Greenhouse Needed 2025 हरितगृह संकल्पना हरितगृह ची संकल्पना थोडक्यात अशी आहे की, हे एक असे घर असते की जे पॉलिथिलिन, पी.व्ही.सी, ऍक्रेलिक पॉलीकार्बोनेट किंवा काच यासारख्या पारदर्शक साहित्यातून बनवलेले असते.

हरितगृहांमध्ये बाहेरील वातावरणापेक्षा तापमान सूर्यप्रकाश आद्रता व कार्बन डाय-ऑक्साइडऑक्साइड हे चार घटक नियंत्रित केलेले असतात.
शाश्वत! ऊस उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर;
Greenhouse Needed 2025 तापमान
हरितगृहामध्ये तापमान निवडताना अशी काळजी घ्यावी की दिवसाचे तापमान साधारणता: 23 ते 28 अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान साधारणता: 14 ते 19 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असे तापमान नियंत्रित ठेवल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व पिकाच्या गुणवत्तेमध्येही सुधारणा होते.

Greenhouse Needed 2025 सूर्यप्रकाश
वनस्पतीच्या प्रकाशसंलेषण क्रियेसाठी 40,000 ते 60,000 लक्स इतका सूर्यप्रकाश आवश्यक असते. ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असते त्यावेळी आपण 50% पांढऱ्या रंगाची शेडनेट वापरून आपल्याला आवश्यक्य असलेले तापमान आपण कमी अधिक करू शकतो.
Greenhouse Needed 2025 आद्रता
हरितगृहातील हवेतील आद्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वनस्पतीची चांगली वाढ होते. हरितगृहात अर्थता 50 ते 80 टक्के असावी. यापेक्षा जास्त प्रमाणात झाल्यास रोगांचे प्रमाण वाढते. आद्रता कमी करण्यासाठी डीह्युमीडीफायसरचा वापर करावा.
कार्बन डाय-ऑक्साइड
कार्बन डाय-ऑक्साइड हा एक बाहेरच्या हवेत 300 प्रति दशलक्षांश किंवा 0.3 टक्के एवढा असतो. पण हरितगृहात रात्री वनस्पतीने सोडलेला कार्बन डायऑक्साइड हा 1500 ते 2000 हजार प्रति दशलक्षांश एवढा जास्त असतो. तोच कार्बन डाय-ऑक्साइड हरितगृहात साठवून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वापरता येतो.
Greenhouse Needed 2025 हरितगृहाचा उद्देश

- उच्च प्रतीच्या पिकांचे संशोधन करण्यासाठी.
- साधारण वातावरणामध्ये जी पिके येत नाही त्यांचे योग्य रीतीने संगोपन करण्यासाठी.
- पिकास आवश्यक ते योग्य तापमान नियंत्रित करण्यासाठी.
- पिकास आवश्यकता योग्य सूर्यप्रकाश नियंत्रित करण्यासाठी.
- पिकास आवश्यक ती आद्रता नियंत्रित करण्यासाठी.
- पिकास आवश्यक्य असणारा योग्य कार्बन डाय ऑक्साईड नियंत्रित करण्यासाठी.
- बिगर हंगामात वर्षभर पिके घेता येतात.
- कीड व रोगांपासून कमी अधिक प्रमाणात बचाव करण्यासाठी.
- टिश्युकल्चर पासून केलेल्या रोपांना कणखर बनवण्यासाठी.
- वनस्पतीचे पाऊस गारपीट यापासून संरक्षण मिळवण्यासाठी.
Greenhouse Needed 2025 फायदे!
- वर्षभर पिके घेता येतात.
- बाजारपेठेतील मागणी प्रमाणे पिकांची लागवड करता येते.
- पिकास आवश्यक तापमान फॉगर्सचा सहाय्याने निर्माण करता येते.
- उच्च प्रतीचे उत्पादन मिळते.
- भाजीपाला पिके फुल पिके औषधी व सुगंधी वनस्पती मसाला पिके यांची यशस्वीपणे लागवड करता येते.
- पिकाचे अति व कमी तापमान वारा पक्षी कीटक यांच्यापासून संरक्षण होते.
- लागवडीस अयोग्य जमिनीवर हरितगृह उभारून चांगले उत्पादन मिळवता येते.
- भाजीपाला पिकांच्या जाती व बीजोत्पादन करण्यासाठी उपयोग होतो.
समस्या
- सुरुवातीचे भांडवल जास्त असते.
- कीड व रोग एकदा आले तर नियंत्रण करणे अवघड होते.
- दर तीन वर्षांनी पॉली फिल्म बदलावी लागते.
- दररोज सकाळी व सायंकाळी बाजूचे पडदे उघडणे व बंद करणे.
- कुशल मनुष्यबळाची आवश्यकता.
- हानिकारक वायू निर्माण होण्याची संधी असते.
- सतत देखभाल खर्च आवश्यक्य.
- वेगवेगळ्या पिकाच्या आवश्यकतेनुसार प्रकाश आद्रता तापमान नियंत्रण करणे अवघड.
- जिवाणूजन्य रोगांचे प्रमाण जास्त असते.
- शासन अनुदानास विलंब.
हरितगृहासाठी जागेची निवड करताना घ्यावयाची काळजी!
- ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश मिळू शकेल अशा ठिकाणी हरितगृह उभारावे.
- काळी निचरा न होणारी जमीन असेल तर दोन इंच जाडीचा वाळूचा थर ठेवून त्यावर वाफे करावेत व हरितगृहाभोवती दीड फूट आकाराचा चर काढावा जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल.
- पाणथळ जागा हरितगृहासाठी वापरू नये.
- शेतात उंच साल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे.
- मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा निवडू नये.
- हरितगृहातील पाण्याचा सामन 6.0 ते 7.5 च्या दरम्यान असावा व क्षारतेचे प्रमाण जास्तीत जास्त 0.1 ते 0.5 पर्यंत असावे.
- हरितगृहातील मातीचा सामान 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असावा व क्षारतेचे प्रमाण 0.5 ते 0.7 पर्यंत असावे.
- बाजारामध्ये माल पाठवण्यासाठी अंतर्गत रस्ते असावेत.
- भविष्यात विस्ताराच्या दृष्टीने जागा पुरेशी मोठी असावी.
- निवड केलेली जागा प्रदूषण मुक्त असावी.
हरितगृहाची दिशा…
हरितगृहाची दिशा ठरविताना दोन बाबी विचारात घ्याव्यात….
वाढणाऱ्या पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा.
वाहणाऱ्या वायापासून हरितगृहात धोका नसावा.
वरील दोन्ही बाबींचा विचार करून हरितगृहाची दिशा दक्षिण उत्तर ठेवावी. त्यामुळे वरील झडप पूर्व उत्तर दिशेस येईल.
Greenhouse Needed 2025 हरितगृहाचे प्रकार
हरितगृहाचे असंख्य प्रकार आहेत कारण प्रत्येक ठिकाणाचे वातावरण आणि गरजेनुसार त्यात बदल केले आहे. हरितगृहाचे त्यात वापरलेल्या साहित्यावरून व हरितगृहांच्या रचनेवरून खालील प्रकार पडतात.

सांगाड्यांच्या साहित्यावरून पडलेले प्रकार
- गल्व्हनाइज्ड स्टील (G.I.)
- माईल्ड स्टील (M.S.)
- लाकडी पॉलिहाऊस
सांगाड्यांच्या रचनेवरून पडलेले प्रकार
- सॉ टूथ प्रकार
- मॅक्सीव्हेंट प्रकार
- टनेल प्रकार
- गटर ओपनिंग
मुख्यत्वेकरून महाराष्ट्रमध्ये खालील प्रकारच्या हरितगृहांचा जास्तीत जास्त वापर होतो.
वातावरण नियंत्रण हरितगृह
या प्रकारच्या हरितगृहामध्ये तापमान व आद्रता विविध तंत्र वापरून नियंत्रित केले जाते. यामध्ये मिनी/मायक्रो स्प्रिंकलर किंवा फॉगर्सचा वापर पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे केला जातो. या प्रकारच्या हरितगृहासाठी वायुविजन पंखे, सेल्युलोज पडदे आवश्यक्य आहेत. फॅन पॅड व सूक्ष्म सिंचनासाठी विजेचे गरज असते. तसेच पडद्यावर पाणी पडण्यासाठी विद्युत पंप तसेच नळ जोडणी असणे आवश्यक आहे.
नैसर्गिक वायुविजन हरितगृह
या प्रकारचे हरितगृह नैसर्गिक वायूविजनावर आधारित असून या आधारे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे तापमान, आद्रता व कार्बनडायऑक्साईड वायूचे प्रमाण राखता येते.
यामध्ये कीटक व जिवाणूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्लास्टिकची जाळी वापरण्यात येते. हरितगृहांमध्ये आपण खालील प्रकारची फुले पिके तापमान, आद्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित करून चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |