शेतकऱ्यांना द्राक्षाच्या पुढील हंगाम वाया जाण्याची भीती का आहे? वाचा सविस्तर; Grape Farming 2025

Grape Farming 2025 नाशिक: जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवस जोरदार पाऊस झाल्याने शेतीमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शेतीपिकांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. द्राक्षांच्या हंगामावर संकट निर्माण झाले असून, असे नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत सापडले आहे.

Grape Farming 2025

मे महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्याने द्राक्ष शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी मिळाल्याने द्राक्ष शेतीवरून करपा, डावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

नवीन पीक योजनेत ‘या’ कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल!

Grape Farming 2025 संततधार सुरू असल्यामुळे द्राक्षबागांवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांना कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करता येत नसल्याने रोगांचा होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे कठीण होत आहे.

WhatsApp Group Join Now

Grape Farming 2025 द्राक्ष बागेत पूर्णतः चिखलात साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पाठीवर शिकारया घेऊन पावडरची फवारणी करावी लागत आहे.

Grape Farming 2025 युद्धपातळीवर उपाययोजना सुरू!

द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत आहे. जर द्राक्ष बागांची मालकाडी तयार झाली नाही तर त्याचा परिणाम फळधारणेवर होईल. त्यामुळे द्राक्षांच्या पुढील हंगाम धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

Grape Farming 2025 तसेच या द्राक्ष बागांची 3 एप्रिल छाटणी झाले आहेत. तसेच, मालकाडी चांगली परिपक्व झाले तर फळधारणा होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी एप्रिलमध्ये छाटणी झाल्यानंतर मालकाडी काढून बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु, यावर्षी पावसाळा लवकर सोलून झाला आहे.

WhatsApp Group Join Now

दरवर्षीच्या तुलनेत द्राक्षबागांची एप्रिलमध्ये छाटणी झाल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले. द्राक्ष शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, मालकाडी तयार होण्यासाठी अडचण येत आहेत. त्याचा परिणाम फळधारणेवर होत आहे. द्राक्षाचा पुढील हंगाम वाया जाण्याची भीती आहे. -तुषार ढिकले, द्राक्ष उत्पादक शेतकरी

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment