Green House Farming 2025 शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही.

नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. हे सर्व जमले नाही तर सर्वस्व पणाला लागण्याची शक्यता असते. असे असले तरी नव्या तंत्रामधील काही उपतंत्रे सर्वानाच वापरणे शक्य असून त्यामुळे आपल्या पारंपरिक शेती व्यवसायात अमुलाग्र बदल होऊ शकतो.Green House Farming 2025
Green House Farming 2025 शेडनेट हाऊस म्हणजे काय ?
शेतातील तापमान, आद्रता व कार्बन-डाय ऑक्सारईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला एक प्रकारचा मांडव म्हणजेच शेडनेट होय. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी तसेच उच्च गुणवत्ता व मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.
Green House Farming 2025 शेडनेट हाऊस उभारणी
शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता व कार्बन-डाय- ऑक्साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
शेडनेट हाऊससाठी जागेची निवडीचे निकष
- शेतकऱ्याच्या शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे.
- मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा यासाठी निवडण्यात येऊ नये.
- भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी.
- पाणीपुरवठ्याची सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे.
- पाण्याचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असेल व क्षारतेचे प्रमाण कमी असेल अशी जागा शक्यतो निवडावी.
- जमीन पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याचा निचरा होणारी वालुकामय माती वाफे तयार करण्यासाठी वापरावी.
- जमीन निचरा होणारी नसेल तर शेडनेट हाऊस भोवती लहान चर काढावा, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल.
- विद्युत पुरवठ्याची सुविधा गरजेची आहे.
- पाणथळ जागा शेडनेट हाऊससाठी निवडू नये.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजार भाव वाढले, पहा बाजारभाव
शेडनेट हाऊस उभारणीसाठी तांत्रिक निकष
- खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार 1 * 1 * 2 फूट असावा. त्यात मधोमध जीआयचा फाउंडेशन पाइप बसवून त्यास होल्ड फास्ट बार टाकून 1-2-4 प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी घेऊन तयार केलेले सिमेंट कॉंक्रिट भरावे. खड्ड्याचा आकार साधारणतः खालीलप्रमाणे असावा.
- शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेल व आकारमानानुसार प्रामुख्याने गोलाकार (राऊंड टाइप) व सपाट (फ्लॅट टाइप) प्रकार आहेत. तसेच आराखड्याप्रमाणे बाजूची उंची व मध्यभागाची उंची ठेवण्यात यावी. शेडनेट हाऊससाठी आवश्यकतेनुसार 35 ते 75 टक्के सावलीची शेडनेट वापरण्यात यावी. शेडनेटचे फिटिंग ऍल्युमिनिअम चॅनेल पट्टीमध्ये स्प्रिंगच्या साहाय्याने केलेले असावे.
- शेडनेट हाऊसमध्ये स्प्रिंकलर किंवा ड्रीप इरिगेशनची सोय केलेली असावी.
- शेडनेट हाऊसला सर्व बाजूंनी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत स्कर्टिंगसाठी 150 जीएसएमच्या जीओ फॅब्रिक फिल्मचा उपयोग करण्यात यावा.
- वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन प्रकारांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी लोखंडी पाइपचा सांगाडा वापरून वेगळी प्रमाणके वापरून स्वतःच्या जबाबदारीवर शेडनेट हाऊस तयार करणार असतील व त्यास बॅंक कर्ज मंजूर करण्यास तयार असेल, तर असे लोकल मॉडेलचे शेडनेट हाऊसचे मर्यादित प्रस्तावही सद्यःस्थितीत सन 2012-13 मध्ये मंजूर करण्यास हरकत नाही. तथापि, अशाप्रकारे उभारण्यात आलेल्या शेडनेट हाऊसच्या टिकाऊपणाबद्दल सर्व जबाबदारी लाभार्थींची राहील, याची नोंद घेण्यात यावी. तसेच याबाबत लाभार्थींचे रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड केलेले स्वतंत्र हमीपत्र घेण्यात यावे.
- शेडनेट हाऊस उभारणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य निश्चित केलेल्या आयएसआय/ बीआयएस मानकानुसार असावीत.

हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे…Green House Farming 2025
1) जर तापमान वाढयाची परिस्थिती असेल तर हरितगृहाचे पडदे दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पसरून ठेवावे व त्यानंतर उघडावे.
2) पाण्याचे व्यवस्थापन करताना सायंकाळी आणि सकाळी वाफसा स्थिती राहील अशा पद्धतीने वाढत्या तापमानात व्यवस्थापन करावे.
3) गादीवाफे असतील तर गादी वाफ्याच्याकडा सकाळी ओल्या करून घ्यावेत.शक्य असल्यास दोन्ही गादी वाफ्यामधील भागांमध्ये पाणी भरून ठेवावे.Green House Farming 2025
4) शेडनेट मधील तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्रीच्या वेळी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे.तसेच आद्रता ही साठ टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा.
5) वाढत्या तापमानाच्या काळात पिकांना अन्नद्रव्यांची गरज कमी असते परंतु पाण्याची गरज जास्त प्रमाणात लागते. यासाठी खतांची मात्रा निम्मी करावी व जिवाणू स्लरीचा वापर वाढवावा.म्हणजे स्थिर झालेली अन्नद्रव्य पिकांना मिळतील.
6) जर नवीन भाजीपाला लागवड करायची असेल तर जमीन तापू द्यावी. मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत व्यवस्थित मिसळावे. यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.
7) शेडनेट मधील जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरणी करून घ्यावी वमाती तापवावे म्हणजे नैसर्गिक रित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते.
8) नवीन पीक लागवड करायची असेल तर आगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण जरूर करावे. त्यानंतर शिफारस केल्यानुसार खतांची मात्रा द्यावी.Green House Farming 2025
9) जर रंगीत ढोबळी मिरची असेल तर झाडांवर फळांचा जास्त भार ठेवू नये टप्प्याटप्प्याने काढणी करावी.
10) भाजीपाला पिकांमध्ये विशेषतः रंगीत ढोबळी मिरचीची लहान फळे वेडीवाकडी आलेली असतील किंवा कीड, रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झाली असतील तर काढून घ्यावी.
11) पिकांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर भर द्यावा. शक्यतो जैविक खतांचा आणि कीडनाशकांचा वापर करावा.
12) बाजारपेठेतील परिस्थितीचाचांगला अभ्यास घेऊन विदेशी भाजीपाला लागवडीचे व्यवस्थापन करावे.
13) वादळी वारे किंवा जास्त पाऊस यामुळे शेडनेटचे नुकसान होते त्यामुळे शेडनेटचा विमा उतरवणे आवश्यक आहे.
14) तयार शेतमाल चा पुरवठ्यासाठी आणि बाजार भावाच्या माहितीसाठी इ-नाम या संकेतस्थळाचा वापर करावा.
शेडनेट हाऊस उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष
शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेलनुसार व प्रकारानुसार आवश्यक असणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष पुढीलप्रमाणे आहेत. त्यानुसार लाभार्थींनी साहित्यांचा वापर शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी करावा.Green House Farming 2025
शेडनेट हाऊसच्या गोलाकार व सपाट शेडनेट प्रकारासाठी सामाईक तांत्रिक निकष पुढीलप्रमाणे
- सर्व पाइप हे गॅल्व्हनाइज्ड आयर्नचे असावेत.
- या पाइपची जाडी कमीत कमी दोन मि.मी. असावी.
- पाइप वेल्डिंगऐवजी नट-बोल्टने जोडावेत.
- पाइपला वेल्डिंगचे जोड नसावेत.
- सपाट व स्थानिक प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी 3.25 मी. असावी.
- गोलाकार प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी चार मी. असावी.
FAQ :
1) हरितगृह शेती म्हणजे काय ?
उत्तर – प्रति चौरस फूट प्रति पीक नफा दोन ते तीन पटीने जास्त असू शकतो जेव्हा हायड्रोपोनिक्स सारख्या इतर पध्दतींसह सराव एकत्र केल्यास खुल्या शेतातील शेतीऐवजी हरितगृह शेती केली जाते. संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करून, तुम्ही कमी कचरा निर्माण करता, जे मोठ्या नफ्यात अनुवादित करू शकते.
2) शेडनेट म्हणजे काय ?
उत्तर – कोवळ्या किंवा हंगामाबाहेरील वनस्पतींना अति थंडी किंवा उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेली इमारत.