कारली: Vine Crops 2025
फुले ग्रीन गोल्ड: ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आली आहे. फळांचा रंग गर्द हिरवा असून भरपूर काटेरी व लांब 25 सेमी जाडी 4.3 असते. फळांचे सरासरी वजन 85 ग्रॅम पासून हेक्टरी उत्पादन 235 मिळते. ही जात केवडा रोगास बळी पडत नाही या जातीची शिफारस खरीप व उन्हाळी हंगामासाठी करण्यात आली आहे.

हिरकणी: ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आली आहे. फळांचा रंग हिरवा असून ती काटेरी असतात, फळे 20 ते 25 सेमी लांब असतात.
रब्बी हंगामासाठी या खतांवर एनबीएस आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता!!
फुले उज्वला: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आली आहे. फळे गर्द हिरवा, भरपूर काटेरी, मध्यभागी फुगीर व लांबी मध्यम आहे. ही जात केवडा रोगास कमी प्रमाणात बळी पडते खरीप व उन्हाळी लागवडीसाठी उपयुक्त आहे.

फुले प्रियांका: ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आली. फळे गर्द हिरवी, भरपूर काटेरी व मध्यम लांबीची 29 से.मी. असून ती मध्यभागी फुगीर असतात. फळाचे वजन 80 ग्रॅम असून हेक्टरी 190 क्विंटल एवढे उत्पादन मिळते. ही जात केवडा रोगास बळी पडत नाही. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीसाठी उपयुक्त आहे.
कोकण तारा: ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून प्रसारित करण्यात आली. फळे हिरवी काटेरी व मध्यम लांबीची 15 से.मी. असून मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकाला निमुळती असतात. खरीप व उन्हाळी हंगामासाठी ही जात योग्य आहे.
दुधी भोपळा: Vine Crops 2025
सम्राट: ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीची फळे दंड गोलाकार असून फळांची लांबी 35 ते 40 से.मी. असते. फळांचे वजन सरासरी 750 तर 800 ग्रॅम असते. फळांचा रंग हिरवा असून त्यावर बारीक लव असते. प्रती हेक्टरी उत्पादन 450 ते 500 क्विंटल पर्यंत जाते.
पुसा समर प्रालिफीक लॉग: या जातीची कोवळी फळे 40 ते 50 से.मी. लांबीची आणि 20 ते 25 से.मी. जाडीची असतात. फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो. या जातीपासून हेक्टरी 110 ते 120 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा समर प्रालिफिक राऊंड: फळे हिरवी गोल आकाराची 15 ते 20 से.मी. परीघ असणारी येतात. उन्हाळी हंगामासाठी चांगली असून 100 क्विंटल एवढे उत्पादन प्रती हेक्टरी मिळते.
पुसा नवीन: या जातीची फळे 25 ते 30 से.मी. लांब आणि 5 ते 6 से.मी व्यासाची असतात. प्रत्येक फळाचे वजन 700 ते 900 ग्रॅम पर्यंत असते. ही लवकर येणारी जात असून हेक्टरी 500 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा मेघदूत: हा संकरित वाण असून फळे लांब व फिक्कट हिरव्या रंगाचे असून हेक्टरी 300 क्विंटल उत्पादन मिळते.
पंजाब कोमल: या जातीची फळे 40 ते 45 सेमी लांबीची आणि 5 ते 7 से.मी. व्यासाची असतात फळांचे सरासरी वजन 1 ते 1.5 किलो पर्यंत असते.
दोडका: Vine Crops 2025
कोकण हरिता: हि जात निवड पद्धतीने बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे विकसित करण्यात आली आहे. या जातीची फळे लागवडीनंतर 45 दिवसांनी काढणीस तयार होतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून फळे लांब व निमुळते असतात फळातील गर घट्ट व शिरा मऊ असतात. या जातीपासून हेक्टरी 180 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
पुसा नसदार: ही जात लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी काढणीस तयार होते. या जातीची फळे 30 ते 40 से.मी. लांब व टोकास फुगीर असतात. फळांचा रंग फिकट हिरवा असून फळे साधारण मऊ असतात.
कोईमतूर: ही जात साधारण जोमाने वाढणारी असून फळे लागवडीपासून 55 ते 60 दिवसांनी काढणीस तयार होतात. या जातीची फळे 40 ते 50 सेमी लांब असून प्रत्येक वेलीस 10 ते 15 फळे येतात.
उदयपूर सिलेक्शन: ही जात खरीप हंगामात लागवडीकरता योग्य असून या जातीची फळे फारच लांब असतात.
काकडी: Vine Crops 2025
फुले प्राची: हा संकरित वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आला आहे. फळांचे सरासरी वजन 135 ग्रॅम व लांबी 12 ते 18 से.मी असून रंग पिवळसर पांढरा आहे. या वाणाचे सरासरी उत्पन्न 350 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
पुसा संयोग: लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते.
शीतल: ही जात बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे विकसित केली आहे. ती डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते. फळे रंगाने हिरवी व मध्यम लांबीची असतात. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते.
फुले शुभांगी: हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित करण्यात आली आहे. हिरव्या रंगाची चवदार व साठवणुकीत हिरवा रंग टिकवून धरणारी आहेत. खरीप व उन्हाळी हंगामासाठी हा वाण उपयुक्त आहे.
पॉईनसेट: फळे रंगाने हिरवी व मध्यम लांबीचे असतात फळावर काही प्रमाणात लव असते.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |