Indian Agriculture and Countermeasures 2025 जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, हरितगृह परिणाम याबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे मात्र आजच्या परिस्थितीत विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल काळाची गरज झाली आहे.

Indian Agriculture and Countermeasures 2025 जागतिक हवामान बदलांचे शेतीवर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. भारतीय शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्या दृष्टीने जागतिक हवामान बदलाचे शेती व्यवसायावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. याबद्दल शेतकरी वर्गात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.
वनस्पतीशास्त्र ऊसाचे फुटवे!!
हरितगृह परिणाम:Indian Agriculture and Countermeasures 2025
हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे गृह असून हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होऊ नये, म्हणून बंदिस्त असते व उबदार असते. घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात. पृथ्वी स्वभावतालचे असणारे वातावरण हे प्रामुख्याने नायट्रोजन 78 टक्के, ऑक्सिजन 21 टक्के आणि उर्वरित एक टक्का भाग हा सूक्ष्म वायूपासून बनलेला असतो.

यामध्ये मुख्यत्वे पाण्याची वाफ, कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन व नायट्रस ऑक्साइड इत्यादींचा समावेश होतो. या वायूंना हरितगृह वायू म्हटले जाते. पृथ्वीपासून उत्सर्जित होणारे उष्णता अडवून ठेवून वातावरण उबदार बनवतात. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठा प्रमाणावर कोळसा व खनिज तेलावर आधारित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला, व ज्वलन प्रक्रियेमुळे कार्बन डाय-ऑक्साइड मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरु झाले.
हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम:
Indian Agriculture and Countermeasures 2025 हवामान बाबतीत वाढत जाणारी अनिश्चितता आणि जागतिक तापमान वाढ यामुळे अन्न उत्पादनावर लक्षणीय परिणाम दिसून येतील जागतिक हवामान बदलामुळे आवर्षणप्रवन स्थिती अवकाळी पाऊस उष्णतेच्या लाटा इत्यादी शेतीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो यामुळे अन्नधान्य उत्पादनावर अस्थिरता दिसून येईल.
तापमान वाढीमुळे पिकाच्या उपयुक्त जाती नामशेष होण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीचा कीड व रोगांवर विशेष प्रभाव दिसून येतो या घटकांमध्ये बदल होऊन नवीन किडी आणि रोग अनुकूल हवामान मिळाल्यामुळे प्रसार झपाट्याने होतो.
वाढते तापमान व कमी प्रजनन मुळे कुरणे कमी होऊ लागतील, त्यामुळे जनावरांना चारा प्रश्न बिकट होऊ शकतो.
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे किनाऱ्यालगतच्या शेतजमिनी पाण्याखाली येऊन क्षारपीड बनतील.

उपाययोजना: Indian Agriculture and Countermeasures 2025
योग्य पद्धतीचा उपयोग करून तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवस्थापनात योग्य ते बदल केल्यास बदलत्या हवामानापासून बचाव करता येईल.
खतांचा योग्य वापर केल्यास विशेषता नत्रयुक्त खतांचा वापर हा मर्यादित प्रमाणात करणे त्याऐवजी सेंद्रिय खते जसे निंबोळी पेंड, हिरवळीची खते, कोंबडी खाते इत्यादी वापर करावा.
नवनवीन पीक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे जसे शुन्य किंवा अत्यंत कमी मशागत तंत्राचा वापर करणे.
पीक फेरपालिटीचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास सुपीकता टिकून खतांची बचत होते.
संशोधनाच्या मदतीने वेगवेगळ्या पिकांच्या वाणांची निर्मिती करणे.

पाणी संवर्धनासाठी पाणलोट क्षेत्राची निर्मिती करणे आवश्यक्य आहे. ज्यामुळे पाण्याचे संवर्धन होऊन जमिनीची धूप थांबवली जाईल.
हवामान बदलाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य परीक्षण देणे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |