Herbicide Spray 2025 मुर्तीजापुर तालुक्यात सोयाबीनच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, याच टप्प्यावर शेतकऱ्यांना तण नियंत्रणासाठी योग्य पद्धती आणि योग्य वेळेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

तणांच्या अतिरिक्त वाढीमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना 48 तासांच्या आत योग्य प्रमाणात तणनाशक फवारणीचा सल्ला दिला आहे, शुद्ध पाणी व अचूक औषधांच्या वापरावरही भर देण्यात आला आहे. आता फक्त एकच धोरण वेळेवर फवारणी आणि उत्पादनात वाढ होईल.
शेतीत विज्ञानाची जोड बीबीएफ यंत्राचा जागर, वाचा सविस्तर;
खरीप हंगामातील पेरण्या तालुक्यात जोमाने सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पेरणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तणनाशकांची निवड व वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Herbicide Spray 2025 फवारणीची योग्य वेळ महत्त्वाची
तणनाशकांचा प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी, पेरणीनंतर 48 तासांच्या तणनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. यामुळे तणांचा पिकांवर होणारा प्रतिकूल परिणाम रोखता येतो.
शिफारस केलेली तणनाशके व प्रमाण
पेरणीनंतर 48 तासांच्या आत फवारणीसाठी: फ्लूमिओक्सजीन 50% SC-100 मिली प्रती एकर
गवत व रुंद पानांच्या तणांचे प्रभावी नियंत्रण.
पेंडीमिथलीन 30 % EC-750 ते 1000 मिली प्रति हेक्टर -प्रति पंप 30-40 मिली प्रमाणे.
सल्फेटाराझोन 28% + क्लोमाझोन 30% WP-500 ग्रॅम प्रति एकर.
डिक्लोसूलम 84%-12.4 ग्रॅम प्रति एकर.
Herbicide Spray 2025 उगवणीनंतर तण नियंत्रणासाठी फवारणी
ईमेझिथायपर 10% SL-800 मिली प्रति एकर (प्रति पंप 80-100 मिली)
फ्लूझीफोप पी ब्युटी 13.4% EC- फक्त सोयाबीन साठी -400 ते 500 मिली प्रति एकर
ईमेझिथायपर 35% + इम्यॅझामॉक्स 35% -सोयाबीन व भुईमूगमधील सर्व तणांसाठी -40 ग्रॅम प्रति एकर
Herbicide Spray 2025 फवारणीसाठी विशेष सूचना
- फवारणीसाठी फक्त स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
- डबके, नाला किंवा माती मिसळलेले पाणी टाळावे.
- सोयाबीन 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असताना फवारणी अधिक प्रभावी ठरते.
” दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |