Havaman Andaj March 2025 राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीच बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताच एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याच कारणास्तव पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे.
उन्हाळा वाढल्यामुळे कलिंगडाच्या मागणीतही वाढ; वाशी मार्केटमध्ये कसा मिळतोय दर ?
सध्याच्या परिस्थितीमध्ये विदर्भातून उष्णतेची लाट ओसरली असून, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भाग आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई शहर, उपनगर आणि राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात मोठा बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या पाच दिवसात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे वाहणार असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहील, असे हवामान विभागातील विभागाने कळविले आहे.
Havaman Andaj March 2025 उष्णतेची लाट ओसरली ?
राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांना करावा लागत होता. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 40 अंशसेल्सिअस पर्यंत पोहोचला होता. येत्या पाच दिवसात आता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
Havaman Andaj March 2025 शेतकऱ्यांना सल्ला
- पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
- कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड आळीच्या जीवन क्रमांक घट पडेल असा सल्ला देण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |