कांद्याच्या सुधारित जाती!! Improved Varieties of Onions 2025

Improved Varieties of Onions 2025 कांद्याच्या अनेक सुधारित जाती उपलब्ध आहेत. हंगामानुसार विविध जातींची लागवड केली जाते खरीप हंगामासाठी प्रामुख्याने बसवंत 780, फुले सफेद, ऍग्रिफाउंड डार्क रेड, एन 53 या जाती तर रब्बी हंगामासाठी फुले सुवर्णा, एन 53 या जाती तर रब्बी हंगामासाठी फुले सुवर्णा, एन 2-4-1, ऍग्रिफाउंड लाईट रेड एन 257-9-1 या जाती प्रसिद्ध आहेत.

Improved Varieties of Onions 2025

Improved Varieties of Onions 2025 एन 2-4-1 ऍग्रिफाउंड लाईट रेड, अर्का निकेतन, फुले सफेद, फुले सुवर्णा या जातींची लागवड उन्हाळी हंगामात हि होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फ़ुरसंगी, नाशिक लाल तसेच फिक्कट तांबूस किंवा हरणा या स्थानिक जातींची लागवड केली जाते.

गहू, तूर मार्केट अपडेट!!

काही प्रमुख जातींची माहिती व वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत: Improved Varieties of Onions 2025

बसवंत-780: Improved Varieties of Onions 2025

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण विकसित केला असून महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी त्याची शिफारस केलेली आहे. या जातीचे कांदे शेंदरी लाल रंगाचे व उभट गोलाकार असतात. मध्यम तिखट व मध्यम साठवणक्षमता असल्याने हे कांदे आकाराने मध्यम व मोठे असतात. यामध्ये डेंगळे व जोड कांद्याचे प्रमाण खूपच कमी असते. लागवडीपासून 100 ते 110 दिवसात ही जात तयार होते. बाजारात या कांद्याना चांगला उठावा असतो. सरासरी 250 क्विंटल प्रती हेक्‍टरी उत्पन्न मिळते.

WhatsApp Group Join Now

एन 53: Improved Varieties of Onions 2025

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हा वान विकसित केला असून खरीप हंगामासाठी हा वाण महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात लोकप्रिय आहेत. या जातीचे कांदे रंगाने लाल भडक असून गोलसर किंचित चपटे मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. सर्व मध्यम तिखट असून साठवण्यास योग्य नाही. लागवडीपासून 100 ते 115 दिवसात तयार होतात. सरासरी 200 ते 250 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

फुले सफेद:

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1995 मध्ये ही जात विकसित केली असून तिची खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीची रांगडा हंगामात ही लागवड केली जाते. हि जात भागल स्थानिक या पांढऱ्या रंगाच्या कांद्यापासून निवड पद्धतीने ही जात विकसित केलेली असून तिचे कांदे नावाप्रमाणे पांढऱ्या रंगाचे व गोलाकार, मध्यम आकाराचे असतात. हे कांदे साठवणीत चांगले टिकतात. कांद्यातील एकूण द्रव्य पदार्थ 14.5 असून निर्जल कांद्यासाठी योग्य आहे. सरासरी 230 क्विंटल पर्यंत या जातीचे उत्पन्न मिळते.

फुले सुवर्णा: Improved Varieties of Onions 2025

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून 1997 मध्ये ही जात खरी रांगडा आणि रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आली आहे. येलो टेक्सास आणि एन दोन चार एक यांच्या संकरातून तिची निर्मिती करण्यात आली आहे पिवळ्या रंगाची व किंचित विटकरी छटा असणारी ही साथ निर्यातीसाठी योग्य जात आहे.

WhatsApp Group Join Now

या कांद्याचा आकार गोल असून तो टणक आणि मध्यम तिखट आहे साठवणक्षमता तीन ते सहा महिन्यांपर्यंत व्यवस्थित टिकते ही जात लागवडीपासून साधारण 110 दिवसात तयार होते या जातीचे सरासरी प्रतिही हेक्टरी 235 क्विंटल उत्पन्न मिळते.

एन 2-4-1:

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात निफाड येथून निवड पद्धतीने विकसित केली आहे. महाराष्ट्रात रब्बी व उन्हाळी हंगामासाठी ही जात प्रसिद्ध आहे. कांद्याचा रंग भगवा, विटकरी असून आकाराने मध्यम ते गोल आहे. साठवण क्षमता अतिशय चांगली आहे. लागवडीपासून 110 दिवसात कांदा तयार होतो. या जातीचे सरासरी 300 ते 350 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पन्न मिळते.

ॲग्रीफाउंड डार्क रेड:

खरीप हंगामासाठी योग्य अशी ही जात एन.एच.आर. डी.एफ. ने स्थानिक वाणातून निवड करून विकसित केली आहे. या जातीचे कांदे लाल, मध्यम तिखट, गोलाकार व लवकर तयार होणारे आणि एकसारखे असतात. पीक लागवडीपासून 90 ते 100 दिवसात तयार होते.

ॲग्रीफाउंड लाईट रेड:

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी योग्य अशी ही जात एन.एच.आर. डी.एफ. ने नाशिक मधील स्थानिक वाणातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीचे कांदे गोलाकार मध्यम ते मोठे तिखट, टणक, वरचे आवरण घट्ट असलेले व बारीक मानेचे असतात. यात डेंगळ्याचे प्रमाण कमी आहे. ही जात साठवणेस चांगली असून निर्यातीस योग्य आहे. पीक लागवडीपासून 120 ते 125 दिवसात तयार होते. सरासरी 300 ते 325 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. महाराष्ट्रात रांगडा पीक घेण्यासाठी ही जात योग्य आहे.

ॲग्रीफाउंड लाईट व्हाईट:

एन.एच.आर. डी.एफ. ने मध्य प्रदेशातील निमाड भागात घेतल्या जाणाऱ्या स्थानिक वाणातून हा वाण विकसित केला आहे. याचे कांदे गोलाकार, वरचे आवरण घट्ट आकर्षक, पांढऱ्या रंगाचे, 4 ते 6 से.मी. व्यासाचे कांदे असतात. यामध्ये घनपदार्थाचे प्रमाण 14 ते 15 टक्के साठवण क्षमता मध्यम, निर्जलीकरणास योग्य असलेल्या या जातीचे सरासरी उत्पन्न 200 ते 250 प्रति हेक्टरी मिळते.

अर्का निकेतन:

भारतीय उद्यान संशोधन संस्था बेंगलोर यांनी नाशिक भागातील स्थानिक वाणातून हा वाण निवड पद्धतीने विकसित केला आहे. या जातीचे कांदे गोलाकार, आकर्षक, गुलाबी रंगाचे बाहेरचा पापुद्रा घटक असलेले असतात. जोड कांद्याचे प्रमाण कमी असून कांदा घट्ट व तिखट आहे. साठवणीस योग्य आहे. पेरणी पासून 145 दिवसात कांदा तयार होतो. सरासरी प्रती हेक्टरी 400 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

पुसा रेड:

भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली यांनी ही जात विकसित केली आहे. या जातीचे कांदे विटकरी लाल रंगाचे गोलाकार मध्यम तिखट असतात. या जातीत डेंगळ्याचे प्रमाण कमी असून साठवण क्षमता चांगली आहे. लागवडीपासून 120 दिवसात कांदा तयार होतो. सरासरी 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळते. रब्बी हंगामासाठी भारतातील कांदा पिकवणाऱ्या सर्व भागासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

एन 257-9-1:

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने ही जात विकसित केली आहे. या जातीचे कांदे मध्यम गोल, चपटा, बारीक मानेचे, मध्यम तिखट असतात. या कांद्याची साठवण क्षमता चांगली आहे. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतो. सरासरी 250 ते 300 क्विंटल पर्यंत प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते.

अर्का कल्याण: Improved Varieties of Onions 2025

बैंगलोर येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था यांनी महाराष्ट्रातील नाशिक भागातील स्थानिक कांद्याच्या वाणातून निवड पद्धतीने ही जात विकसित केली आहे. याचे कांदे गर्द लाल व गोलाकार असतात. कांदे तिखट व काहीसे नरम येणार असून ही जात करपा रोगास प्रतिकारक्षम आहे. कांदे पेरणी पासून 130 ते 150 दिवसात काढणीस तयार होतात. सरासरी प्रती हेक्टरी 200 ते 300 क्विंटल उत्पादन मिळते पोळ कांदा लागवड खरीप लागवडीसाठी याची लागवड केली जाते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment