राज्यात आज अवकाळी पावसाचा हाय अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर; IMD Report Update 2025

IMD Report Update 2025 राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीचा मारा सुरूच आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. IMD ने आजही
हाय अलर्ट जारी केला आहे.

IMD Report Update 2025

मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. त्याबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसताना दिसत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. मराठवाड्यामध्ये तर अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.

शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा ‘ही’ प्रक्रिया उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता;

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या अवकाळीचे ढग कायम असल्याचे पावसासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजही राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

सध्या चक्राकर वारे वाहत आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प वाऱ्यामुळे संगम होत आहे. मुंबईतही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याचे बघायला मिळाले.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखील वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. होळीनंतर पारा वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले होते. तर दुसरीकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

IMD Report Update 2025 या भागात यलो अलर्ट

  • राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात आजही हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • या भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होईल. यासोबतच काही भागांमध्ये गारपिटीचा देखील इशाराही देण्यात आला आहे.

IMD Report Update 2025 शेतकऱ्यांना सल्ला!

  1. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपिटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी न केलेल्या व मळणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर मळणी करावी.
  2. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment