पिवळ्या सोन्याचे दर कधी वाढणार? हळद उत्पादक शेतकरी दर वाढीच्या प्रतीक्षेत! Halad Bajarbhav Update 2025

Halad Bajarbhav Update 2025 नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली; परंतु काही दिवसांपासून हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे पुढील हंगामात हळदीची लागवड करावी की नाही? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Halad Bajarbhav Update 2025

गतवर्षी 3 हजार रुपयांपर्यंत हळदीचा भाव गेला होता. परंतु यावर्षी हळद आवक सुरू झाल्यापासून 14 हजारांच्या पुढे भाव जात नाही. हळदीला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड लागवड खर्च व मजुरीही निघत नाही.

फार्मर आयडी नसल्यास ‘या’ योजनांचा मिळणार नाही लाभ! 

Halad Bajarbhav Update 2025 हळदीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभाग वेळोवेळी करते; परंतु भाव द्यायची वेळ आली की, त्यात खंडीभर त्रुटी काढून काही मोजक्याच हळदीला भाव देऊन शेतकऱ्यांची चिडीचूप केले जाते.

WhatsApp Group Join Now

फेब्रुवारी महिन्यापासून हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील मोंढ्यात हळदीची आवक सुरू झाली आहे. बुधवारी झालेल्या लिलावात 12 हजार 600 रुपयांचा भाव मिळाला.

Halad Bajarbhav Update 2025 त्या अगोदर आठवड्यात हळदीला 14 हजार 500 पर्यंत भाव मिळाला. अशाप्रमाणे अत्यल्प भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी हळदीची लागवड कशी करावी? असा प्रश्न विचारला जात आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव या गावात हळदीचे अधिक लागवड केली जाते. 12 ते 14 हजार रुपये भाव हळदीला मिळत असेल तर शेतकरी पुढील हंगामात लागवड करणार नाहीत, असे सध्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Halad Bajarbhav Update 2025 सर्व शेतीमालाचे भाव गडगडले

तालुक्यात काही दिवसांपासून भुईमूग काढणे सुरू झाले आहे. बुधवारी बिटात भुईमुगाला प्रतिक्विंटल 5650 रुपयांचा भाव मिळाला. सद्यस्थितीत हरभरा पीकास 5200 रुपयांचा भाव मिळत आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांची निराशा केली आहे. आजमीतीस सोयाबीनला 3600 पासून 4225 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. अगदी पीक असलेल्या नगदी सोयाबीन आणि शेतकऱ्यांची निराशा केली आहे. आज मी 30 सोयाबीनला 3600 पासून चार हजार 225 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

WhatsApp Group Join Now

शेतकरी काबाडकष्ट करणारा वर्ग आहे. कुटुंबाचा गाडा चालावा म्हणून रात्रंदिवस मेहनत करून उसनवारी करत हळदीची लागवड करतो. परंतु, बीटात त्रुटी काढून भाव अत्यल्प दिला जातो आहे. – मोहसीन शेख, शेतकरी.”

महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत सालगडी ठेवणे कठीण झाले आहे. शेतकरी घरातील सदस्यांना सोबत घेऊन शेती करू लागले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला पाहिजे, परंतु मदत काही मिळत नाही. – फुलाजी इंगोले, शेतकरी.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment