योग्य वेळी करा खरीप पिकांची आंतरमशागत!! Intercropping of Kharif Crops 2025

Intercropping of Kharif Crops 2025 राज्यात यंदाच्या वर्षी बहुतांश ठिकाणी वरुणराजाने वेळेवर हजेरी लावल्याने 100 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, सूर्यफूल, मूग, उडीद, मटकी, हुलगा, चवळी, भुईमूग, तसेच भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

Intercropping of Kharif Crops 2025

Intercropping of Kharif Crops 2025 पेरलेल्या पिकांमध्ये सध्या आंतरमशागतीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये नांग्या भरणे, विरळणी, कोळपणी, खुरपणी, खांदणी, वर खतांची मात्र देणे, इत्यादी. आंतरमशागतीची कामे योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्वरित करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बंधूनी कोणत्या पिकात केव्हा कशाप्रकारे आंतर मशागत करावी याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.

कोरडवाहू फळझाडांना द्या संतुलित खते!!

नांग्या भरणे: Intercropping of Kharif Crops 2025

पेरणी नंतर बऱ्याच वेळा उगवण नीट न झाल्यामुळे वाफ्यात सऱ्यात रिकाम्या जागा दिसतात अशा वेळी टोकण पद्धतीने किंवा रोपांची लागवड करावी साधारणतः पेरणी नंतर 8-10 दिवसात नांग्या भराव्यात जेणेकरून आधीच्या आणि नंतर लावलेल्या पिकाच्या वाढीत जास्त फरक नाही यामुळे रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.

WhatsApp Group Join Now

विरळणी: Intercropping of Kharif Crops 2025

बऱ्याच वेळात पेरणीमुळे योग्य अंतर राहत नाही पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी व 22 ते 25 दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी त्यामुळे रोपातील अंतर योग्य राहते.

कोळपणी:

तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करणे गरजेचे ठरते. तणांचा प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणता 2 ते 3 कोळपण्या पेरणीनंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी. कोळपणीसाठी विविध प्रकारची पिकानुसार कोळपी उपलब्ध आहेत याचा वापर करावा.

खुरपणी/निंदणी:

तणांमुळे पिकाला अन्नद्रव्य पाण्याची कमतरता भासते. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, उत्पादनात घट येते. यासाठी तणांचा प्रादुर्भाव कमी करून पीक तणविहरीत ठेवणे गरजेचे आहे. साधारणता दोन ते तीन खुरपण्या पिकनुसार आणि तणांच्या प्रादुर्भावानुसार कराव्यात वेळेअभावी अथवा मजुरांअभावी खुरपणी शक्य नसल्यास रासायनिक तण नियंत्रण ठेवा वापरून तणांचा वापर कमी करता येतो.

WhatsApp Group Join Now

खांदणी: Intercropping of Kharif Crops 2025

जमिनीत वाढणाऱ्या भागांची वाढ नीट होण्यासाठी रोपांच्या, पिकांच्या बुंध्याला किंवा बुडाला मातीची भर दिली जाते. खांदणी मुख्यतःऊस, आले, बटाटा, हळद, उपट्या भुईमूग इत्यादी. पिकांसाठी केली जाते. उसासाठी खांदणी ही महत्त्वाची आंतरमशागत आहे. यामुळे पाणी एकसारखे बसते, शिवाय पीकही लोळत नाही. उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळ बांधणी व 4 ते 5 महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी.

वर खतांचा वापर:

Intercropping of Kharif Crops 2025 पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थानुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे, मात्र खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे.

आच्छादनाचा वापर:

पेरणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी पिकांच्या 2 ओळीत सेंद्रिय पदार्थाचे उदा गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तूर काठ्या, ज्वारीची धसकटे, पिकांचा टाकाऊ भाग, इत्यादी. आच्छादक म्हणून वापरावे. साधारणपणे प्रति हेक्टरी 5 टन या प्रमाणात सेंद्रिय अच्छादकाचा वापर करावा. आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे, इत्यादी फायदे होतात.

खरीप हंगामातील विविध पिकांमध्ये करावयाच्या अंतरमशागतीची कामे:

सोयाबीन पिकात जणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी पेंडीमेथिलिन 1 ते 1.5 किलो 600 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी एक कोळपणी व खुरपणी करून शेत तनमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर 21 दिवसांनी प्रतिहेक्टरी इमॅजिथापर 0.1 ते 15 किलो 500 ते 600 लिटर पाण्यामध्ये मिसळवून तणांवर फवारावे.

कपाशीच्या पिकात मातीची भर ओलावा टिकून ठेवण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहून मुळांना आवश्यक्य असलेला प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळण्यासाठी व तन नियंत्रणासाठी अंतर मशागत फार महत्त्वाचे आहे. त्याकरिता पेरणीनंतर 3-4 आठवड्यांनी 3 ते 4 कोळपण्या 2 ते 3 वेळा निंदणी करून शेत तनविहरित ठेवावे. तसेच रासायनिक तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर उगवणीपूर्वी डाययुरॉण हे तणनाशक 1 किलोग्रॅम क्रियाशील घटक किंवा पेंडीमेथिलिन किंवा बासालीन 0.75 ते 1 किलोग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर समप्रमाणात वापरावे.

बाजरी या पिकात 10 दिवसांनी पहिली व 20 दिवसांनी दुसरी विरळणी करून 2 रोपातील अंतर 15 सेमी ठेवावे.

मक्याची पेरणी संपल्यानंतर त्वरित जमिनीवर अट्राटॉप 50% हेक्‍टरी 2 ते 2.5 किलो फवारावे आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

तुरीच्या जोमदार वाढीसाठी सुरुवातीपासूनच तनविहरीत ठेवावे पीक 15 ते 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिले कोळपणी करावी आणि पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30 ते 45 दिवस शेत तनविहरीत ठेवावे.

मूग उडीदाचे पीक सुरुवातीपासून तनविहरीत ठेवावे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावे. कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काही पिके 30 ते 45 दिवस तनविहरीत ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

हूलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके 20 ते 25 दिवसांची असताना पहिली कोळपणी आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी पेरणीनंतर 30 ते 45 दिवस पिक तानविरहित ठेवावे.

भुईमुगाच्या पिकात पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत दहा-बारा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन कोळपण्या कराव्यात व दोन खुरपण्या घ्याव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आर्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर अंतरमशागत करू नये.

पिकांच्या योग्य वाढीसाठी वेळेवर अंतर मशागत होणे गरजेचे आहे. त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो त्याचप्रमाणे अंतर मशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशी सारख्या पिकात दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. या सऱ्या मुळे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरता उपयोग होतो. अशाप्रकारे वेळेवर पेरणी केल्यानंतर पिकाच्या निरोगी जोमदार वाढीसाठी योग्य प्रकारे अंतर मशागतीची कामे केल्यास रोपांची हेक्‍टरी संख्या योग्य प्रमाणात राखली जाऊन पिकासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊन उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment