Important Tips Regarding Tur Crop 2025 कोळप्याच्या साह्याने पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते व त्या योग्य पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच बाष्पीभवनाचा वेळ कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीचे भर लागते कोळपणी शक्यतो वापश्यावर करावी. तुर पिके पहिले 30 ते 45 दिवस तणविहिरीत ठेवावे गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.

पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरुवातीलाच संरक्षित पाणी द्यावे.
वनस्पती शास्त्र ऊसाची परिपक्वता!!
Important Tips Regarding Tur Crop 2025 तुरीची पेरणी झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळीत लाकडी नांगरांच्या साह्याने 30 सेंटीमीटर खोल सरी काढावी. सरी काढल्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पडणारा पाऊस सरित मुरविला जाऊन जमिनीतील ओलावा वाढवण्यास मदत होते व सदरील ओलावा पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरताना उपयोगी पडून उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर येथील संशोधनातून तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात 15 ते 20 टक्के वाढ होऊन उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Important Tips Regarding Tur Crop 2025 कोरडवाहू क्षेत्रात पावसाची शक्यता नसेल आणि पाणी द्यायची सोय उपलब्ध असेल तर लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पहिले पाणी फुलकळी लागताना दुसरे पाणी फुलोऱ्यात असताना व तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र, पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. पाऊस नसेल तर जमिनीत फार मोठ्या भेगा पडण्याच्या अगोदरच पाणी द्यावे.
तुरीची अतिरिक्त शाकीय वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास व फुलोरा शाकीय वाढीच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे लक्षात आल्यास शास्त्रज्ञाच्या सल्ल्याने सायकोसील 1000 ते 1500 पीपीएम याप्रमाणे फवारावे.

Important Tips Regarding Tur Crop 2025 जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहने असल्यास पाण्याबरोबर नत्र वाहून जाण्याची शक्यता असते तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपीची फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोते व युरिया अर्धा पोते प्रति एकरी कोळपणी देण्यापूर्वी वापरावे.
जमिनीत जरुरीपेक्षा जास्त पाणी साठवून राहिलेल्या शेतात तूर पिकात पाय कुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यता झाडांच्या रोप अवस्थेत होतो. झाडाच्या जमिनीलगतचा भाग कुजतो व झाडांची पाने पिवळी पडतात. रोपे कोलमडून अकाली मरतात. ज्या ठिकाणी झाड कुजते त्या ठिकाणी प्रथम कापसासारख्या बुरशीची वाढ व नंतर मोहरी सारखे बीज दिसून येते.

Important Tips Regarding Tur Crop 2025 जमिनीत गरजेपेक्षा जास्त ओलावा राहणार नाही अश्या पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. पूर्वग्रस्त झाडांचा समूळ नायनाट करावा पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. तुरीचा फुटवा वाढवण्यासाठी 30 व 55 व्या दिवशी शेंडा खुडणी करणे महत्त्वाचे आहे. पिकांमध्ये किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी कामगंध सापळ्याचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |