Intercropping 2025 महाराष्ट्रात खरीप हंगामात मूग, तूर, उडीद, कुळीथ, चवळी, घेवडा, आणि मटकी ही महत्त्वाची कडधान्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सन 2017 ते 18 मध्ये राज्यात तूर, उडीद, आणि मूग पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे 12.28, 4.84 आणि 4.53 लाख हेक्टर, उत्पादन 9.84, 1.77 आणि 1.84 लाख टन तर उत्पादकता 800, 366 आणि 362 किलो/ हेक्टर अशी होते.

Intercropping 2025 कडधान्य पिकास बाजारभाव नेहमीच चांगले असतात. परंतु ही पिके पावसावर घेतली जात असल्यामुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखाली अधिक क्षेत्र आणता येते त्यामुळे उत्पादनाचे रता येते स्थिरता आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक उत्पादन मिळाल्यास उपयोग होतो.
हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर!!
Intercropping 2025 महाराष्ट्र राज्यात सोयाबीन + तुर (3 ओळ सोयाबीन: 1 ओळ तूर ), बाजरी + तूर (2:1), कापूस + उडीद (2:1) ही आंतरपीके खरीप हंगामात घेण्याची पद्धत आहे.

Intercropping 2025 आंतरपिके पद्धतीचे अनेक फायदे आहेत. कडधान्य पिके इतर पिकात अंतर पीक म्हणून घेतले जाते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. कडधान्य पिके वाणांच्या विविध पक्वता कालावधीनुसार ते तृणधान्य, तेलबिया किंवा इतर पिकांसोबत अंतर पीक म्हणून घेतले जाते.
तृणधान्य, तेलबिया आणि कडधान्य आंतरपीक पद्धतीत या दोन्ही अंतरपिकांच्या मुळाची वाढ भिन्न असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य योग्य प्रमाणात वापरली जातात. सामान्यतः ज्या पिकाच्या जास्त ओळी पेरतात ते मुख्य पीक व ज्या पिकाच्या कमी ओळी पेरल्या जातात त्याला दुय्यम पीक म्हणतात. उदा सोयाबीन + तूर या पद्धतीत पिकाला लागणार जमिनीतील ओलावा आणि पिकांच्या कालावधी लक्षात घेता ते स्पर्धा न करता उपयुक्त ठरतात यात जमिनीची सुपीकता हि टिकून राहते.
Intercropping 2025 सोयाबीन आणि तूर पाला जमिनिवर पडून जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढण्यात मदत होते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ वेगळी असल्यामुळे ओलावा पुरेपूर वापरला जातो. कोणत्याही एकसलग पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीत उत्पादन अधिक मिळते.
Intercropping 2025 सोयाबीन + तूर (3:1) या आंतरपीक पद्धतीत चांगले उत्पादन मिळते यात सोयाबीन पिकाच्या 3 ओळींनंतर तुरीची 1 ओळ पेरावी लागते. यात सोयाबीन पिकाचे जेएस -335, फुले कल्याणी आणि तूर पिकाचे विपुला, बीएसएमआर-853 हे वाण उपयुक्त आहे. सोयाबीन ओळींमध्ये 30 सेंमी तर 2 रोपांमध्ये 10 सेंमी अंतर ठेवावे. तुरीच्या 2 ओळीतील अंतर 120 सेंमी येते. तुरीच्या 2 रोपांमध्ये अंतर 20 सेंमी ठेवावे. सोयाबीन पिकाच्या 3 ओळींनंतर तुरीच्या 1 ओळ पेरावी लागते.
Intercropping 2025 सोयाबीनचे बियाणे 65 किलो/हेक्टर तर तुरीचे 5 किलो हेक्टर पुरेसे आहे. फुले कल्याणी हा वाण तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम आहे. हा वाण 95-105 दिवसात तयार होतो. या वाणापासून 25 क्विंटल/हेक्टर उत्पन्न मिळते. तुरीचा विपुला हा वाण मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. या वाणाची पक्वता 150-160 दिवसात येते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |