शेतकऱ्यांची थट्टा! संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादकांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 30 तासांचा कालावधी; Insurance Scheme 2025

Insurance Scheme 2025 नैसर्गिक आपत्तीमध्ये फळ पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो. परंतु संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 30 तासांचा कालावधी दिलाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येते.

Insurance Scheme 2025

शासनाने यंदा हवामान आधारित फळ पिक विमा योजना डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी राबवली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. याबाबत 13 जून रोजी सायंकाळी जिल्हा कृषी विभागाने तालुका कृषी कार्यालय कृषी सहाय्यक अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.

राज्याच्या कृषी कर्ज पुरवठ्यात 5 वर्षात दुप्पट वाढ, शेतकऱ्यांचे कर्जचक्र कायम राहणार!

Insurance Scheme 2025 शेतकऱ्यांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे योजनेत सहभागी साठी फळ पिकांचे किमान उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे आवश्यक आहे. तर कमाल चार हेक्टर मर्यादा आहे. योजनेत सहभागासाठी संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी 14 जून, चिकू, मोसंबी पिकांसाठी 30 जून ,डाळिंब पिकाला 14 जुलै तर सिताफळ पिकाला 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

WhatsApp Group Join Now

फळ पीके-विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर)

संत्रा1 लाख
मोसंबी1 लाख
पेरू70 हजार
चिकू70 हजार
डाळिंब1 लाख 60 हजार
लिंबू80 हजार
सीताफळ70 हजार
द्राक्ष3 लाख 80 हजार

Insurance Scheme 2025 कोणती कागदपत्रे आवश्यक?

  • योजनेसाठी अर्ज करताना ऍग्री स्टॅक नोंदणी
  • आधार कार्ड
  • बँक खाते तपशील
  • जमीन उतारा
  • जिओ टॅग फोटो
  • ई-पिक असणे बंधनकारक आहे

Insurance Scheme 2025 कोणत्या पिकांना किती मुदत?

  1. संत्रा पेरू लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी – 14 जून
  2. चिक्कू मोसंबी पिकांसाठी – 30 जून
  3. डाळिंब पिकाला – 14 जुलै
  4. सिताफळ पिकाला – 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

Insurance Scheme 2025 विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत!

WhatsApp Group Join Now

संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने फळ पिक विमा साठी अर्ज सादर करण्यासाठी केवळ 30 तासांचा कालावधी दिल्याचे प्रसिद्ध पत्रकातून दिसून येते. 13 जूनला सायंकाळी विमा पोर्टल सुरू झाले आहे.

यानंतर कृषी विभागात तालुकास्तरावर शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याच्या सहभागी सूचना केल्या. परंतु वरील चार पिकांचे अर्ज 14 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार होते.

एका दिवसात योजनेची माहिती घेणे, कागदपत्रे काढणे आणि पैशाची तजबीज करून अर्ज करणे शक्य आहे का? शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाईटवर सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का असा प्रश्न निर्माण होतो. 14 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाईटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या.

राज्य शासनाने यंदा आठ फळ पिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्याने अर्ज भरले आहेत. परंतु काही पिकांना एका दिवसाचा वेळ मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे. – सुधाकर बोराळे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, अहिल्यानगर “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment