+ तुर(2.1), गवार+ तूर(2.1) |
ऑगस्ट पहिला आठवडा | सूर्यफूल+ तुर(2.1), एरंडी+ दोडका (मिश्र पीक) |
ऑगस्ट पहिला आठवडा | सूर्यफूल+ तूर(2.1) |
Intercropping with Turi is Beneficial 2025 वरील माहितीवरून असे दिसून येते की आंतरपीक पद्धतीमुळे अनेक प्रकारचे फायदे मिळवणे शेतकरी बंधूंना जास्त नफा मिळण्यास मदत होते. आणि तेही कमी जागेतून व कमी वेळात शेतकरी बंधूंनी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब आपल्या शेतावर अवश्य करा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |