Importance of Fertilization 2025 हळद हे देशातील मसाला पिकांत एक प्रमुख नगदी पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतो. या गुणवैशिष्ट्यामुळे हळद हे सुपर फूड या प्रकारात समाविष्ट होणारे पीक आहे.

Importance of Fertilization 2025 महाराष्ट्र राज्याचे एकूण हवामानाचा विचार केला असता हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पन्नासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूवर्क करणे गरजेचे असते.
बोर्डोमिश्रण-रोग नियंत्रक!!
Importance of Fertilization 2025 सध्या हळद लागवड होऊन 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा हा कालावधी असतो. यावेळी वातावरणात 25 ते 35 अंश सेल्सियस तापमान असते या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये निश्चित वाढ होत असते.

पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. नुकतेच पावसाने उघडीप दिली असून अशावेळी शेतकरी बांधवानी आंतरमशागतिची कामे तात्काळ करून घ्यावीत. आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी करणे खते पाणी व्यवस्थापन तणांचे नियंत्रण इ महत्वाच्या कामांचा समावेष होतो.
अंतरमशागत (भरणी करणे):
Importance of Fertilization 2025 हळदीच्या लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यांनी हळदीचे 3 ते 5 पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. कारण या कालावधीमध्येच हळदीच फुटवे व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. सरी मधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्यांमधील मोकळ्या जागेमधील माती 1.5 ते 2 इंच शिपी कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्यांना नावाने म्हणजेच भरणी करणे होय.
माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर जर पाऊस समान नसेल तर हळद पिकास हलकेसे पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती निघून पावसाने वाहून जाणार नाही, भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात व त्यांची चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ 10 ते 15 % नि वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते.
गादीवाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादी वाफ्यांमधील जागेतील माती मोकळी करून गादी वाफ्यावर भर द्यावे. मजुरांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादी वाफ्यावर ठिबक सिंचन केल्यास भरणी करताना ड्रीपर मातीखाली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
भरणीचे फायदे: Importance of Fertilization 2025
- भरणी केल्यामुळे पावसामुळे उघडे पडलेले हळदीचे गड्डे संपूर्णपणे झाकले जाते. परिणामी घडले झाकल्यामुळे कंदमाशी सारख्या किडींचा गड्डयांवर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे या किडींची पुढील पिढी नष्ट होण्यास मदतच होते. तसेच कंदकुज रोगाला देखील आळा बसतो.
- उघड्या गड्यांच्या बाजूने नव्याने येणारे हळकुंडे संपूर्ण झाकले जातात व त्यांची चांगली वाढ होते.
- उथळ झालेल्या साऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते. परिणामी पिकास दिलेले पाणी व्यवस्थित व समप्रमाणात मिळते. पाण्याचा अपव्यय होत नाही.
- भरणी करतेवेळी शिफारस केलेले खत मात्रा दिल्यामुळे संपूर्ण खते माती खाली झाकली जातात परिणामी खतांचा ऱ्हास, अपव्यय होत नाही. दिलेले खत हळदीच्या मुळाजवळ पडल्यामुळे चांगला फायदा होतो, खतांची कार्यक्षमता वाढते.
- मातीखाली झाकलेल्या हळदीच्या जेठा गड्ड्यांची वाढ चांगली होते. शिवाय हळकुंडाची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी उत्पादनात वाढ होते.
- भरणी केल्यामुळे हळदीची लांब मुळे तुटली जातात. कार्यक्षम तंतुमय मुळे जास्त प्रमाणात तयार होऊन आवश्यक अन्नघटक शोषणाची क्रिया चांगली होऊन उत्पादन वाढीस मदत होते.
- माती पोकळ झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाचे चांगली पोषण होते व ती चांगली पोसतात.

खतांचे व्यवस्थापन: Importance of Fertilization 2025
हळद पिकास रासायनिक खतांमध्ये हेक्टरी 200 किलो नत्र, 100 स्फुरद आणि 100 किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आले आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र 2 हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी द्यावयाचा असतो. तर, नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी लागवडीनंतर 105 दिवसांनी द्यावा. यावेळी हेक्टरी एक 215 किलो युरिया आणि 25 किलो फेरस सल्फेट द्यावे. तसेच भरणीच्या वेळी हेक्टरी 2 टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा. भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.
पाणी व्यवस्थापन:
पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी जर साठून राहिले तर मुळांना हवा ऑक्सिजन घेण्यास अडथळा उदभवतो. परिणामी पाने पिवळी पडून मरून होताना दिसतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ऑगस्ट, सप्टेंबर हा हमखास पावसाचा कालावधी असल्याने वाकोजाची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यास करून पाणी देण्याचे नियोजन करावे.
रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. त्यामुळे सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. या पद्धतीने पाणी दिल्याने 10 ते 15 टक्के उत्पादन जास्त मिळाल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळी मधील अंतर 12 ते 15 दिवस ठेवावे.

तण नियंत्रण: Importance of Fertilization 2025
हळद पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्याने शेणखतातून तणांचे बी शेतात येते. या तणांचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे. तणांचा प्रादुर्भाव दिसून आला तर हळद लागवडीपासून 60, 90 आणि 120 दिवसांच्या अंतराने तणांच्या तीव्रतेनुसार मजुरांच्या सहाय्याने तणांची निंदणी करून घ्यावी. हळद उगवणी नंतर कोणतेही तणनाशक फवारू नये. जर तणनाशकाची फवारणी केली तर हळद पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |