Groundnut Crop 2025 जागतिक पातळीवर तेलबिया पिकांमध्ये भुईमुगाचे स्थान असाव्या क्रमांकावर असून त्यामध्ये 48 ते 52% तेलाचे प्रमाण तर 26 ते 28टक्के प्रथिने असतात म्हणूनच त्यास गरिबाचे बदाम असे म्हणतात. भारतात भुईमूग पिकवणाऱ्या प्रदेशात गुजरात, आंध्रप्रदेश, तमिळनाडू व महाराष्ट्र या राज्यांचा प्रामुख्याने समावेश होतो या पिकांची राष्ट्रीय उत्पादकता 1100 किलो प्रती हेक्टरी असून ती फारच कमी आहे.

भुईमुगातील समस्यांमध्ये विविध प्रकारचे रोग व त्यामुळे उत्पादनात येणारी घट ही एक मुख्य समस्या होय. या पिकावर विविध प्रकारच्या 55 रोगांची नोंद आढळून येते. यातील काही रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झाल्यास उत्पन्नात घट येऊन आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागते. भुईमुगावरील अर्थी दृष्ट्या महत्त्वाचे रोग व एकात्मिक व्यवस्थापनाबाबत माहिती प्रस्तुत घडी पत्रिकेत दिली आहे.
कशी तपासावी बियाण्याची उगवणक्षमता?
रोगाची लक्षणे: Groundnut Crop 2025
- पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्यानंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात.
- रंगविहिरीत छोट्या आकाराचे ठिपके पानाच्या वरील बाजूस दिसू लागतात व कालांतराने त्यांचा रंग काळपट तपकिरी दिसू लागतो.
- पानाच्या खालच्या बाजूस तिकट तपकिरी रंगाचा छटा दिसू लागतो.
- देठ तसेच बुंध्यांवर सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

रोगाच्या वाढीस पोषक घटक : एकाच जमिनीवर सतत पीक घेतल्यास तसेच 25 सें. ग्रे. तापमान व दीर्घकाळ जास्त आद्रता व पाऊस या रोगाच्या वाढीस अनुकूल घटक ठरतात.
व्यवस्थापनाचे उपाय: Groundnut Crop 2025
- पेरणीसाठी रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा.
- तृणधान्य बरोबर पिकाची फेरपालट करावी.
- पिकाची धसकटे जमिनीत खोल गाळून टाकावेत.
- कार्बेनडेझीन 10 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 20 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील 20 ग्रॅम या बुरशीनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानावरील ठिपके : फिजरिओप्सिस पर्सोनाट्म हा रोग या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : Groundnut Crop 2025
- खरीप हंगामामध्ये पेरणीनंतर साधारणपणे 55 ते 70 दिवसांनी व रब्बी हंगामामध्ये पेरणीनंतर 42 ते 46 दिवसांनी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागतो.
- काळसर वर्तुळाकार ठिपके पानाच्या खालच्या बाजूस दिसून येतात.
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पर्ण गळती आढळून येते.
रोगाच्या वाढीस पोषक घटक : 18 ते 30 सें. ग्रे. तापमान तसेच मॅग्नेशियमची कमतरता व नत्र आणि स्फुरद खतांचा जास्त प्रमाणात वापर या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरतात.
व्यवस्थापनाचे उपाय: Groundnut Crop 2025
रोगप्रतिकारक क्षणमानांचा पेरणीसाठी वापर करावा पिकांची फेरपालट करावी.
पिकांची धसकटे जमिनीत खोलवर गाडावी तसेच पीक काढणे नंतर उगवणारी भुईमुगाचे झाडे काढून टाकल्यास पीक प्रादुर्भाव करणाऱ्या प्राथमिक स्त्रोताच्या निर्मूलनास मदत होते.
निंबोळी पाणी अर्क किंवा निंबोळी बिया अर्क भुईमुगाच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी 15 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या कराव्यात कार्बेनडेझीन 10 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 20 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

तांबेरा : हा रोग पकसीनिया अरचीडीस या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : Groundnut Crop 2025
- तपकिरी फोड पानाच्या खालच्या पृष्ठभागावर दिसून येतात, तसेच फूडपानाच्या वरील पृष्ठभागावरील सुद्धा आढळतात.
- फोड साधारणपणे गोलाकार आकाराचे 0.5 ते 1.4 मिनी व्यासाचे असतात.
- या बुरशीमुळे पानांच्या खालच्या बाजूला गोलाकार लालसर, तपकिरी रंगाचे फोड येतात. व त्यातून रोगकारक बुरशीचे लालसर, तपकिरी रंगाचे अगणित बीजाणू पावडरच्या रूपाने बाहेर पडतात.
- झाडांच्या इतर भागावर सुद्धा आढळतात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या पानांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ती करपतात.
रोगाच्या वाढीस पोषक घटक : वातावरणातील ओलाव्यासोबत 22 ते 25 सेल्सिअस तापमान रोगाच्या वाढीस पोषक ठरते.
व्यवस्थापनाचे उपाय: Groundnut Crop 2025
शेताची स्वच्छता तसेच पिकांची फेरपालट करावी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी.
ज्वारी किंवा बाजरीचे भुईमुगात बरोबर1:3 या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास रोगाची तीव्रता व प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक वाहनांचा पेरणीसाठी वापर करावा.
काढणीनंतर उगवणारी भुईमुगाचे झाडे काढून टाकल्यास पिकास प्रादुर्भाव करणाऱ्या प्राथमिक स्त्रोताचा निर्मूलनास मदत होते.
2 ते 5 टक्के या प्रमाणात निंबोळी पानांचा अर्काची फवारणी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करते.
खोडकूज : हा रोग स्कॉलरशिप रॉल्फसाय या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे :
झाडाच्या बुंधावर जमिनीच्या अगदी जवळ पांढरट बुरशीची वाट दिसून येते.
झाडाच्या खोडकाच्या भाग पिवळसर पडून नंतर त्याची मर होते.
प्रादुर्भाव झालेल्या भागावर मोहरीच्या आकाराच्या बुरशीच्या स्कॉलरशिया तयार होऊन नंतर त्या पांढरट तपकिरी रंगाच्या होतात.
प्रादुर्भाव झालेल्या शेंगांमध्ये बियाणे घडत निळसर तपकिरी रंगाचे दिसू लागतात.
रोगाच्या वाढीस पोषक घटक : सुरुवातीला आद्र व नंतर शुष्क वातावरण रोगाच्या जास्त प्रमाणात वाढीस पोषक ठरते.
व्यवस्थापनाचे उपाय:
ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा ट्रायकोडर्मा हरजीअनम या जैविक बुरशीनाशकांची 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावे. तसेच या जैविक बुरशीनाशकाचे 25 ते 62.5 किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात जमिनीमध्ये एरंडी किंवा निंबोळी अथवा मोहरी 500 किलो प्रती हेक्टर याबरोबर वापर केल्यास चांगल्या प्रमाणात नियंत्रण होते.
कॅप्टन किंवा कार्बेनडेझीम या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम प्रति किलो अशी बीजप्रक्रिया करावी.

शेंडा मर : हा रोग भुईमूग शेंडांवर विषाणू यामुळे होतो.
रोगाची लक्षणे : Groundnut Crop 2025
- रंगविहरीत तसेच वर्तुळाकार ठिपके व रेषा नवीन पानावर दिसून येतात.
- प्रादुर्भाव झालेली झाडे लहान पेऱ्यांची व खुरपी राहतात.
- फुल किड्यांमार्फत या विषाणूचा प्रसार होतो.
- फुलकिडीच्या पेशिंद्यावर या विषाणूची गुजराण होते.
- वाहणारा वारा सुद्धा फुल किड्यांना पसरण्यास मदत करतो.
- विषाणू वाहकांची संख्या जानेवारी ते मार्च ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात झपाट्याने वाढत असल्यामुळे या काळात रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान होते.
व्यवस्थापनाचे उपाय: Groundnut Crop 2025
खरीप रब्बी किंवा उन्हाळी हंगामात लवकर पेरणी केलेल्या पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसतो.
भुईमूग व बाजरी अंतर पिके घ्यावे.
मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाची 1.6 मिली/लिटर किंवा डायमेथोएट 1.5 मिली/लिटर पाणी वापरून फवारणी करावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |