जमीन : Groundnut Cultivation Technology 2025 लागवड करताना जमिनीची निवड ही एक महत्त्वाची बाब आहे. खरीप भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमिनी योग्य असते. या जमिनी भुसभुजीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी उपयुक्त असतात.

भारी चिकन मातीची जमीन भुईमुगासाठी अयोग्य असल्याने अशा प्रकारच्या जमिनीत भुईमुगाची पेरणी करू नये, कारण पावसाचा ताण पडल्यास अशा प्रकारची जमीन टनक होते. आणि आऱ्या जमिनीत सुलभरीत्या जमिनीत वाढू शकत नाही. परिणामतः शेंगा चांगल्या पोसल्या जात नाहीत व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
पिकविमा योजनेचे केंद्रीकरण; कापणी प्रयोगात गोंधळ अटळ, वाचा साविस्तर
Groundnut Cultivation Technology 2025 हवामान:
हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय पीक असून भरपूर सूर्यप्रकाश उबदार हवामान पिकाच्या वाढीस योग्य असते. या पिकाच्या वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. पीक पेरणीनंतर उगवण चांगली होण्यासाठी 19° सेल्सिअस वर तापमानाची गरज असते. ज्या ठिकाणी 17 अंश सेल्सिअस खाली तापमान असते. तेथे या पिकाची वाढ होत नाही. शेंगा भरण्याच्या अवस्थेत तापमानात वाढ होऊन ते 30 ते 34 अंश सेल्सिअस असल्यास शेंगा चांगल्या पोसल्या जातात.

Groundnut Cultivation Technology 2025 पूर्व मशागत:
भुईमुगाची मुळे उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच शेंगा चांगल्या पोहोचण्यासाठी जमीन 20 सेंटीमीटर पर्यंत नांगरून 2 ते 3 कुळव्याच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. खूप खोलवर नांगरट केल्यास उपमुळ्या 15 सेमी खोलवर गेल्यास काढण्याच्या वेळेस शेंगा जमिनीत राहण्याचे प्रमाण वाढते. जमिनीचा पोत योग्य प्रमाणात राखण्यासाठी शेवटच्या कुळवणी आधी प्रति हेक्टरी 12 ते 15 ट्रॉली चांगली कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत सम प्रमाणात पसरावे.
Groundnut Cultivation Technology 2025 सुधारित वाण:
भुईमुगाचे सुधारित वाण हे पसऱ्या उपट्या व निमपसऱ्या या प्रकारात मोडत असून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे वरील तीनही प्रकारे विभागावर आधारित उत्पन्न देण्याची क्षमता ठेवतात. जसे उत्तर महाराष्ट्रात पसऱ्या उपट्या वाणाचे उत्पन्न जास्त येते. तर विदर्भात व कोल्हापूर विभागात निमपसऱ्या जातीचे अधिकतम उत्पन्न मिळते. खरीप हंगामासाठी भुईमुगाच्या खाली जातीची लागवड करावी.
फुले उनप (जे. एल. 286):
उपट्या प्रकारातील ही जात असून 115 ते 120 दिवसात काढणीस तयार होते. हीचे सरासरी उत्पन्न 25 क्विंटल प्रति हेक्टरी इतके मिळतील या जातीतील शेंगदाण्याचा उतारा 68 टक्के असून तेलाचे प्रमाण 48 ते 50 टक्के इतके आहे.
फुले प्रगती (जे. एल. 24):
हा वाण देखील उपट्या प्रकारातील असून 90 ते 100 दिवसात पकवतेस येतो. या वाणाचे सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. यातील तेलाचे प्रमाण 50% इतके असून शेंगदाण्याचा उतारा 75 टक्के इतका मिळतो.
टी. एम. व्ही. 10 :
ही जात निमपसऱ्या या प्रकारात मोडते. पकवतेचा कालावधी 125 ते 130 दिवसाचा आहे. तेलाचे प्रमाण इतर जातीपेक्षा अधिक असून तो 52% इतका आहे. काही भागात या जातीला चित्रा म्हणून ओळखले जाते. सरासरी उत्पन्न 17 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर इतके असून शेंगदाण्याचा उताराच्या 74% इतका आहे.

Groundnut Cultivation Technology 2025 बियाणे व बीजप्रक्रिया :
उपट्या व पसऱ्या जातीची वानांसाठी 100 ते 125 क्विंटल हेक्टर इतके बियाणे लागते. तर निमपसऱ्या या जातीसाठी 90 ते 110 किलो हेक्टर इतके बियाणे लागते. भुईमुगाची उगवण चांगली व्हावी तसेच उगवणीनंतर कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून लागवडीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाच्या जिवाणू संवर्धकांच्या बीज प्रक्रिया करणे आवश्यक्य आहे.
बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया :
यामध्ये 2.5 ग्रॅम कारबनडेझम किंवा कॅप्टन अथवा 5 ग्रॅम थायरम 1 किलो बियाण्यास चोळावे. ट्रायकोडर्माचे वापर सुद्धा 1 किलो बियाण्यास 5 ग्रॅम प्रमाणात चोळावे. रायझोबियम या जिवाणू संवर्धकाचा वापर केल्यामुळे भुईमूग पिकाच्या मुळांवरील हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या गाठीचे प्रमाण वाढवण्यास मदत होते व यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के एवढी वाढ होते. याचा वापर दर 10 किलो बियाण्यास पण 250 ग्रॅम याप्रमाणे वापरावे.
स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी):
आम्रधर्मी जमिनीत खतामधून दिलेला फॉस्फरस हा जमिनीत लोहा बरोबर घट्ट होऊन बसतो. पी.एस.बी. वापर केल्याने जमिनीतील फॉस्फरस हा पिकांना उपलब्ध करण्याचे कार्य या जीवाणू मार्फत केले जाते. याकरिता 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम पी.एस.बी. पुरसे होते.
Groundnut Cultivation Technology 2025 पेरणीची वेळ:
खरीप हंगामात पेरणी शिफारसी प्रमाणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते शेवटच्या आठवड्या पर्यंत केले पाहिजे अन्यथा केलेल्या पेरणीच्या उत्पादनात घट येते.
खत व्यवस्थापन:
भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी खत व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. द्विदल पीक असून त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठीतील जिवाणू हवेतील नत्र शोषून पिकास मिळवून देतात. त्यामुळे या पिकास खताची मात्रा कमी प्रमाणात लागते. स्फुरद खतामुळे मुळांची वाढ चांगली होते. आणि शेंगा चांगल्या पोसचतात. तेव्हा या पिकास हेक्टरी 10 टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत पेरणीपूर्वी द्यावे.
भुईमुगाला हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद या मुख्य रासायनिक खतांची गरज असते. त्या दृष्टीने नत्रासाठी युरियाची 1 गोणी व फॉस्फोट साठी सिंगल सुपर फॉस्फेटच्या 6 गोणी द्यावेत. अथवा 50 किलोच्या अडीच गोण्या डायमोनियम फॉस्फेटच्या दाव्यात.

भुईमूग पिकावरील किडी:
Groundnut Cultivation Technology 2025 या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे या रस शोषणाऱ्या, पाणी पोखरणाऱ्या अळ्या, पाणी खाणाऱ्या पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व हूमगी किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व पाने पिवळी होतात. या किडीचा उपद्रव दिसू लागताच डायमेथोएट 30% प्रवाही 500 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 % प्रवाही 700 मिली किंवा मिथिल डायमीटोन 25% प्रवाही 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारावे.
पाने पोखरणाऱ्या अळ्या पानांचा वरचा पापुद्रा पोखरून आतला भाग खातात आणि नंतर शेजारील पानांच्या गुंडाळ्या करून त्यात राहून उपशिविका करतात त्यामुळे पाने वाळू लागतात. या किडींचा उपद्रव दिसू लागताच मोनोक्रोटोफॉस 36 प्रवाही 700 मिली किंवा सायपरमेथ्रीन 20% प्रवाही 200 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारावे.
पिकाची काढणी व साठवण:
Groundnut Cultivation Technology 2025 भुईमुगाची काढणी जातीनुसार पक्व होण्याच्या कालावधीत लक्षात घेऊन करावे. काढणी ही योग्य वेळी करणे फार महत्त्वाचे असते. कारण लवकर काढणी केल्यास अपकव शेंगांचे प्रमाण जास्त राहते, व उत्पादनात घट होते. उशिरा काढणी केल्याने हिरव्या चाराचे नुकसान होते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |