Intercropping Methods 2025 खरीप हंगामा दरम्यान पावसामध्ये खंड पडणे किंवा अतिवृष्टीमुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होतात. कधी कधी तर पिक हातचे जाण्याची परिस्थिती निर्माण होते. राज्यातील बहुतांच्या शेती कोरडवाहू असल्याने पूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांकरिता एक चिंतेचा विषय बनलेला आहे. अशा परिस्थितीत फक्त एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून एकापेक्षा अधिक पिकांचा आंतरपीक पद्धतीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रामुख्याने एक पीक पद्धती, आंतरपीक पद्धती आणि दुबार पीक पद्धतींचा अवलंब, पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या प्रकारानुसार करावयास हवा. जमीन, हवा, पाणी आणि अन्नद्रव्य या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी आणि परिणामकारक उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतर पिकांची योग्य निवड करणे हितावह ठरेल.
खरीप हंगामातील बटाटा लागवड!
कोरडवाहू क्षेत्रात आंतरपीक पद्धत नेहमीच फायद्याची दिसून आली आहे. आंतरपीक पद्धतीत पिकांची निवड करताना मुख्य आणि आंतरपीक वाढीची पद्धत भिन्न असणे आवश्यक आहे. मुख्य आणि आंतरपीकाच्या वाढीची पद्धत परिपक्वतेचा कालावधीत योग्य फरक असणे आवश्यक आहे.
Intercropping Methods 2025 कोरडवाहू शेतीमध्ये शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने योग्य पिके आणि पीक पद्धतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कमी कालावधीत येणारे, अवर्षणास प्रतिकारक्षम शिफारशीत वाणांची निवड करावी. स्थानिक परिस्थिती, पाऊसमान लक्षात घेऊन उत्पादन तंत्र आणि कमी खर्चाच्या उपायांचा उपयोग करावा. कोरडवाहू क्षेत्रात पीक पद्धतीचे नियोजन करताना आवश्यकतेप्रमाणे पर्यायी पिकांचा समावेश करावा.

कोरडवाहू क्षेत्रामध्ये आंतरपीक पद्धतीची निवड करताना मुख्य आणि आंतरपीक वाढीची पद्धत भिन्न असणे आवश्यक आहे. मुख्य व आंतर पिकाची मुळांच्या वाढीची सोटमूळ व तंतुमय भिन्नता असावी. मुख्य व आंतर पिकांच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक असावा. मुख्य व आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक असावे. आंतरपीके ही प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावी.
आपत्कालीन परिस्थितीत आंतरपीक पद्धतींचा अवलंब फायदेशीर….
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्यांनी सलग पीक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण पेरणीपुरता पाऊस चांगला झालेला असला तरी पीक वाढीच्या काळात चांगला पाऊस पडेलच याची खात्री देता येत नाही.
Intercropping Methods 2025 त्यामुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. संपूर्ण खरीप हंगामात विभागून चांगला पाऊस आला तर दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले मिळते आणि आर्थिक फायदा होतो.
जर सुरुवातीस पाऊस चांगला पडला आणि नंतर पावसाने उघडी दिली तर कमी कालावधीचे अंतर पीक चांगले उत्पादन देऊन जाईल आणि सुरुवातीस पेरणीपुरता पाऊस होऊन पुढे बराच काळ पावसाने उघडीप दिली. आणि खरीप हंगामाच्या शेवटी पाऊस चांगला झाला, तर उशिरा येणाऱ्या तुरीसारखे पीक चांगले उत्पादन देऊन जाईल म्हणून आपातकालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबल करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
Intercropping Methods 2025 कोरडवाहू क्षेत्रात कोणती आंतरपिके घ्यावीत?
आंतरपीक पद्धतीमध्ये तूर पिकात भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग बाजरी अथवा सूर्यफूल अशा वेगवेगळ्या आंतर पिकांची निवड करता येईल.
पाऊस वेळेवर झाल्यास तुरीतील अंतर विकास मर्यादा येत नाहीत, पण पाऊस वेळेवर न येता उशिरा आला तर मात्र मूग, उडीद, सोयाबीन सारखे आंतरपिके घेता येत नाहीत.
शेतकऱ्यांजवळ मग तुरीतील अंतर पिकासाठी बाजरी आणि सूर्यफूल या दोन पिकांचा पर्याय शिल्लक राहतो आणि अगदीच पाऊस लांबला तर तूर + सूर्यफूल आंतरपीक पद्धती सगळ्यात जास्त उत्पादन देऊन जाते.
आंतरपिकांची निवड करताना….
- कोरडवाहू क्षेत्रात कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा. (उदा. मूग, उडीद, चवळी, सोयाबीन)
- Intercropping Methods 2025 हलक्या व मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांचा समावेश करावा. (मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, भुईमूग)
- मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांची जमीन, हवा, सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादीसाठी स्पर्धा करणारे नसावे.
- मुख्य पीक आणि आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाढणाऱ्या अधिक पसरणाऱ्या असाव्यात.
- सूर्यफूल, मका यासारख्या खादाड पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश टाळावा.
Intercropping Methods 2025 आंतरपीक पद्धतीचे फायदे
- सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास आंतरपीक पद्धतीमुळे हमखास उत्पादन येते.
- सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास, कमी कालावधीत येणारी आंतरपिके निश्चित उत्पादन देतात.
- जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते.
- सरासरीपेक्षा जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास धूप रोधक आंतरपिके, जमिनीची धूप कमी करतात, पाण्याचा निचरा लवकर होतो.
- सातत्याने बदलत्या हवामानाच्या दुष्परिणामाची तीव्रता कमी करून जमीन, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाशांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होते.
Intercropping Methods 2025 आंतरपीक पद्धती व्यवस्थापन!
- सरासरी पाऊसमान व जमिनीचा प्रकार या दोन बाबींवर आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते.
- हलक्या जमिनीत बाजरी, कुळीत, मटकी, हुलगा, तीळ, कारळा, एरंडी सारखी पिके घ्यावीत.
- मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तुर, सोयाबीन व खरीप ज्वारी यासारखी पिके घ्यावीत. लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी.
- दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.. मुख्य पिकांसाठी शिफारस केलेली रासायनिक खतांची पूर्ण मात्रा अधिक क्षेत्रानुसार आंतरपीकांसाठी शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा द्यावी.. उदाहरणार्थ सोयाबीन तूर या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास 33% क्षेत्रावर तुरीचे पीक घेता येते. यासाठी तूर पिकास शिफारस केली 33 टक्के मात्रा द्यावी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करून योग्य वेळी अंतर मशागत व तळ नियंत्रण करावे.
- आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य पीक तसेच आंतरपीक यांच्या, कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या सुधारित वाणांच्या तसेच लवकर पक्व होणाऱ्या, आवर्षणास प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.

Intercropping Methods 2025 आंतरपीक पद्धती आणि ओळींचे प्रमाण
कापूस सोयाबीन आणि तूर ही शेतकऱ्यांची खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाची पिके आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीत कापूस सर्वसाधारणपणे 42, सोयाबीन 45 आणि तूर 12 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतली जाते.
या तिन्ही पिकांची उत्पादकता राज्यात कमी आहे. राज्यातील या महत्त्वाच्या तीनही पिकांचा अंतर्भाव आंतरपीक पद्धतीमध्ये केल्यास शेतकऱ्यास नगदी पिके, तेलबिया आणि कडधान्य या तिन्ही घटकांची पूर्तता करण्यास मदत होते.
कापूस आंतरपीक
- कापूस + मूग (1.1)
- कापूस + उडीद (1.1)
- कापूस + सोयाबीन (1.1)
- रुंद ओळीमध्ये कापूस + मूग (1.2)
- कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2 )
- कापूस + सोयाबीन + तूर + सोयाबीन (3:2:2:2)
- विदर्भ भागामध्ये कापूस + ज्वारी + तूर + ज्वारी (6:1:2:1)
तूर आंतरपीक आणि मिश्र पीक
- मूग / उडीद / सोयाबीन + तूर (4:2 किंवा 2:1)
- बाजरी + तूर (2:1) पश्चिम महाराष्ट्र
- सूर्यफूल + तूर (2:1)
- तुर + गवार (1:2)
ज्वारी आंतरपीक
- खरीप ज्वारी + सोयाबीन (2:4) किंवा (3:6)
- खरीप ज्वारी + तूर (3:3 किंवा 4:2)
- खरीप ज्वारी + तुर (2:1)
- पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भात देखील 45 सेंमी अंतरावर ज्वारीच्या दोन ओळींची लागवड आणि त्यानंतर तीस सेंमी अंतरावर तुरीची एक ओळ लावतात.
Intercropping Methods 2025 आंतरपिकास रासायनिक खतांची मात्रा देताना!
Intercropping Methods 2025 आंतरपीक घेताना शिफारशीनुसार रासायनिक खते देणे आवश्यक आहे.
अन्यथा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अशा वेळेस आंतर पिकाचा फायदा दिसून येत नाही. याकरिता मूळ पिकास शिफारशीनुसार आणि आंतर पिकास शिफारशीनुसार मात्रा एक हेक्टर ताटांची संख्यागृहीत धरून खत द्यावे.