सेंद्रिय विचार-जमिनीतील जैविक परिसंस्था, ह्युमस व ह्युमिक पदार्थ!! Humus and Humic Substances 2025

Humus and Humic Substances 2025 निसर्गामध्ये सेंद्रिय पदार्थाचे खनिजीकरण होऊन नत्र, स्फुरद, इत्यादी पोषणद्रव्य रासायनिक रूपात पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध होणे ही प्रक्रिया अन्नसाखळीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये अनेक जिवाणू बुरशीचे प्रकार सहभागी असतात. हे जिवाणू सेंद्रिय खाद्य उपलब्ध होताच वेगाने वाढतात.

Humus and Humic Substances 2025

Humus and Humic Substances 2025 त्यांच्या शरीरामध्ये पोषणद्रव्ये, प्रामुख्याने नत्र मोठ्या प्रमाणात आत्मसात केला जातो. जोपर्यंत हे जीवाणू जिवंत आहेत तोपर्यंत त्यांनी आत्मसात केलेला नायट्रोजन पिकाला मिळत नाही तो गतिहीनच असतो. पण निकोप माती परिसंस्थेमध्ये इतर अनेक जीवजंतू समाविष्ट असतात.

गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन 3400 शक्य!!

Humus and Humic Substances 2025 काही उपकारक नेमॅटोड्स, प्रोटोझ, गांडुळे असे जीवजंतू यांचे कार्य महत्त्वाचे असते. नायट्रोजन खाऊन सुस्त झालेले सूक्ष्मजीव काही काळानंतर मरून जातात. ही मृत शरीरे म्हणजे नेमॅटोड्स, प्रोटोझ, गांडुळे यांची भक्ष्य असते. नायट्रोजनयुक्त सूक्ष्मजीवांच्या कलेवराचे भक्षण करताना श्वसनाद्वारे कार्बन डायऑक्साइड सुद्धा उत्सर्जित होतो.

WhatsApp Group Join Now

Humus and Humic Substances 2025 विष्ठेद्वारे नत्र, स्फुरद, इत्यादी. जमिनीत सोडले जातात ही पोषणद्रव्ये भुद्रावणातून पिकांना सहज उपलब्ध होतात. गांडूळाच्या संवर्धनाला शेतीमध्ये म्हणूनच फार महत्त्व आहे. ही सर्व साखळी अखंड चालू राहील या बेताने ऊस शेतीमध्ये नियोजन असावे.

लिगनिन आणि पॉलिफिनॉल यांचा भुसेंद्रियावर होणारा परिणाम

वनस्पतीमध्ये लिगनिनचे प्रमाण 2 ते 50 टक्के असू शकते. लिगनिनचे प्रमाण जास्त असलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन सावकाश चालते. पॉलिफेनॉल्समुळे सुद्धा अपघटनाचा वेग कमी होतो. हे फेनॉलस जल विद्राव्य असतात. वनस्पतीमध्ये यांचे प्रमाण 5 ते 10 टक्के पर्यंत असू शकते.

प्रथिनांशी संयोग पाऊन ते सेंद्रियाला इतके कठीण बनवतात की नत्राचे खणजीकरण व्हायला आणि कार्बन डाय-ऑक्साइड तयार व्हायला मोठे अडचण निर्माण होते. हिरवळीच्या खतातून सुद्धा नत्राचे मिनरलायझेशन व्हायला लिगनिन व पॉलिफेनॉल अडथळा निर्माण करतात. परंतु अशा या मंद ज्वलन क्रियेमुळे नायट्रोजनची उपलब्धता दीर्घकाळ होत राहते.

ह्युमस व ह्युमिक पदार्थ:

वनस्पती अवशेषांचे अपघटन अपघटन चालू असताना काही कठीण पदार्थाचे साध्या व छोट्या गटात मंदगतीने रूपांतर करण्याचे कार्य मंदगती जिवाणू करतात. यामध्ये लिगनिन या कठीण पदार्थाचे छोट्या फेनॉल गटात रूपांतर होते. यातला काही कार्बन, नत्र, सल्फर, ऑक्सिजन यांचा उपयोग करून नवी जैवसंयुगे तयार होतात.

WhatsApp Group Join Now

लिगनिनचा काही भाग पूर्णपणे विघटित होत नाही. पण त्याचे थोडे रूपांतर होते. यामध्ये लिगनिनचे बरेच गुणधर्म असतात. सूक्ष्मजीवांच्या क्रियेने बरोबर ते गुंफले जाते व लिग्नोप्रोटीन असे एक नवसंयुग तयार होते. यालाच ह्युमस असे म्हणतात. अपघटनास ह्युमस अत्यंत कठीण असते. जमिनीतील मातीचे कण व ह्युमस याची गुंफण होऊन पॉलिमरायाझेशन होते. अशा गुंतागुंतीच्या पदार्थाला ह्युमिक पदार्थ म्हणतात.

वनस्पतींचे सेंद्रिय अवशेष जमिनीत घातल्यावर वर्षभरात त्यातील बराचसा कार्बन डायऑक्साईड वातावरणात परत जातो. साधारण 20 ते 35 टक्के भाग ह्युमिक व नॉन ह्युमिक स्वरूपात टिकून राहतो.

ह्युमिक पदार्थ: Humus and Humic Substances 2025

ह्युमिक पदार्थांमध्ये 60 ते 80 टक्के भूसेंद्रिय पदार्थ असतात. त्यांचे कण हे मोठे व वेगवेगळ्या आकाराचे असतात. अनेक छोट्या-छोट्या फेनॉलिक गटांनी बनलेले असतात. थोडा सुगंध असतो गडद काळपट रंगाचे असे हे चूर्ण असते. त्याचे मोलेक्युलर वजन 2000 ते 30,000 ग्रॅम मोल असे विविध असू शकते अतिशय गुंतागुंतीची रचना असल्यामुळे अपघटनाला अत्यंत कठीण असते.

विद्राव्यतेच्या निकषावर ह्युमिक पदार्थाचे तीन वर्ग पडतात

फलविक ऍसिड: याचे मोलेक्युलर वजन अत्यंत कमी असते. रंग फिकट असतो ॲसिड अल्कली या दोन्हींमध्ये विरघळते, यावर सूक्ष्मजीवांची क्रिया सहज घडते.

ह्युमिक ऍसिड: मोलेक्युलर वजन मध्यम असते रंग मध्यम काळपट असतो. अल्कलीमध्ये विरघळते पण ऍसिडमध्ये विरघळत नाही बॅक्टरीयाद्वारा याचे मध्यम प्रमाणात विघटन होते.

ह्युमिन: मोलेक्युलर वजनसर्वात जास्त आहे रंग गडद काळपट असतो ऍसिड किंवा अल्कलीमध्ये विरघळत नाही सूक्ष्मजीवाकडून अपघटन होण्यास अत्यंत कठीण असते.

हे तीनही प्रकार जमिनीमध्ये स्थिर असतात फलविक ऍसिड हे जरी सूक्ष्मजीवाकडून जलद विघटित होत असले तरीही नव्याने घातलेल्या सेंद्रिय पदार्थांपेक्षा विघटनास कठीण असते. जमिनीमध्ये नष्ट न होता 10 ते 50 वर्षे राहू शकते. ह्युमिक ऍसिड तर काही शतके जमिनीत टिकून राहते.

ह्युमसचे गुणधर्म: Humus and Humic Substances 2025

ह्युमसचे कण कलिल रुपी असतात. त्यामुळे प्रत्येक कणावर भरपूर पृष्ठ क्षेत्रफळ असते. मातीच्या कणांच्या तुलनेत क्षेत्रफळ बरेच जास्त असते. त्यावर ऋणभार असतो.

मातीच्या पीएच नुसार ह्युमसची आयनांचे देवाणघेवाण करण्याची क्षमता हि 150 ते 500 (मोल /कि.ग्रॅ) असते.

वजनभराच्या निकषावर ह्युमसची जलधारणाशक्ती ही तेवढ्याच वजनाच्या मातीच्या कनांच्या तुलनेत 4 ते 5 पट अधिक असते. त्यामुळे मातीचे कण परस्परांशी हलकेपणाने बांधले जातात व स्थैर्य वाढते.

जवळजवळ सर्वच प्रकारच्या प्रकाशलहरी शोषण करण्याची ह्युमसची क्षमता असते. त्यामुळे ह्युमस हे गडद काळ्या रंगाचे दिसते.

ह्युमिक पदार्थ हे सूक्ष्मजीवांना अत्यंत प्रतिकारक असतात. त्यामुळे शेकडो वर्षे जमिनीत टिकून राहतात.

ह्युमसच्या अवरनातले नत्र, स्फुरद, इ पोषणद्रव्ये जमिनीत वर्षानुवषे टिकून राहतात. सावकाश उपलब्ध होतात.

मातीच्या कणांच्या रचनेमुळे जमिनीत सूक्ष्म छिद्रे असतात. अशा छिद्रामध्ये अमिनो ऍसिड, पेप्टाईड, प्रथिने इ. पदार्थ घट्ट चिकटून बसतात. त्यामुळे असे मातीचे कण व ह्युमिक पदार्थाचे कण यांच्या संयोगाने वेगळे कण तयार होतात. अशा स्वरूपात ते 300 ते 400 वर्षे राहतात. लोह आणि अल्युमिनियमला बद्ध असलेला नत्र सुद्धा शेकडो वर्षे जमिनीत टिकून राहतो.

ह्युमसचा जमिनीच्या गुणधर्मावर होणार परिणाम:

भौतिक गुणधर्म:

ह्युमसमुळे जमिनीच्या वरच्या थराला गडद तपकिरी ते काळा रंग येतो. मातीचे कण एकमेकाला धरून ठेवले जातात. रवाळपणा येतो. भारी जमिनीतील मातीच्या कणांचा चिकटपणा, कडकपणा कमी होतो. जमिनीला मऊपणा येऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. विशेषतः हलक्या जमिनीमध्ये जलधारणाशक्ती वाढते. भारी जमिनीत निचरा चांगला वाढतो.

रासायनिक गुणधर्म:

पृष्ठ स्तरावरील मातीमध्ये ह्युमस मुळे 50 ते 90% धारणा शक्ती वाढते.

मातीच्या कणाप्रमाणेच ह्युमसचे कलिल सुद्धा पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे कण धरून ठेवतात. पिकाला ते सहज उपलब्ध होतात.

जमिनीचा पीएच (सामू) ऍसिड किंवा अल्कलीन असा तीव्र न राहता सौम्य होऊन कॅटायन एक्सरचेंज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी अनुकूल राहतो.

नत्र, स्फुरद, सल्फर याबरोबरच सूक्ष्मअन्नद्रव्य सुद्धा सावकाश उपलब्ध होत राहतात.

सेंद्रिय ऍसिड (ऑरगॅनिक ऍसिड्स), पॉलिसॅकराईड आणि फलविक ऍसिड यांच्याकडे लोह (Fe3+), तांबे (Cu2+), झिंक (Zn2+) व मॅगनीज (Mn2+) हे आकर्षिले जातात आणि त्यांचे चिलेट या स्थिर प्रकारात रूपांतर होते. पिकांना सहज घेता येतात.

ऍसिडिक जमिनीतल्या अल्युमिनियममुळे असणारा घटकपणा ह्युमसमुळे सौम्य होतो.

पिकांच्या वाढीवर ह्युमसचा थेट परिणाम:

सेंद्रिय पदार्थांच्या खनिजे करण्यातून निर्माण झालेले नत्र व सूक्ष्म अन्नद्रव्य भूद्रावणात विरघळतात त्याचे शोषण पिके करतात व वाढ घडून येते.

काही व्हिटॅमिन्स अमिनो ऍसिड्स वृद्धीकारी द्रव्ये जिब्रेलिन्स यांची निर्मिती ह्युमसमुळे होते हि संजीवके पिकाची वाढ घडवून आणतात.

ह्युमसमधील फळवीक ऍसिड व ह्युमिक ऍसिड हे भूद्रावणात मिसळले जातात आणि संप्रेरकाचे काम करतात विशेषतः पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते सूक्ष्म द्रव्यांचे विशेषतः लोह व झिंक यांचे शोषण चांगले होते.

मुळांच्या वाढीच्या परिसरात पुरेसे ह्युमस असल्यास ह्युमिक पदार्थाचे प्रमाण 50 ते 100 पीपीएम राहते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment