GST 2025 जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास 22 मान्यता केल्यानंतर आता अनेक वस्तू सप्टेंबर पासून स्वस्त होतील. त्यामुळे यंदाची दिवाळी खरेदी जोरदार होईल विम्याच्या प्रिमियमवर जीएसटी नसेल.

यात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, शेती बागायती किंवा वनीकरण यंत्रे, जमिनीची तयारी/शेती यंत्रे, कापणी यंत्रे, कम्बाईन हार्वेस्टर, पीक कापणी मशीन, गवत कापणी यंत्रे, कंपोस्टिंग मशीन, इत्यादींवर जीएसटी दर 12 % वरून 5 % करण्यात आला आहे.
टोमॅटो पीक नियिजन!!
GST 2025 शेतकरी वापरत असलेले ट्रॅक्टरचे स्पेअर पार्टस, टायर, ट्यूब, व्हील रिम, ब्रेक, गिअर बॉक्स, क्लच, रेडिएटर, सायलेन्सर, फेडर, हूड, कुलिंग सिस्टीम इत्यादींवर जीएसटी 18% वरून 5 % दर करण्यात आला आहे.

हात पंप, स्प्रिंकलर, ड्रीप सिंचन प्रणालीसाठी जीएसटी 12% वरून 5% दर लागू केला आहे. शेतकऱ्यांसाठी सेल्फलॉडींग ट्रेलर्स व हाताने चालणारी वाहने यांना जीएसटी 12 % वरून 5% दर लागू केला आहे.
ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय कृषी क्षेत्रांला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे. जीएसटी मधील कपातीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि इतर शेती विषयी संबंधित उपकरणे अधिक परवडणारी होणार आहेत.
GST 2025 खते, रासायनिक व जैविक कीटकनाशके:
रासायनिक खते व सूक्ष्म पोषक तत्त्वांवर दर कपात.
सल्फ्युरिक ऍसिड, नाईट्रिट ऍसिड, अमोनिया, इत्यादींवर जीएसटी दर 18% वरून 5% करण्यात आला आहे.
जिब्रेलिक ऍसिड, सूक्ष्म पोषक द्रव्यांवर जीएसटी 12% वरून 5% दर करण्यात आला आहे.
जैविक कीटकनाशके यांवर जीएसटी 12% वरून 5 % दर लागू केला आहे.
GST 2025 शेतीवरील अन्य सवलती:
कंपोस्टिंग मशीन, बायोगॅस प्लांट, सौर ऊर्जा उपकरणे व शेतीसाठी वापरली जाणारी अन्य उपकरणे यांवर जीएसटी दर 12% वरून 5% दर करण्यात आला आहे.
शेती ट्रॅक्टरसाठी सर्व स्पेअर पार्टस आणि सर्व कृषी डिझेल इंजिन पार्टस यांवर दर कपात करण्यात अली आहे.
बायोसायन्स व ड्रीप सिंचन उपकरणांना जीएसटी सवलत मिळाली आहे.
GST 2025 शेतकऱ्यांसाठी साधनसामग्री:
शेती व कृषी प्रक्रियांसाठी आवश्यकता सामग्री जसे मातीची तयारी, कापणी, सिंचन, वाहतूक, ट्रॅक्टर व त्यांचे पार्ट्स, बायोगॅस सौर यंत्रणा, ट्रेलर, इत्यादींना आता कमी दराने जीएसटी लागू आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |