उन्हाळ्यात टंचाईच्या काळात कमी जागेत, कमी वेळेत कसा तयार कराल पोषक चारा? वाचा सविस्तर; Hydroponics Chara 2025

Hydroponics Chara 2025 हायड्रोपोनिक्स अवलंब करून कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी वेळेत अत्यंत लुसलुशीत हिरवा पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. चारा टंचाईच्या काळात हा चारा वापरल्यास उत्पादनात घट होत नाही व जनावरांचे आरोग्य उत्कृष्ट राहते.

Hydroponics Chara 2025

WhatsApp Group Join Now

Hydroponics Chara 2025 हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची पद्धत

  • हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने प्रामुख्याने मका गहू, बार्ली, ओट व बाजरी या तृणधान्यांची वाढ करून चारा निर्मिती करता येते.
  • या पद्धतीद्वारे ज्वारी पिकाची निर्मिती करू नये. कारण कोवळ्या ज्वारीच्या ताटामध्ये हायड्रोपोनिक्स ऍसिड असल्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा संभव असतो.

कोथिंबीर, मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती; मंचर बाजार समितीत मिळाला विक्रमी दर; 

  • बियाणे निवडताना बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे. टपोरे दाणे किमान 80 टक्के उगवण क्षमता रोगमुक्त व बुरशी मुक्त असावे.
  • बियाणे कोणतीही बीज प्रक्रिया केलेले नसावे, असे केल्यामुळे जनावरांना होणाऱ्या विषबाधेचा धोका टळू शकतो.
  • सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळेस त्यानंतर ते बियाणे आणि मोड येण्यासाठी 12 ते 24 तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवावे. (एक किलो बियाण्यासाठी दोन लिटर कोमट पाणी द्यावे).

  • त्यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवावे. यामुळे बियाण्यात मोड येण्यास मदत होते. गोणपाटावर सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे.
  • मोड येण्यास सुरुवात झाल्यावर बियाण्यांवर 5 टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे. त्यामुळे ओलसर वातावरणात वाढणाऱ्या बुरशीची वाढ होत नाही.
  • बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करता येतो.
  • यानंतर प्लास्टिकचे ट्रे घ्यावेत. हे ट्रे स्वच्छ पाण्याने धुऊन चांगले वाळवून घ्यावेत.
  • पूर्णपणे मोड आलेले तृणधान्य एक किलो प्रती ट्रे याप्रमाणे पसरवून घ्यावे व असे ट्रेक शेडमध्ये रॅकवर ठेवावेत.
  • Hydroponics Chara 2025 शेडमध्ये आद्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगर्स किंवा मायक्रो स्प्रिंकलचा वापर करा.
  • एक ट्रे 2 लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही. पंधरा दिवसात चारा तयार होईपर्यंत प्रति ट्रेसाठी सुमारे 30 लिटर पाण्याची गरज असते.
  • अशा पद्धतीने 12 ते 15 दिवसात 35 ते 30 सेमी उंचीचा हिरवा चारा तयार होतो.
  • एक किलो बियाण्यापासून सुमारे 10 ते 12 किलो हिरवा पौष्टिक चारा तयार होतो.

WhatsApp Group Join Now

Hydroponics Chara 2025 हायड्रोपोनिक्स चारा देण्याची पद्धत

  1. हा चारा जास्त पचनीय असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
  2. पूर्णपणे वाढ झालेला हायड्रोपोनिक्स चारा एक प्रकारे चटईसारखा दिसतो
  3. ट्रे मधून चारा काढायला सोपा जातो व हा चारा जसेच्या तसे किंवा तुकडे करून देता येतो.
  4. जनावरांना फक्त हायड्रोपोनिक्स चारा दिल्यास अपचन, पोटफुगी होण्याची शक्यता असते, म्हणून हा चारा सुक्या चाऱ्यासोबत द्यावा.
  5. दुभत्या जनावरांना 15 ते 20 किलो चारा प्रति दिवस द्यावा व भाकड जनावरांना 6 किलो प्रति दिवस द्यावा.
  6. आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रे चे नियोजन करावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment