कमी खर्चात जास्त द्राक्ष उत्पादन, मशागती विना शेती! पहा संपूर्ण माहिती; Grapes Farming 2025

Grapes Farming 2025 व्यावसायिक शेती करायची असेल तर वाढीव उत्पादनासोबत सोबतच उत्पादन खर्चही कमी करावा लागतो. त्यासाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रयोगशीलता आणि निसर्ग निगडित भूमिका महत्त्वाची ठरते. ही अशी भूमिका घेऊन कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेतकरी रवींद्र जायप्पा यांनी मशागत विना द्राक्षबाग ही कल्पना राबवली आहे. उत्पादनावरील खर्च कमी करत उत्पादन आणि उत्पन्न वाढवणाऱ्या त्यांच्या या प्रयोगाबद्दल….

 Grapes Farming 2025

WhatsApp Group Join Now

शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, या शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही. शेती धंदा हा व्यवसाय म्हणून जोपर्यंत पाहिला जात नाही, तोपर्यंत शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही हे सत्य असेल, तरी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयुक्त ठरत नाही.

काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर;

तर त्यासाठी प्रयोगशीलता आणि निसर्ग निगडित भूमिका घ्यायला हवी आणि तशी भूमिका घेऊन कवठेकर ता. तासगाव येथील शेतकरी रवी जायाप्पा यांनी मशागती विना द्राक्षबागे कल्पना राबवली आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च दीड एकराला अवघा साडेचार हजार रुपये आला असून उत्पन्न मात्र दहा लाखांपर्यंत मिळवले आहे.

Grapes Farming 2025 चेतक पीक घेत असताना त्या शेताच्या मातीत तपासणी बरोबरच पान आणि डेट यांची प्रयोगशाळेत तपासणी केली तर पिकाला नेमकी कशाची गरज आहे याची माहिती मिळते. त्याप्रमाणे जर पिकाला वरखत आणि पोषक द्रव्य दिली, तर निश्चितच त्याची फल निष्पत्ती चांगली मिळते, असा स्वानुभव जायप्पा कथन करतात.

WhatsApp Group Join Now

तासगाव पासून पाच किलोमीटर अंतरावर सांगली रस्त्याला त्यांचे शेता आहे. शेतीपडीक टाकायची नाही. या पारंपारिक विचारसरणीला सोडून त्यांनी चार एकर आणि मोकळे सोडले आणि जेवढे पाणी उपलब्ध आहे त्यावर दीड एकर द्राक्ष पाऊण एकर आंबा आणि तीन करत काही भुसार पिके घेतली जातात.

पिकाला लागणारी अन्नद्रव्ये जमिनीतच असतात. मात्र ती आपण मशागतीच्या माध्यमातून खाली ढकलतो. यामुळे त्याचा पिकाला फारसा उपयोग होत नाही, याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचे म्हणणे आहे की, जमिनीवर केवळ तीन ते चार इंच खाली असलेल्या तणांच्या मुळातच नवीन मूलद्रव्य तयार होतात. तण जर आहे त्याच ठिकाणी गाडले गेले, तर त्यांचा निश्चितच लाभ मूळ पिकाला होतो.

रान स्वच्छ करण्याच्या नादात मशागत केली, तर ही अन्नद्रव्ये जमिनीत खाली खोल जातात. परिणामी त्याचा मूळ पिकाला काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच रानात तण माजले, तर ते पिकाच्या वाढीसाठी आणि अन्न निर्मितीसाठी उपयुक्तच आहे.

Grapes Farming 2025 पिकासाठी शेणखत उपलब्ध आहे पण त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. जनावरांपासून मिळणारे शेणखत आपण उकिरड्यावर टाकतो. त्या ठिकाणी विघटनाची क्रिया पार पडते. विघटन होत असताना तयार होणारा ह्यूमन ऍसिड हा वायू पिकाला न मिळता वाया जातो. तेच शेण शेतात तणावर टाकले, तर त्याचे विघटन होऊन मिळणार ह्यूमन वायू पिकाला मिळू शकतो.

Grapes Farming 2025 द्राक्ष बागेत हिरवळीचे खत द्यावे असे सांगितले जाते. यामागे हेच शास्त्र आहे. हिरवा पाला जर जागेवरच कुजला आणि त्याचे विघटन रानातच झाले, तर त्याचा पिकाला फायदा होऊ शकतो. आणि यामुळे वर खतांची गरज फारशी भासत नाही. ट्रॅक्टरने केली जाणारी नांगरट ही मान्य नाही. जे नैसर्गिकरित्या जमिनीत येते, तेच जर जमिनीला परत दिले, तर जमिनीची भूक आपण भागवू शकतो आणि त्याचा फायदा पिकाला होतो.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment