हळद काढणीनंतर कमी खर्चात सोप्या पद्धतीने अशी करा हळदीवर प्रक्रिया! वाचा सविस्तर; Halad Prakriya 2025

Halad Prakriya 2025 शेतातून खणून काढलेली हळद आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपारिक पद्धतीने शिजवली जाते.

Halad Prakriya 2025

WhatsApp Group Join Now

Halad Prakriya 2025 पारंपारिक पद्धत

  1. कढईत हळद भरून वर हळदीचा पाला किंवा गोणपाट टाकून कढईचे वरचे तोंड बंद करून हळद शिजवली जाते.
  2. काही ठिकाणी कढईच्या वर अर्ध गोलाकार पद्धतीने हळद भरून वर तोंड पाला टाकून चिखल मातीने लिपून घेऊन हळद शिजवली जाते.
  3. कढईत जेवढी हळद जास्त तेवढा जास्त वेळ हळद शिजवण्यासाठी लागतो.

कांदा साठवणुकीत कोणते रोग येतात? रोग येऊ नये म्हणून काय करावे?

नवीन पद्धत

  • हळद शिजविण्याच्या नवीन पद्धतीनुसार तेलाच्या बॅरेलचे सच्छिद्र ड्रम तयार करून त्यामध्ये हळद भरून मूळच्या कढईत फक्त पाणी टाकून उकळत्या पाण्यात हे योग्य प्रकारे शिजते.
  • या कामी कमी वेळ, कमी मजूर, कमी इंधन लागते. अशा मालास चांगली चकाकी येते. परिणामी चांगला बाजार भाव मिळतो.
  • अशा पद्धतीचा वापर केल्यास कमी वेळात हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि श्रम, मजूर, इंधन यांचा अपव्यय टाळता येतो.

Halad Prakriya 2025 हळद शिजवल्यानंतरची प्रक्रिया

  • शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण फरशीच्या किंवा सिमेंट काँक्रीटच्या खळ्यावर वाळवावी लागते.
  • त्यासाठी ताडपत्री किंवा बांबूच्या चटयांचा वापर केला जातो. हळद वाळविण्यासाठी जमिनीवर टाकू नये.
  • हळद वाळविण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. ढगाळ हवामान असेल तर हळद वाळविण्यासाठी जास्त दिवस लागतात.
  • पाऊस, धुके, दव यापासून हळदीचे रक्षण करावे. पावसाची शक्यता असल्यास सायंकाळी हळद गोळा करावी व ताडपत्री खाली झाकून ठेवावे.
  • पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात पसरावी. वाळत घातलेली हळद भिजल्यास तिच्या प्रतीवर परिणाम होतो. परिणामी मालास चांगला भाव मिळत नाही.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment