चंद्रपूरच्या शेतकऱ्याने दोन एकर मध्ये 24 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन कसे घेतले? Harbhara Sheti 2025

Harbhara Sheti 2025 चंद्रपूर : शेती परवडत नसल्याची ओरड होत असतानाही चिमूर तालुक्यातील भिसी येथील एका प्रगत शेतकऱ्यांने केवळ दोन एकरात तब्बल 24 क्विंटल हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन घेतल्या असून शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संजय मुंगले असे त्या प्रगत शेतकऱ्याचे नाव आहे.

Harbhara Sheti 2025

भिसी येथील शेतकरी संजय मुंगले यांना भिसी परिसरात 12 एकर शेत जमीन आहे. ते या जमीन हरभऱ्याची पारंपरिक शेती करत होते. परंतु, शेतीत फारसे उत्पादन मिळत नव्हते. अशातच मुंगले यांनी आगळा वेगळा करण्याचा निर्धार केला. प्रयोगासाठी 2 एकर शेत जमीन वापरून तेथे हरभरा पिक घेतले.

केळी बागेचे उन्हापासून असे करा संरक्षण! वाचा सविस्तर;

Harbhara Sheti 2025 संपूर्ण औषधी मात्र वापरून त्या प्लॉटमध्ये 24 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले.त्यांच्या 10 एकर शेतीत पारंपरिक पद्धतीने शेती केली.तिथे 80 क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न झाले.

WhatsApp Group Join Now

10 एकर शेती प्रती एकर आठ क्विंटल याप्रमाणे उत्पन्न झाले.परंतु, 10 एकर शेतीच्या तुलनेत दोन एकर शेतीमध्ये 24 क्विंटल हरभरा पिकाचे उत्पादन झाले. या प्लॉटमध्ये प्रति एकर 12 क्विंटल याप्रमाणे उत्पन्न झाले आहे.

Harbhara Sheti 2025 दोन एकरात असा केला यशस्वी प्रयोग!

सलाम किसान टीमने शेतकऱ्यांच्या शेतात एक विशेष प्रयोग केला. पिकासाठी वातानुकूलित उपाय प्रदान केला. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे आरोग्य, आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली. पिकांच्या वाढीचा दर वाढला आणि उत्पादकताही सुधारली. या यशामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा झाला.

शेतीत केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे दोन एकरात 24 क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न झाले. माझी पिके इतकी चांगले वाढताना मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. मात्र हा प्रयोग झाल्याचे समाधान आहे. – संजय मुंगले, प्रगतीशील शेतकरी, भिसी

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment